Pages

हास्यकट्टा

नवरा : अग, हे बघ ह्या मासिकात दिलंय ? शहामृग मोठा गंमतीचा प्राणी आहे. त्याला कमी दिसते आणि त्यांची पचनशक्ती इतकी प्रचंड आहे की त्याच्यापुढे वाटेल ते टाकले तरी तो ते खातो आणि तो ते पचवतोसुध्दा बायको : आदर्श नवऱ्याचे सगळे गुण आहेत की त्यात.


नलिनी हिरवे यांनी नवीन बंगला बांधला आणि दारावर लावण्यासाठी एका पाटीची ऑर्डर पेंटरला दिली. नावाचा फलक कसा पाहिजे त्याचा तपशील कागदावर लिहून त्यांनी पेंटरला दिला आणि त्याप्रमाणे फलक तयार करून त्या पेंटरने बाईंच्या नोकराकडे फलक पाठवला. मात्र फलक पाहिल्यावर बाई बेशुध्द पडल्या...कारण? .. ...कारण त्या फलकावरचा तपशील होता, " नलिनी हिरवे , रंग काळा , आकार दीड फुट बाय अडीच फुट, वळण चांगले हवे, बिल मिळाल्यावर पैसे मिळतील."


सान्ता की मा : 20 साल ताक मेरी कोई औलाद नही हुई. प्रेस रिपोर्टर : फिर अपने क्या किया? . . ... . . . . . . . मा : फिर मै 21 साल की हुई तो पापा ने मेरी शादी कराई फिर जा के सान्ता हुआ... :p


१ आरोपीला कोर्टात २ खुनांच्या आरोपात हजर केलेले... जज: तूम्ही तूमच्या बायकोला हातोड्याने मारल्याचा आरोप तुमच्यावर आहे.. (मागून आवाज येतो, "हरामखोर...") जज: (दुर्लक्ष करून) तसेच तूमच्या सासूला सुद्धा तूम्ही हातोड्याने मारून निर्घृण हत्या केली आहे... (पुन्हा मागून आवाज येतो, "अरे दगाबाज....") जज: (त्याच्याकडे पाहून) हे पहा तुमचा राग मी समजू शकतो... पण तूम्ही असे कोर्टात ओरडू शकत नाही.. अथवा मला तुमच्यावर पण खटला भरावा लागेल... मी ह्या आरोप्याला योग्य ती शिक्षा देणार आहे. तूम्ही कृपया शांत रहा... तो माणूस: अहो तस नाही ओ, मी ह्याचा शेजारी आहे आणि आत्तापर्यंत ३-४ वेळा ह्याच्याकडे हातोडा मागितला... आणि हा हरामखोर माझ्याकडे नाहीये अस बोलला.. :-D :-D


एकदा एक हाताचे नख दुसऱ्या नखा बरोबर लग्न करते, आणि सोमवारी त्यांना मुलगा होतो तर त्याचे नाव कायम ठेवतील ते? . . . . . . . . अंदाज सांगा पाहू. . . . . . . . NAILson MONDAYla...


एका एअरलाईन कंपनीने सर्व उद्योजक लोकांसाठी एका ट्रीपची ऑफर दिली. तुमच्या तिकिटावर तुमच्या बायकोचे तिकिट फ्री... नंतर एक महिन्याने त्या कंपनीने त्या उद्योजकाच्या बायकांना प्रतिक्रीया विचारण्यासाठी फोन केला तर सर्व बायकांचे एकच उत्तर आले, "कसली ट्रीप...??


गंपूने व्हॅलेंटाइन डेनिमित्त पिंकीला कमळाचं फूल दिलं. पिंकीने त्याला थप्पड मारली, गंपू : अगं, पण मी भाजपचा प्रचार करत होतो. पिंकी : अरे, मी पण काँग्रेसचा प्रचार करत होते!!


पहिलाः गजनीमध्ये अमिर खानने इतकी मस्त बॉडी कशी बनवली असेल रे? दुसराः मी सांगतो. तो जिमला जाऊन यायचा आणि १५ मि. नंतर विसरून जायचा आणि पुन्हा जिमला निघून जायचा...

सर्वात खतरनाक प्रपोज . मुलाने मुलिला मारलेला . . . . . . . . . . तु आमच्या घरी भांडी घासायला राहशिल का ?

एक स्कूटरचालक रस्त्याने चालला होता. त्याला एक भली मोठी, अवाढव्य अशी बाई आडवी आली. पुढचा रस्ताच दिसेना. तो घाबरला न मग काय दिली एक जोरदार टक्कर. बाई : काय रे मुडदया, तुला समोरून चाललेली माणसं दिसत नाहीत काय? स्कूटरचालक : माफ करा बाई. पण काय आहे की पेट्रोल फारच महाग झालंय ना त्यामुळे तुम्हाला एवढा मोठा गोल वळसा घालून जाणं मला परवडलं नसतं

1 टिप्पणी: