Pages

प्रेम

प्रेम कस असत?  ( how is the Love? )


प्रेम कस असत?
खादागाच्या पात्यासारख असतं
लोहाराच्या भात्यासारख असत
तर काट्याच्या गुलाबासारख असत

ते प्रत्येकाच्या मानण्या एवढ असतं
ते कुणासाठी अथांग सागरा एवढ असतं
तर कुणासाठी उंच अवकाशा एवढ असतं

त्याला नाही अंत पण हृदयात करत ते आकांत
प्रेमाची काय सांगू गाथा कृष्णाला पाहण्या साठी
गवळनीनी केला होता नयनांचा पलिता
प्रेम आहे हृदयाचं नात नाजूक त्याला जपावे हळुवारपणे पण नसावे ते लाजूक
प्रेम आहे पूजा जीथे हवनाला लागतो त्याग व मिळवाव लागतो परस्पर विश्वास

प्रेम आहे शुभ्र वस्त्र निर्मळ मनानी निर्मिलेल्या नाजूक भावनांच्या धाग्याचं
प्रेम असावी लता विश्वासच खात घातलेली
प्रेम म्हणजे मधुर मकरंद दोन पुष्पान्तला भ्रमराने गोळा केलेला
जो चाखेल क्षणभर विसरणार नाही जन्मभर
प्रेमरूपी विन्याच्या तर छेडून बघा क्षणभर त्या संगीताचा आस्वाद 

श्रवण विसरणार नाहीत जीवनभर
                                                                                                         --  सत्यजित प.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा