Pages

मुक्ता बर्वे


मुक्ता बर्वे (१७ मे, १९७९ ) या मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत.

त्या मूळच्या पुण्याजवळील चिंचवड गावच्या आहेत. यांचे वडील वसंत बर्वे आणि आई शिक्षिका व नाट्यलेखिका विजया बर्वे आहेत. मुक्ताने रंगभूमीवरील बालपणापासून सुरुवात केली. चार वर्षाची असताना आईच्या ‘‘रुसू नका फुगू नका‘’ या नाटकात काम केले आणि त्यानंतर १५ व्या वर्षी नाट्यस्पर्धेच्या निमित्ताने रत्‍नाकर मतकरींच्या घर तिघांचे हवे या नाटकात भूमिका केली. मुक्ता बर्वे प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कामे करतात. २००० साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रमधून नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा