उखाने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उखाने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

चंदेरी सागरात

 चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,

… रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

नाजुक अनारसे

 नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,

…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

दीन दुबळ्यांचे गाहाने

 दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,

… रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

डाळिंब ठेवले

 डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,

.. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

गोऱ्या गोऱ्या हातावर

 गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,

…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

गुलाबाच्या झाडाला

 गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,

…रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.

नदीच्या काठावर

 नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,

…रावां सोबत आली मी सासरी.

अभिमान नाही

 अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,

… रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा

ताजमहाल बांधायला

 ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,

… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

चंद्र-सूर्य

 सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी, 

... चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.

गुलाबाचे फुल

 गुलाबाचे फुल दिसायला ताजे,

… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

पर्जन्य

 पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,

… रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.

मंगलदेवी

  मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला 

........ रावांच नाव घेते अखंड सौभाग्य दे मला ........                                         

केळीच्या पानांवर

केळीच्या पानांवर कोवळं कोवळे ऊन, 

........ रावांचे नाव घेते ........ ची सून.

दिवाळीचा सण

 सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा, 

........ रावांच्या संसारात आनंदाला नाही तोटा

माउली

 रंगीत कपाटात जापानी बाहुली, 

........ रावांना जन्म देणारी धन्य ती माउली

अलंकार

 सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे,

….. रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे

मंगळागौर

 एमेघ मल्हार रंगताच श्रावणसर कोसळते,

..... नावाने मंगळागौर सजवते. 

चांदीचे जोडवे

 चांदीचे जोडवे पतीची खूण,

…. रावांचे नाव घेते …. ची सून

सासूबाई आहेत प्रेमळ

 सासूबाई आहेत प्रेमळ , जाऊबाई आहेत हौशी

---- रावांचे नाव घेताना होते मला ख़ुशी