Pages

तुझ्याविना आता जगणेच नाही

मन माझे कधी जुळले,
तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा,
कोणी मला खुणावलेच नाही...


स्वप्नंसदृश्य आयुष्य
माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन
कधी फुलले कळलेच नाही...

दुखाच्या क्षणात डुबत
चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास
माझा कळलेच नाही...

आशाच सोडली होती मी
परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद
तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...

कधीच अलग होऊ नकोस
प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून तर
तुझ्याविना आता जगणेच नाही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा