Pages

रविवार सकाळची वेळ होती

रविवार सकाळची वेळ होती,
मी हॉलमध्ये पेपर वाचत बसलो होतो,
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,
"चहा घेणार का तुम्ही?" असं म्हणाली ........
मी तिच्याकडे न पाहताच "हो" म्हणालो,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो,
माझ्या जवळून जाताना तिने,
केसांना नाजुक झटका दिला,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला,
मी उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,
तिनही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले,
मी हळूच उठलो खुर्चीवरून आणि स्वयंपाक घरात आलो,
तिने माझ्याकडे बघाव म्हणून........
फ्रिजवर तबला वाजवू लागलो;
तिन मात्र मागे न पाहताच चहाच आधान ठेवल,
आणि मला चिडवन्यासाठी आपल नाक मुरडल;
तिच्या त्या पाठमोर्या रुपाकडे पाहत मी क्षणभर तसाच थांबलो,
उगाच तिला दुखावले म्हणून स्वतःशीच भांडलो ,
हळूच मग मागुन जाउन मग मी..
तिच्या कमरेला विळखा घातला,
पण गडबडित चहाच्या भांड्याला लागुन,
हात माझा भाजला,
मी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,
चावटपणाची वेडी लहर माझ्या मनात मग उठली,
मी जखडले तिला मिठीत, ती म्हणाली "जाऊ दया ना!";
मी म्हणालो तिला "तुला माझ्यात सामाऊ दे ना!",
ती लाजून म्हणाली ,
"अहो अस काय करता? चहा उकळतोय!",
मी म्हणालो "उकळू दे! इथे माझा जीव जळतोय!",
"अहो अस काय करता? दूध उतू जाईल ना!",
"कशाला उगीच काळजी करतेस मी परत आणून देइन ना!",
ती उगाच कारण देत होती ,
मी प्रत्येक कारण उडवत होतो,
तिला अजुनच जवळ घेत,
माझ्या मनासारखा घडवत होतो,
शेवटी तिने कारण दिल ,
"अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय..",
मी म्हणालो "हो का! मला वाटले की माझा चावटपणा अती होतोय",
तेवढ्यात दाराची कड़ी वाजली ,
मी मनातल्या मनात बाहेरच्या इसमाला शिवी घातली,
तिन झटकन स्वतःला माझ्या तावडीतुन सोडवून घेतल,
आणि हळूच मला धक्का मारून,
स्वयंपाक घराबाहेर लोटल;
मी वैतागान दार उघडल, समोर कचरावाला दिसला,
माझ्या खान्द्याशी ओला झालेला शर्ट पाहून,
तो पण गालात हसला,
मी कचरा देऊन झटकन दार लावून घेतल,
पण मागे वळताच क्षणी काहीतरी विचित्र घडणार आहे, अस मला वाटल,
पाहिले मला स्वयंपाक घरातून, दूध जळण्याचा वास आला,
नंतर कान दणानून सोडणारा, सिलेंडरचा स्फोट झाला,
मी धावत आत गेलो, माझ ह्रदय धडधड़त होत,
माझ्या डोळ्यांदेखत तीच पातळ आगीवर फडफडत होत,
मी तिला उचलून घेतल, डोळे माझे झरत होते,
तिच्या करपलेल्या काचेवरून हात माझे फिरत होते,
मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले,
मला पाहून तिच्या ओठांवर हास्य मग विलसले,
ती म्हणाली मला,
"एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना!"
"मरन्यापुर्वी मला, तुमच्यामधे सामाऊ दया ना!"
मी कवटाळले तिला उराशी,
अन् देवाचे स्मरण करू लागलो,
ती वाचावी म्हणून त्याची करूणा भाकू लागलो,
पण दूध उतू गेल होत, ओटा मात्र फेसळला होता,
आम्हा दोघांच अमर आलिंगन पाहून,
तिचा मृत्यु क्षणभर रेंगाळला होता..............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा