Pages

ढगान आभाळ दाटलया ग

ढगान आभाळ दाटलया ग
उरात वादळ पेटलया ग
डोळ्यांन मनाला,
मनानं डोळ्याला गाठलया ग
थेंब थेंब रुणूझुणू वाजते
वाऱ्याच्या पायात चाळ ग
ढगान आभाळ दाटलया ग
उरात वादळ पेटलया ग

अंगावरती गोड शहारा
काय मला हे झालया
ओठामधलं गुपित राणी
गालावरती आलया
काटे भवती असू दे
विणुया रेशमी माळ ग

किती काळ जीव कोवळा
झुरलाया बघ राधेचा
खुलला राणी जणू दागिना
ओठावरती थेंब मधाचा
माती लोणी लोणी झालीया
पावसाचं किती हे हाल ग
ढगान आभाळ दाटलया ग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा