Pages

माझे पुणे

आम्हाला पुणे का आवडते???
सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे,
जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे,
मालुसर्यांच्या 'सिंव्हा' सारख्या मर्दानगी चे पुणे,
लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे,
शनिवार वाड्यात 'सांडलेल्या' रक्ताचे पुणे,
'ध' चा 'मा' केलेल्यांचे पुणे ,
'न' ला 'न'च आणि 'ण' ला 'ण'च म्हणणारे पुणे ,
इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे ,
'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे
नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले
आणि टिळक रोड वरचे> पुणे,
सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे
पुणे,
आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे
पण पुणे,
SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे
आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler
वाल्या पुणे RTO> कडून License to kill इशू करून घेतलेल्या
जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे> ,> Info Tech park चे पुणे,
Koregaon Park चे पुणे,
कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे,****>>
चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे,****>>
वैशाली च्या yummy सांभार चे पुणे,****>>
रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे,****>>
तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि****>>
कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे,****>>
college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे,****>>
Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan
वाले पुणे ,****>>
पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे,****>>
Nike आणि Reebok वाले पण पुणे ,****>
खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे,
आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे,
कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुड लक च्या मस्का पाव विथ
cutting चे> पुणे,
कॅड बी आणि कॅड एम चे पुणे,
सोडा शॉप चे पण पुणे,
अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे,
University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात
'दिवे लावणार्यांचे' पुणे ,
कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड
आणि Hongkong गल्ली चे पुणे
( तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही .. ,
नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे,
खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे,आणि चवी साठी
जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे,
शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान
दिले त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे,
बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे ,
Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या 'नळी' वाले
पुणे,
सदशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे, आणि रमझान मधल्या त्या
मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे,
मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे
पुणे,
पुण्याच्या ढोलांचा 'आव्वाज' जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय - अतुल
चे पुणे
आमच्या डोंगरांवरच्या पर्वती, तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे,
आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे,
Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे,
शिकणाऱ्यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे,
'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे,
मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि...
देशाचा defence शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या आमच्या
Southern Command चे पुणे,
तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे,
बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे,
स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे,
सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे,
ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी
एवढा खर्च केलान "> अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे,
फटकळ, खवचट, उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे ,
०२० चे आणि MH "बारा" चे पुणे,
आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे ,
जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे,
सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे,
शेख खान आणि D 'souza ,D 'casta चे पण पुणे,
पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे,
आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या " फुलराणी ' चे
पुणे
ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा
आमच्या सुधीर> गाडगीळांचे पुणे,
अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या
चिल्लाळांचे पण पुणे
जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या
प्रवासी> जादुगार रघुवीरांचे पुणे ,
अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या ,
एका पायावर सलग ३५ तास उभे> राहणाऱ्या ,अखंड ७५ तास टाळ्या
वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले> त्या>
७६०पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या अजब विक्रमादित्य
धनंजय कुलकर्णींचे पुणे,
भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे,
पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे,
bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या
wisdom tree चे पुणे, आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या
'NFAI ' चे पुणे ,
काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक "सवाई" चे पुणे ,
बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे,
नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे,
उगवती वरच्या, वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे,
पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे,
घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना ,
डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! ,
शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे ,
दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे,
कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे ,
फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराज चे पुणे,
आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे,
नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे,
गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे ,
प्रचंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि
कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे,
लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे
प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे,
दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे आणि
Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे,
दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे,
Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे,
भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे,
ऐन december च्या थंड रात्री Icecream किंवा
Chilled Beer रिचवणारे पुणे,
सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे,
Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे...
पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे,
आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile ?" असे पण म्हणणारे पुणे,
अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे,
जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc,Volks Wagon आणि
Jaguar बनवणारे पुणे,
सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे,
Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे
पुणे,
पर्वती वर practise करून everest ला गवसणी घालणारे पण पुणे
पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे
उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे,
Sunday ला सकाळी प्याटीस,पोहे आणि दुपारची निवांत झोप
काढणाऱ्यांचे पुणे,
कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे
सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे
घोटाळे बाज खासदारांचे पुणे ,
नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे ,
नवीन दादांचे पुणे,
जुन्या भाईंचे पुणे,
बारा महिने २४ तास online असणारे ,पण दुकाने मात्र दुपारी दोन चार
बंद ठेवणारे ,
असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !!
आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत,
आणि
काही अजाण बालके एक प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते?