Wednesday, November 22, 2017

मराठी उखाणे भाग १२

कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र, …. नी माझ्या गळ्यात बांधले मंगळ्सूत्र

पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, …. चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर

रेशमी सदर्‍याला प्लास्टीकचे बक्कल, …. ना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल

रेडिओ मीर्ची एकते कानात हेडफोन टाकून
…. रावांना मिस कॉल देते १ रुपया राखून

मराठी उखाणे भाग ११

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे

सचीनच्या बॅटला करते नमस्कार वाकून, …. चे नाव घेते पाच गडी राखून

एक होती चिऊ एक होती काऊ, …. चे नाव घेते , डोक नका खाऊ

लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास, अन …. च्या घशात अडकला घास