Pages

ऐकलय की, तुझी आठवण येणार आहे

ऐकलय की,
तुझी आठवण येणार आहे.
आज परत मला,
ती माझ्यातूनच नेणार आहे...
डोळ्याना सांगीतलय मी,
आज तिला तिच्याकडुनच मागायची आहे,
पापण्यानो तुम्ही मिटू नका ,
आज रात्र जगायची आहे....
ए चंद्रा जरा एकडे बघ,
तिची आठवण येणार आहे...
तुझ्या सौम्य प्रकाश दे,
मला आठवणीत ती आज भेटणार आहे..
ए अश्रू, तू थांब रे,
इतके दिवस आलास ना..
माझा म्हणता म्हणता,
तू ही तिचा झालास ना...
तू आलास की,
पापण्या मग मिटायच म्हणतात..

ए पापण्यानो तुम्ही मिटू नका,
निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा ..
आज तिला सांगायची आहे...
डोळ्याना सांगीतलय मी,
आज रात्र जागायची आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा