Pages

संभाजीराजांचा पोवाडा

जयजयकार महाराष्ट्राचाऽऽऽ
हे हे हे आऽऽऽ
जयजयकार महाराष्ट्राचा
शूर शिवबाचा
शंभू राजांचा शंभू राजांचा शंभू राजांचा
शौर्य सळसळले रोमारोमात..
शौर्य सळसळले रोमारोमात
मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास जी ही जी
मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास जी ही जी
मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानास जी ही जी

शिवराज सुर्यास्ता गेला
शंभू गादीला रायगडाला

शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर संभाजी राजे हिंदवी स्वराज्याच्या गादीवर बसलेले आहेत.

संभाजी राजे हिंदवी स्वराज्याच्या गादेवर बसले असताना,

याचवेळेला दख्खन भागावरती स्वारी करण्याकरता मोघलांची फौज आलेली आहे.

नामशेष करण्या दख्खनाला
आलमगिरे चंग बांधलेला
न् मोघली फौज मराठी मुलखाला
धिंगाणा त्यांनी घातलेला!
मोघलांचं ठाणं कोल्हापूरला होतं कोल्हापूरला
होतं कोल्हापूरला जी रं जी
होतं कोल्हापूरला जी रं जी
होतं कोल्हापूरला जी रं जी

औरंगजेबाची फौज… एक आदिलशहाच्या राज्यामध्ये गोवळकोंड्यापर्यंत पोहचलेली आहे.

अन् दुसरी फौज कोल्हापूरला ठाणं मांडून बसलेली आहे.

आन् कोल्हापूरला आलेल्या या खानाचं नाव आहे – खान मुखरब.

खान मुखरब याच समयाला
घेऊन फौजेला
वेढा करवीरला होता करवीरला
खान मुखरब याच समयाला
होता करवीरला… कोल्हापुराला न्….

शंभूराजे याच समयाला….

आमची मराठी फौज…! मोघलांच्या फौजेवर तुटून पडायला लागलेली आहे!
ज्या ज्या ठिकाणी शत्रूचा सामना करता येईल,

मराठ्यांनी त्यांना पाणी पाजायचं काम सुरू केलेलं आहे!
हंबीरराव मोहित्यांनी तरी कहरच केलेला आहे!
आणि याच्यामध्ये हंबीरराव मोहिते खलास झाले.

शंभूराजाचा पराक्रम…

एका मागं एक विजयाला एक विजयाला एक विजयाला
आन् धक्का बसला मोघली फौजेला

मराठ्यांचा विजय!!!

ही वार्ता कळता राजाला
आलमगिराला
आलमगिराला
न् शंका बादशहाला

ही वार्ता कळता राजाला आलमगिराला..

या अल्ला! मैने सोचा था,
शिवाजी के जाने के बाद, हम महाराष्ट्र हमारे हाथ मे लेंगे!

हमारा राज उधर ही बनेगा! पन कापर शंभूने तो कहर कर दिया!

आलमगिरी याच समयाला
याच समयाला याच समयाला याच समयाला याच समयाला
अकलूज होता मुक्कामाला
होता मुक्कामाला
होता मुक्कामाला जी रं ह जीजी
होता मुक्कामाला जी रं ह जीजी
होता मुक्कामाला जी रं ह जीजी

आलमगीर.. औरंगबादशहा आकलूज मुक्कामाला तळ ठोकून बसलेला आहे!

महाराज होते गडालाऽऽऽ
आ आ आ आऽऽऽऽऽ ह ह ह ह ह ह अ.ऽऽऽऽऽ
महाराज होते गडालाऽऽऽ होते गडाला
आराधना केली देवीला
न् यश द्यावे आम्हा मराठ्याला

आबासायबांची शक्ती आमच्यात असू द्या…

बोलावून घेतलं गोंधळ्याला
बोलावून घेतलं गोंधळ्याला
देवीचा जागर करण्याला…. देवीचा जागर करण्याला
गोंधळी काय बोलला?
न् गोंधळी काय बोलला
संबळ लागे वाजण्याला
गोंधळ घातला आंबेला घातला आंबेला घातला आंबेला

शंभूराजे याच समयाला
न् सवे घेऊन संताजी घोरपड्याला!

रणमर्द! पटांगणामध्ये गनिमीकाव्याने लढणारा संताजी घोरपडे!

सवे घेऊन संताजी घोरपड्याला
बहेरव नाईक होता जोडीला
महलोजीबाबा सेनापती शोभलेला
राया अंता होता संगतीला

न् राजानी हल्ला चढविला
राजानी हल्ला चढविला

संभाजीच्या पराक्रमाला
संभाजीच्या पराक्रमाला
शत्रूनी पळ काढीला
पळ काढीला जी र ह जीजी
पळ काढीला जी र ह जीजी
पळ काढीला जी र ह जीजी

आमचा संभाजीराजे होता कसा म्हणाल..

भरदार छातीचा बांधा अन्
असा होता आमचा संभूराजा जी र ह जीजी
आमचा संभूराजा जी र ह जीजी
आमचा संभूराजा जी र ह जीजी

भरदार पोटरी मांड
न् पीळदार शोभती दंड
शोभती दंड जी र ह जीजी
शोभती दंड जी र ह जीजी
शोभती दंड जी र ह जीजी

हाडपेर ज्याचं दणकट
न् पोहलाद कांब मनगट ह जी र ह जीजी
कांब मनगट ह जी र ह जीजी
कांब मनगट ह जी र ह जीजी
कांब मनगट ह जी र ह जीजी

जटाभार…!
जटाभार शोभे राजाला

पीळदार…!

राजे कसे होते म्हणाल?

जणू मदनाचा पुतळा
महाराज शंभूराजे म्हणजे मदनाचा पुतळा!

माथी जाटाभार
शीवगंध कपाळाला
कोरीव दाढी शोभे राजाला
पीळदार मिशा शंभूला

जर राजांनी कुणाकडं पाहिलं… त्याचवेळेला त्याला कापरं भरायचं!

समोर पाहता शंभू राजाला
कैकांनी प्राण सोडला
प्राण सोडीला जी रं ह जीजी
प्राण सोडीला जी रं ह जीजी
प्राण सोडीला जी रं ह जीजी

शरीरवृष्टी शंभूराजालाऽऽऽऽऽऽऽ
शंभूराजाला शंभूराजाला
लाजवत होते मदनाला
गरुड भासे उमेदालेला
चंद्रावर्त घोडा बसण्याला
न् वर राजे स्वार समयाला
शंभूराजे स्वार समयाला

संभाजीराजे त्या चंद्रावर्तावर स्वार झालेले आहेत.
मराठ्यांना विजयापाठोपाठ विजय मिळू लागलेला आहे.

धाक बसला बघा मोघलाला
धाक बसला बघा मोघलाला
झोप येत नव्हती फिरंग्याला
नव्हती फिरंग्याला जी रं ह जीजी
नव्हती फिरंग्याला जी रं ह जीजी
नव्हती फिरंग्याला जी रं ह जीजी

संभाजीराजे!

मोघली फौज पळायला लागलेली आहे!
फिरंग्याच्या डोळ्याची झोप उडालेली आहे!
मराठ्यांना विजया पाठोपाठ विजय मिळू लागलेले आहेत.
संभाजीराजाच्या पराक्रमाची वार्ता आलमगिराच्या कानावर जाऊ लागलेली आहे!

विजयाची धुंदी मराठ्याला
विजयाची धुंदी मराठ्याला

गडावर काही ठिकाणी आमचे मराठे…
विजय मिळालेला आहे, आन् थोडे सुस्त झालेले आहेत
संभाजीराजांनी जरा तळकोकणात जायचं ठरवलं
अन् त्यांचं लक्ष गेलं जंजिर्‍याकडं!

संभाजी याच समयाला
संभाजी याच समयाला
अन् विश्रान्ती घ्यावी देहाला
विश्रान्ती घ्यावी देहाला

थोडी विश्रांती असावी म्हणून….

संगमेश्वरी आले मुक्कामाला
आले मुक्कामाला जी रं ह जीजी
आले मुक्कामाला जी रं ह जीजी
आले मुक्कामाला जी रं ह जीजी

संभाजीराजे आपल्या निवडक माणसांच्या बरोबर संगमेश्वरला येऊन पोचलेले आहेत.
सरदेसायांच्या वाड्यामध्ये मुक्काम आहे. सरदेसायांच्या वाड्यात मुक्कामाला असताना…

फितुरीनं घात बघा केला..
घात बघा केला.. घात बघा केला..
न् गणोजी शिर्का फितूर झालेला

गणोजी शिर्के फितूर झाले,

आन् या कोल्हापुरच्या ठाण्यावर खान मुखरब याला गणोजी शिर्के काय म्हणत आहे?

– मुखरब खान! संभाजीला आम्ही धरून दिले तर आम्हाला बक्षीस काय मिळेल?

इकलास बोलला समयाला
आपल्या बापाला आपल्या बापाला
खान मुखरबाला

इकलास.. खान मुखरबाचा मुलगा काय म्हणत आहे?

अब्बाजान! गनोजी शिर्के क्या कहता है सुना तुमने?

आमिस लावलं ओठाला
आमिस लावलं ओठाला
न् गनूजी फितूर झाला
गनूजी फितूर झाला
कैद करण्या शंभूराजाला
शंभूराजाला जी रं ह जीजी
शंभूराजाला जी रं ह जीजी
शंभूराजाला जी रं ह जीजी

कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात, काय खोटं नाही!

गणोजी शिर्के दुसरे कुणी नव्हते
शंभूजीराजांचे मेव्हणे होते
रक्ताची नाती ज्यांच्याशी जोडली होती
हे रक्ताचंच नातं रक्ताला खलास करायला तयार झालं होतं!

स्वार्थानं..
स्वाहर्थानं मोह टाकलेला
लालचीनं फिदा बघा झाला
आमिश लावलं ओठाला
वचन दिलं खानाला
खान मुखरबाला.. खान मुखरबाला.. खान मुखरबाला.. खान मुखरबाला
पकडून देतो शंभूला
शंभूराजाला जी रं ह जीजी
शंभूराजाला जी रं ह जीजी
शंभूराजाला जी रं ह जीजी

आमिश लावलं ओठाला
पकडून देतो शंभूला
शंभूराजाला जी रं ह जीजी
शंभूराजाला जी रं ह जीजी
शंभूराजाला जी रं ह जीजी

खान मुखरब… कोल्हापुराहून आपली फौज घेऊन निघालेला आहे
रातोरात त्याला तळकोकणात यायचे आहे
राजे विश्रांती घेण्यासाठी सरदेसायांच्या वाड्यात थांबलेले आहेत

रायां अन्ता महालोजीबाबा बहेरजी
संताजी घोरपडे आणि शाहीर कलेश
हे महाराजांच्या बरोबर आहेत

घाट उतरून खाली आल्यानंतर गणोजी शिर्के काय म्हणत आहे?

-कांदा फोडला तर डोळ्याला पाणी येतं..
पण कांदा फोडण्यावाचून भाकर जात न्हाई!

याचा अर्थ असा होता..
शंभूराजाला कैद केल्यानंतर मलाही रडावं लागेल
रडलं तरी चालेल, पण आपणाला सत्तेची जागा भोगायची आहे

. (शिवाजीराव सावंतानी संभाजीची पूर्वीची पाटी पुसून काढली.शंभूराजे होते कसे आजमावचे असेल छावा वाचा.)

फितुरीनं घात बघा केला
हेर बाजाराला
बोलतो राजाला

धनी!
धनी घात झाला!
धनी घात झाला!

मोघली फौज तळकोकणात उतरली!
मोघली फौज तळकोकणात उतरली!

गणोजी शिर्के काय म्हणत आहेत?

राजे, विश्वास ठेऊ नका!
मोघल तरी दिल्लीला पळून गेला
आपणच त्याला पळवून लावलं
आपल्या पराक्रमानं ते पळून गेले
ते येतील कसे?

विश्वास वाटला राजाला
विश्वास वाटला राजाला
वाटला राजाला वाटला राजाला
जरा अंग टाकलं धरणीला
जरा अंग टाकलं धरणीला
न् ही काळरात्र राजाला
न् गाढ झोप लागली शंभूला
शत्रूनं वेढा बघा दिला
शत्रूनं वेढा बघा दिला
संगमेश्वराला संगमेश्वराला संगमेश्वराला

राजाना गाढ झोप लागलेली आहे
खान मुखरबाची फौज… या फौजेनं संगमेश्वराला वेढा दिलेला आहे
बाहेर गडबड चालू झाली
एक नजरबाज परत आलेला आहे
आणि काय म्हणत आहे-

धनी!
धनी, घात झाला!

गमीन… आलेला आहे!
धनी, घात झाला! गमीन आलेला आहे!

पण काळरात्रीनं राजाला गाढ झोप लागलेली होती
राजांची हालचाल काहीच नव्हती
तो दोन मिनिटं तसाच उभा राहिला आहे
आणि परत गेलेला आहे

एवढ्यात मुखरबाची फौज सरदेसायांच्या वाढ्याच्या बाहेर आलेली आहे
अन् बाहेर एकच दंगा सुरू झाला!
कापाकापी सुरू झाली!
शाहीर कलुश पळत आलेला आहे
स्वामीजी! स्वामीजी! उठा गनीम आ गया!
स्वामीजी, उठा गनीम आ गया!

राजे उठून बघतात, सरदेसायांच्या वाड्याला चारी बाजूनं वेढा दिलेला आहे

हे कसं घडलं?

गणोजी शिर्क्यानी आमच्याशी अशी बैमानी का केली?
शत्रूतरी दिल्लीला पळून गेलान्… तो… तो सरदेसायांच्या वाड्याच्या बाजूनं कसा आला?

संगमेश्वराला वेढा कसा दिला? म्हणजेच गणोजी शिर्के फितूर झाला!

राजांनी हाताच्या मुठी वळलेल्या आहेत
राजे सरदेसायांच्या वाड्यामध्ये चकरा मारायला लागलेले आहेत
एवढ्यात दरवाजाच्या बाहेरच रणकंदन सुरू झालेले आहे

हर हर महादेव!

राया अंता याच समयाला
याच समयाला
याच समयाला
घेऊन चंद्रावर्ताला

राया अंतानी महाराजांचा चंद्रावर्त आणलेला आहे
ती खुंटीला अडकवलेली समशेर राजांनी घेतली
जिरेटोप माथ्यावर चढवला
आणि राजे चंद्रावर्तावर स्वार झालेले आहेत
संताजी आणि बहेरजी…
आलेल्या खानाच्या फौजेशी सामना करू लागलेले आहेत.
महलोजीबाबा… भोवती, पोत आपल्या अंगाभोवती फिरवतो,

गरगरा पट्टा फिरवायला लागलेला आहेत

महलोजी याच समयाला
याच समयाला याच समयाला
बोलले राजाला बोलले राजाला

धनी!
चंद्रावताचा लगाम खेचा
नावडी नदी जवळ करा
धनी भांगा काढा
धनी भांगा काढा

गरगरा फिरवीत पट्ट्याला
फिरवीत पट्ट्याला फिरवीत पट्ट्याला
महलोजी याच समयाला
जणू शेलारमामा भासे सर्वाला

साठी ओलांडलेले महलोजी बाबा जगदंबेचा पोत फिरावा याप्रमाणे…
सपासप तलवार फिरायला लागलेली आहे
जीवाची बाजी करून हिंदवी स्वराज्याच्या दौलतीची जपणूक करत आहेत
बहेरजी आणि संताजी हे मोघलांच्या फौजेशी टक्कर देऊ लागलेले आहेत

राया अन्ता होते जोडीला
राया अन्ता होते जोडीला
न् शाहीर कलेश होता संगतीला

शाहीर कलेश हाही हातामध्ये समशेर घेऊन लढायला लागलेला आहे
ही लढाई चाललेली आहे
या लढाईला आता चार तास झालेले आहेत
सरदेसायांच्या वाड्यापासून ही लढाई नावडीपर्यंत येऊन पोचलेली आहे
काही मराठे त्या नावडीमध्ये नौका घालून आपल्या राजाची वाट बघत आहेत
महलोजी सावलीसारखे धन्याच्या पाठीमागे आपली समशेर फिरवायला लागलेले आहेत
कोण कुणाला कापतो आणि कोण कुठे चाललेला आहे
मात्र हे डोळ्यात वात घालून आपल्या धन्याच्या पाठीमागे आहेत

धनी!
भांगा काढा धनी भांगा काढा
नावडी जवळ करा
धनी भांगा काढा

घामेघूम झालेला महलोजी पुन्हापुन्हा आपल्या धन्याची राखण करतो
इकलास मुखरबच्या लक्षात आलं
आणि इकलास मुखरबनं विचार केला
हे म्हातारं अडवल्याशिवाय आपल्याला संभाजीला घेरता येणार नाय

घेऽऽर डालो बुढ्ढे को ऽऽऽ!

इकलासचा आवाज कानावर येताच महलोजीबाबांच्या बाजूनं मोघली नंग्या तलवारी चमकू लागल्या
शंभूराजापासून महलोजीला बाजूला नेण्यात आलं !
हाताचे पट्टे झडत होते
साठी ओलांडून गेलेला म्हातारा…
किती वेळ पट्टा फिरणार
साडेचार तास हे हात चालू होते

आणि महलोजीला…. बाण लागला…

महलोजीला बाण लागताच महलोजी घोड्यावरनं कोसळले गेले…..

राजांच्या कानावर शब्द आले,
राजे! महलोजी बाबा गेले!

एक क्षणासाठी राजांची तलवार थांबली गेली
राजांचं लक्ष पाठीमागं जाताच राजावर समशेरीचा वार करण्यात आला
राजांनी मान झुकवली
पण राजांच्या जिरेटोपाला ती तलवार लागली
अन् राजांचा जिरेटोप जमिनीवर कोसळला गेला
अपशकून होता
युद्धामध्ये शीरस्राण जमिनीवर पडायला नको होतं!

शंभूराजांचं मन चरकलं गेलं…

शंभूराजांचं मन चरकलं गेलं!

आणि शंभूराजे काय म्हणत आहेत…

संताजीऽऽऽ.
तुम्ही इथून भांगा काढा!
रायगड गाठा!
जीवाची बाजी लावा!
रायगडाला लढवा!
आमचं काही होवो..

संताजी घोरपडे आपल्या हातातली समशेर फिरवीत होते.
शत्रूच्या तावडीत धन्याला सोडून आम्ही रायगडाकडे जावं हे संताजीला मान्य नव्हतं
पुन्हा राजांनी आवाज दिला-
संताजी!
बहेरजी!
रायगडाला वाचवा!
जीवाची बाजी लावा!
आमचं काही होवो!
हा हुकूम संभाजीचा आहे !!!

संताजीनं मुजरा केला आणि संताजीनं निघायचा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे
महाराजांचे पुन्हा पट्टे फिरत आहेत
आता मात्र दिसायला लागलेलं आहे
त्या नावडी नदीच्या काठाच्या माळावर रणकंदन चाललेलं आहे
एवढ्यात नेमबाजानी बाण मारला आन् तो बाण शाहिराच्या उजव्या दंडात येऊन घुसला
शाहीर घोड्यावरनं पडत म्हणताय

मै गिर गया हूं
मै गिर गया हूं

शंभूराजानं पाहिलं शाहीर कलोश घोड्यावरनं खाली कोसळलेला आहे
राजानं उडी टाकली!

कुशीत धरलं शाहिराला

शंभूराजांनी.. चंद्रावताहून उडी खाली मारली
शाहीर कलोशला पोटाशी धरलं
शाहीर कलोशने आपल्या दंडातला बाण केव्हाच फेकून दिला होता

पण एवढ्यात काय झालं
आता हे रणकंदन सुरू झालं होतं, आता ही लढाई सुरू झाली होती, जमिनीवली!
कुणीही घोड्यावर नव्हतं
माणसाला चालता येत नाय अशी शंभूराजाच्या बाजूनं गर्दी झालेली आहे
चारी बाजूनं नंग्या तलवारी आणि भाले आले
आणि शंभूराजाच्या देहाला भाले येऊन टोचले गेले
मुखरबचा तरणाबांड पोर्‍या इकलास शंभूराजांच्या जवळ आला
सप्तनद्या आणि सागराने ज्या राजाला अभिषेक झाला होता,

त्या राजाच्या जटा हातात धरल्या आणि काय म्हणत आहे-

हत्यार छोडो!
हत्यार छोड दो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा