Pages

प्रेम आणि आकर्षण

प्रेम हि एक टु वे प्रोसेस आहे .पण जेव्हा ती एकाच बाजुने होते तेव्हा त्याला आकर्षण (attraction) असे म्हणतात.आपण असे कसं काय प्रेम करु शकतो जर ती आपल्याशी प्रेमचं करत नसेल?
असं म्हणतात "खरं प्रेम परताव्यात कशाचीच अपेक्शा करत नाही"('True love does not expect anything in return') इथे 'खरं प्रेम'(True love) एवजी 'आकर्षण'(attraction) वापरा.
तुम्ही एखादिच्या व्यक्तिमत्वाकडे किंवा दिसण्याकडे किंवा आवाजाकडे किंवा तिच्या गुणांकडे आकर्षित होतात आणि तिला पसंद करु लागतात. असे पसंद करु लागणे ह्यालाच तुम्ही प्रेम म्हणत असाल तर ते प्रेम नाही त्याला आकर्षण असे म्हणतात.
आपण काही करिना,कतरिना आणि दिपिकाच्या प्रेमात पडत नाही तर त्यांच्याकडे आकर्षित होतो.
अनेक जणं म्हणतात 'आम्ही आमच्या पहिल्या भेटितचं एकमेकांच्या प्रेमात पडलो.'
खरं तर ते एक आकर्षण आहे जे तुम्हाला जवळ येण्यास मदत करते.आणि जेव्हा तुम्ही दोघं एकमेकांना ओळ्खायला लागतात तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तिच्या प्रेमात पडतात.इथे तुम्ही शकतात कि आकर्षण हि प्रेमाची पहिली पायरी आहे पण तरिही ह्या दोन्हि वेगळ्या गोष्टी आहे.
यासाठी दोन उदाहरणे बघा.–
१) A जर B कडे आकर्षित झाला आणि B ला संकेत देऊ लगला.तिनेसुद्धा त्याला response दिला.मग ते एकमेकांच्या जवळ येतिल, एकमेकांना समजतील,एकमेकांचा आदर करतिल.तेव्हा एक दिवस ते एकमेकांच्या प्रेमात पडतिल.
२)A जर B कडे आकर्षित झाला आणि B ला संकेत देऊ लगला.परंतु ती जर interested नसेल तर ती त्याला टाळु लागेल.जर परताव्यात A ला प्रेम किंवा response मिळत नसेल तर तो आणखि खचेल.
तो त्याची सहनशिलतेनुसार वाट पाहिल. पण काहि काळाने मग A हा C कडे आकर्षित होईल आणि मग B ला पुर्णत: विसरेल.
म्हणुन प्रेम हे काहि पाहिल्या-पाहिल्या होत नाहि तर ते होण्यासाठी आणि नष्ट होण्यासाठीहि थोडा वेळ लागतो.





प्रेम म्हणजे काय असतं ?………..
प्रेम म्हणजे असतो
एकच श्वास दोघांसाठी…..
प्रेम म्हणजे असतो
एकच विश्वास, कधीही न संपणारा…
प्रेम म्हणजे असते
एकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे….
प्रेमात नसावी काही
मिळव्ण्याची भाषा……..
प्रेमात असावी एकच अभिलाषा……
न बोललेले शब्द ऎकायची…..
प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवे
असावा फ़क्त आनंदी आनंद गडे……….
इकडे तिकडे चोहीकडे……..
एकदा तरी प्रेम जरुर करावे
पण ते आंधळे नसावे………..
कोणी तरी बोललेच आहे
"प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं same असतं"…………..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा