Pages

मराठी उखाणे भाग ९

सकाळी सकाळी बागेत तोडत होते काळ्या
….रावांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या

महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी, महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी
XXXX रावांचे नाव घेते, आयताचे क्षेत्रफळ – लांबी गुणिले रुंदी

चांदीच्या किचन मध्ये सोन्याच्या ओटा
XXXX चे नाव घेते, केसात माझ्या हजार पाचशेच्या नोटा

तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला LAVA
तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला LAVA
नंतर ती त्याला फोन करून म्हणते, “धन्यवाद भावा”

निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान
XXXX रावांचा आवडता छन्द म्हणजे सतत मदिरापान

सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन
तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना माझ्यासाठीही दोन साड्या आणि चार ड्रेस घेईन

पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहते रजनी
…. चे नाव घेते मी त्यांची साजणी

अंगणात लावली फुलझाडे, कुंडीत लावली तुळस
…. चे नाव घ्यायला कसला आलाय आळस?

तेलाच्या दिव्याला तुपाची वात
XXXX रावांशी केले लग्न, आता आयुष्याची वाट

काश्मीरहून आणलाय रेशमी सुंदर रुमाल
…. बरोबर असले की हवाय कशाला हमाल

रंगीत सुंदर हरणाचे फेगडे फेगडे पाय
… राव आजून नाही, कुठे पडले की काय?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा