Pages

फुले शिकवतात

गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं


रात राणी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं


सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं

बकुळी म्हणते,
सावळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं


मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुणा॑चा सुगंध मैलवरुन ही येतो

कमळ म्हणतो,
संकटाच्या चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा