Pages

वाट....

कळत नाहीत वाटा,
तिकडे कशाला जायचं..?
आपले नव्हते जे,
त्यांना का आठवायचं..?

ज्यांना विश्वास कधी,
समजला नाही..
त्यांना का आपण,
खास काही सांगायचं..?

आहेत आपल्याकडे
शब्द मांडायला,
न ऐकनार्यांसाठी,
का ओरडायचं..?

भावना आहेत मनी,
त्यांना फक्त मांडायचं,
आपला काही चुकतं,
म्हणून गप्प का राहायचं..?

नाही सापडलं उत्तर,
तर प्रश्नांना नाही टाळायचं,
जगासमोर एक,
आपलं उदाहरण ठेवायचं..!!

1 टिप्पणी: