Pages

आई

आई म्हणजे आई
आई म्हणजे आई
वात्सल्याची दाई
प्रेमाची शाई
अशीच असते आई....
... .
मुलांची तळमळ बघून
अश्रू गाळणारी आई
पोटच्या मुलाच्या सुखासाठी
"स्व" अपेक्षांचे बलिदान देणारी आई....
.
जन्मल्या पासून एका
फुला प्रमाणे जपणारी
भरारीचे पंख फड्कवतांना
डोळे भरून पाहणारी आई....
.
आजारी पडल्यावर रात्र
रात्रभर उशाशी बसणारी
मुलांची पोट भरून स्वतः
अर्धपोटी निजणारी आई....
.
मुलांच्या सुखी आयुष्याची
तोंड भर स्तुती करणारी
सुनेलाही मुली सारखी
वागणूक देणारी आई....
.
खरच आईला जे जमत
ते कुणालाच जमत नाही
आई विना काहीच नाही
आई पुढे देव ही लागत नाही....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा