येई हो विठ्ठले माझे माऊली ये

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥

निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥

पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥

आरती ज्ञानराजा

आरती ज्ञानराजा |महाकैवल्यतेजा |

सेविती साधुसंत ||मनु वेधला माझा || आरती || धृ ||

लोपलें ज्ञान जगी |हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग |नाम ठेविले ज्ञानी || १ || आरती || धृ ||

कनकाचे ताट करी |उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो ||साम गायन करी || २ || आरती || धृ ||

प्रकट गुह्य बोले |विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी |पायी मस्तक ठेविले |

आरती ज्ञानराजा |महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 

गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां
“गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा”