Pages

असं का होत?

असं का होत? 
कुणीतरी खुप आवडायला लागत
अन ते आवडण एकाकी मनाला वेड लाऊ लागत 

असं का होत? 
कुणाचीतरी खुप आठवण यायला लागते 
अनं ती आठवणच आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागते 

असं का होत? 
कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येत ... 
अनं ते जवळ येण,आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जात 

असं का होत? 
कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो 
अन तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा