Pages

विनोद

माणुस एका टपरीवर जातो आणि समोसा मागतो.
समोसा आल्यावर् तो फ़क्त आतला मसालाच खातो.
टपरीवाला म्हणतो “अरे क्यों सिर्फ मसाला ही खाया?”
माणुस म्हणतो “अरे डॉक्टरने बाहर का खाने के लीये मना किया है !!!”

*********************************

एकदा शाळेत शिक्षक एका मुलाला विचारतात ‘सांग इंद्रधनुष्य कोणी मोडले?’
त्यावर मुलगा म्हणतो ‘खरचं सांगतो गुरुजी मी नाही हो मोडले‘.
तेवढयात वर्गात हेडमास्तर येतात.
शिक्षक त्यांना सांगतात सर या मुलाला इंद्रधनुष्य कोणी मोडले ते माहीत नाही.
त्यावर हेडमास्तर म्हणतात, ‘जावूद्या अहो जुने झाले असेल त्यामुळे मोडले असेल.

राजूच्या शाळेचा पहिला दिवस होत. त्यामुळे घरी येताच वडिलांनी त्याला विचारले.


*************************************

वडिल : राजू शाळा आवडली का तुला?’
राजू : ‘हो‘
वडिल : ‘बाई चांगल्या आहेत का?’
राजू : ‘हो‘
वडिल : ‘हुशार आहेत का?’
राजू : ‘हुशार आहेत की नाहीत कोण जाणे. पण त्यांना माझ्यापेक्षा बरंच जास्त येतं.‘


*****************************************

राजू : आई गं, आमचे गुरुजी ज्ञानेश्ववर आहेत.
आई : असे का म्हणतोस राजु?
राजू : आज ते मला रेडा म्हणाले आणि माझ्याकडुन कविता पाठ करुन घेतली.

****************************************************

शिक्षक : बंडू, काल तुझ्या बरोबर ते सभ्य गृहस्थ कोण होते?
बंडू : गुरूजी, ते सभ्य गृहस्थ नव्ह्ते. ते माझे वडील होते.

******************************************************

बाप : तुला कहीही प्रश्न विचारायचा झाला तर मला विचार. मला सगळं ज्ञान आहे. कारण बाप हा मलापेक्षा नेहमीच जास्त हुशार आसतो.
मुलगा : बाबा आगगाडीच्या इंजिनाचा शोध कोणी लावला.
बाप : जेम्स वॅ‍ट या संशोधकाने.
मुलगा : त्याचा बाप त्याच्यापेक्षा हुशार होता तर त्याच्या बापने शोध का नाही लावला.


**********************************************

एक सरदारजी रोझ घरी साखरेचा डब्बा पाह्तो आणी झोपतो
त्याची बायको विचारते कि का रोज साखरेचा डब्बा पाह्ता तुम्ही?
सरदारजी म्हणतो अग मला डॉक्टर ने रोज शुगर चेक करायला सांगितली आहे!!!


************************************************

एका माणसाच्या गाडीची बॅटरी खराब होते. तो गॅरेज मध्ये गाडी घेवून जातो तर तिथला मेकॅनिक विचारतो, “साहेब EXIDE ची बॅटरी लावू का?”
.
त्यावर तो माणूस म्हणतो, “हरामखोर, दोन्ही साइडची लाव.”


***************************************



एकदा एक माणूस लग्नाला आल्याचा तुकडा (गिंगर) घेवून जातो.
का??
.
.
.
कारण लग्नाच्या पत्रिकेवर लिहिलेलं असतं … लग्नाला “आलं” च पाहिजे.



*************************************************************

एक जत्रेत एक स्टॉल मध्ये एक माणूस ओरडत असतो, “एक रुपयात दुधी हलवा.”
लोक पैसे देवून आत जातात, तिकडे एक दुधी लटकवलेली असते.
लोक विचारतात कुठे आहे दुधी हलवा?
समोरचे दुधी तुम्ही हलवा आणि निघा.

***************************************

एकदा महाराज आणि राणी पत्ते खेळत असतात.महाराज: कोण आहे रे तिकडे?
नोकर: हुकूम महाराज?
महाराज: इसपिक.

महाराज: कोण आहे रे तिकडे?
नोकर: मी महाराज.
महाराज: आयला, तु महाराज तर मी कोण?

*********************************************

काणेकरांच्या एका पुस्तकात वाचलेला हिंदी संवादघर

`घर मै माजी है ?`
`यहां माजी कोइ नही, बहेनजी हई` पत्नीचे फणका-यात उत्तर.
`बहेनजी, आप साबुन कौनसा इस्तेमाल करती हो?`
`मेरेकू ईंपोर्टेड पिअर्स पसंद है, लेकिन परवडता किसको है? ये कवडीचुंबक का घर है`
`तो आपका परिवार कौनसा साबुन इस्तेमाल करता है?`
`परीवार तो घरके मालिक जैसाही बेशरम है. तीन दिन से मै घसा खरवडके चिल्ला रही हुं के साबुन संपा है, लेकिन किसीको ढीम्म नही है. महागलीच्छ परीवार है. मेरे माहेरकू हर आदमी का वेगळा वेगळा साबुन था. एक दिन चुकीसे मेरी माँने टायगर का साबुन लिया तो भडक के मेरे पिताने पूरी साबुनकी वडी गिळी थी. उससे उनका आतडा स्वच्छ हुआ. इतने स्वच्छ परिवारसे मै इस गलिच्छ परिवार मे आ गयी क्यों के मेरा नशीब फ़ुटका था…`तीन दिनसे पहेले आप कौनसा साबुन इस्तेमाल करती थी?`
`ये कार्यक्रम करने बाहरगाव गये थे ना, वहां के हॉटेलसे चुराके लेके आये वही छोटी वडी इस्तेमाल करते थे. इनका की नाई नवस है के साबू विकत आणनेका नही, हॉटेलसे चोरनेका……..

*******************************************************

एकदा एक सरदार असं अनाऊंन्स करतो कि त्याचा कुत्रा टॉमी ला पूर्ण इंग्लीश कळतं.
चॅलेंज म्हणून दुसरा सरदार येतो आणि टॉमीला बिस्किट दाखवून म्हणतो “टॉमी .. टेक”.
तर टॉमी जाऊन भिंतीला टेकतो.

कारण.

पहिला : मला स्वयंपाक करायचा, कपडे धुवायचा, घर झाडायचा कंटाळा आला म्हणुन मी लग्न केलं.
दुसरा : मला याच गोष्टींचा कंटाळा आला म्हणुन मी घटस्फोट दिला.


कार बनवणारे वेडे !

सांतासिंग अमॄतसरहून जलंधरला आपल्या मारुती कारने जातो. आईला दोन तासातच पोहचल्याचा फोन करतो व आपल्या कामासाठी जातो.
काम झाल्यावर आईला परत फोन करुन सांगतो मी संध्याकाळ पर्यंत परत येतोय.
रात्र झाली तरी सांता घरी पोहचत नाही.
दुसर्‍या दिवशीही पोहचत नाही.
तिसर्‍या दिवशी दमलेला सांता घरी पोहचल्यावर त्याची आई विचारते,” बेटा काय झाल ? तु तर दोन तासातच पोहचला होतास.

परत यायला इतका वेळ का लागला ?”

सांता : अग आई हे कार बनवणारे वेडेच आहेत. समोर जायला कारला चार गिअर दिलेत तर मागे जायला फक्त एकच गिअर दिलाय त्यांनी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा