हरितालिकेची आरती

 जयदेवी हरितालिके सखी पार्वती अंबिके ।

आरती ओवाळीत ज्ञानदीपकळिके ।।ध्रु *।।
हरअर्धांगी वससी ।
जासी यज्ञा माहेरासी ।
तेथे अपमान पावसी ।
यज्ञकुंडी गुप्त होसी ।। 1 ।। *जय देवी *।।

रिघसी हिमाद्रिच्या पोटी ।
कन्या होसी तू गोमटी ।
उग्र तपक्ष्चर्या मोठी ।
आचरसी उठाउठी ।। 2 ।। *जय देवी *।।

तपपंचाग्निसाधने ।
धूम्रपानें अधोवदनें केली बहू उशोषणे ।
शंभू भ्रताराकारणे ।। 3 ।।* जय देवी * ।।

लीला दाखविसी द्रुष्टी ।
हे व्रत करिसी लोकांसाठी ।
पुन्हा वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावे संकटी ।। 4 ।।*जय देवी * ।।

काय वर्णू तव गुण ।
अल्पमती नारायण ।
मातें दाखवी चरण ।
चूकवावे जन्ममरण ।। 5 ।।*जय देवी *।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा