Pages

kojagirichya chandanyat

कोजागिरीच्या चांदण्यात.....

कोजागिरीच्या चांदण्यात फिरतांना,
तु माझा हात धरलास प्रथमच,
सुरुवातीला मी अवघडले,संकोचले,
नंतर जाणवले हवाहवासा स्पर्श तो हाच,
मग मी ही निर्धास्त झाले, अन
तुझा दुसरा हात माझ्या कमरेभोवती
आवळला गेला....

आपल्यात फारसं अंतर उरलंच नाही.
तशाच मदहोश अवस्थेत किती चाललो आपण...
नदीकाठी बसलो- नदीच्या पाण्याचा आणि
चांदण्यांचा पाठशिवणीचा खेळ बघत.
कुणीच अवाक्षर काढत नव्ह्तं; तरीही
नजरेने इशारे होत होते....

तु अलगद मला नावेत घेऊन निघालास,
आसपास दुसरं कुणीच नव्ह्तं,
हे पाहुन मला जरा हायसं वाटलं.
तुझ्यासोबत एकटं फिरण्याची माझी इच्छा होती,
ती आज या कोजागिरीनं पुर्ण केली....

मी स्वप्नात हरवुन उगीच पाण्याकडे पाहिलं.
तोच तुझ्या बळकट बाहुंचा विळखा,
माझ्या मानेभोवती पडला, मी कितीतरी बावरले.
तु मात्र माझ्या देहावर जणू पुष्पवृष्टी केलीस;
तुझे उष्ण अधर माझ्या थंड ओठांवर टेकवलेस
आणि माझे भानच हरपले.....

अचानकच मला जाग आली तर समजलं
ते सारं स्वप्न होतं..................

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा