Pages

असं वाटतंय, तू मला विसरून जाणार...!

मग कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं,
काय करते आता ती? कुठे आहे सध्या?
मग लक्षात आलं,
अरे! आपण तर पुरतेच विसरलो तिला...

खिशातून मोबाईल काढला,
तिचा नंबर शोधायला,
पण तिचा नंबरच लागला नाही...
कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता.

मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का?
कारण तिची मनापासूनच आठवण येत होती,
न सांगता एकमेकांच्या मनातलं ओळखणारे,
असं नातं होतं आमचं, कुणाचीही नझर लागण्यासारखं...

पण असं काहीतरी घडलं,
आणि................
आता कशी असेल ती? कुठे असेल ती?
असे अनेकानेक प्रश्न डोक्‍यात येत राहीले...

आपणच सांगितलेलं तिला कि,
नेहमी तुझ्या सोबत असेन,
पण ती गोष्ट आपणच विसरलो...

मग तिच्या घरी सहजच फोन केला,
कसे आहेत सगळे, अशी विचारपूस करायला?
खरं तर फक्त तिच्यविषयी विचारायचं होतं,
विचारलं मग, कसे आहेत सगळे?

थोडं थांबून मग उत्तर आलं,
कि सगळे ठीक आहेत...,
माझी मैत्रीण काय म्हणते?
ती आता काय बोलणार?
आणि ती काही बोलू शकते का आता?

थोड्या शांततेनं मग मी विचारलं...
असं का म्हणताय?
अरे, ती काही बोलायला,
ती या जगात असायला तरी पाहिजे ना?
तुझी खूप रे वाट पाहिली तिनं,
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत,
पण तू मात्र आला नाहीस....

तिला काहीतरी झालं होतं...
मी फक्त ऐकतच राहिलो,
शब्द तर बाहेर पडायलाच तयार नव्हते,
अश्रू मात्र भळाभळा वाहत होते....

मग आवाज आला, ऐकतोयस ना!!!
तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस,
आणि दु:खीही होऊ नकोस,
असं तिनंच मला सांगितलंय तुला सांगायला...

आणि हो तुझ्यासाठी काहीतरी लिहून तिनं ठेवलंय,
ती म्हणालेली, माझी आठवण त्याला नक्की येईल,
आणि तो इथे फोन करेल, तेव्हा त्याला दे...

तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा,
आणि मी फोन ठेवला....

तिनं घरीही सांगून ठेवलेलं,
मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही,
नाहीतर तिही रडत राहणार, दु:खी राहणार,
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते,
फक्त तिच्यासाठीच......... !!!

मग मी तिच्या घरी जाऊन ती चिट्टी घेऊन आलो...

असं वाटतंय कि तू मला विसरलास मला...
अशीच सुरुवात होती...

कसा आहेस...?
मला माहित होतं...
तुला माझी आठवण कधी ना कधी नक्की येईल,
पण तू दु:खी होऊ नकोस,
स्व:ताची काळजी घे,
खूप मोठा हो,
स्व:ताची स्वप्नं पूर्ण कर,
तशी केली असशीलही...

खरं सांगू जाता जाता तुझी खूप आठवण येत होती,
कदाचित तू येशील म्हणून जीव तुझ्यात अडकून राहिला होता,
पण तू नाही आलास,
मग विचार केला,
तुझ्यासाठी जाता जाता काहीतरी बोलून जावं,
मला खात्री होती,
तू हे नक्की वाचशील !!!

या जन्मात मी तुझी होऊ शकली नाही.......
पण पुढच्या जन्मी माझा होशील ना रे?????

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा