Pages

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे,

तू आहेस माझी स्वप्न परी,
नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी,
फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी,
मी मात्र तसाच राहील वार्यावरी,

येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी,
ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी,
फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी,
तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जतुनी,

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा