Thursday, July 21, 2011

sundar mulishi maitri vhavi

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,

आम्हा दोघांची मने जुळावी,

हातात हात घालून फ़िरणारी

मलाही girl friend मिळावी...हास्याच्या पहिल्या किरणाने,

प्रितीची खळी उमलावी,

डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,

रूपाची ती राणी असावी...

अशीच माझी स्वप्नसुंदरी,

ह्र्दयाच्या नगरात रुळावी,

हातात हात घालून फ़िरणारी,

मलाही girl friend मिळावी...चौपाटीवर पाणीपूरीतून

प्रणयाचेच घास भरवू,

रिक्षात मीटरला साक्षी मानून,

प्रेमाच्याच शपथा घेऊ,

आयुष्यातील सारी दु:खं

जिच्या सहवासात टळावी,

हातात हात घालून फ़िरणारी

मलाही girl friend मिळावी...द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,

आधी girl की आधी friend...

आयुष्यभराचं नातं हवं,

देव करो तीच्याकडूनचं

प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी,

हातात हात घालून फ़िरणारी,

मलाही girl friend मिळावी...

Wednesday, July 6, 2011