Pages

कधीतरी कुणावर प्रेम करावं

कधीतरी कुणावर प्रेम करावं
एक आठवण म्हणून नव्हे,....एक साठवण म्हणून,
प्रेम करावं फुलांच्या पाकल्यासारखं...
घट्ट मिठीत साठलेले
कुशीमध्ये दडलेले पण स्पर्शाने फुललेलं,
कधीतरी कुणावर प्रेम करावं
आकाशाच्या अथांगतेसारखे.....
दूरपर्यंत पसरलेलं पण नजरेला भिडलेलं,
कधीतरी कुणावर प्रेम करावं
दिवा-वातीच्या संगतीसारखं.....
दिव्याच्या आधारानी तरणारे नि ज्योतीसारखं जळणारे,
कधीतरी...कुणावर प्रेम करावं
त्या दर्यावाराच्या खडकासारखे
लाटांना अलगद झेलणारे
पण त्यांच्यातच झिजणारे,
कधीतरी कुणावर प्रेम करावं
स्वप्नासारखे भंगणारे...
खोल दरीत लोटणारे
गगनालाही लाजवणारे
पण कधीतरी......
कधीतरी कुणावर प्रेम करावं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा