प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एखादी तरी सर...


दूर निघून जाण्यापूर्वी
एवढं तरी कर
अंगणात माझ्या घेऊन ये
एखादी तरी सर...

तुझ्या सरीनं पुन्हा एकदा
भरून जाऊदे अंगण
तुझ्या पुरानं पुन्हा एकदा
वाहुन जाऊदे कुंपण

पसरून माझे हात पुन्हा
झेलीन तुझ्या गारा
श्वासामध्ये भरून घेईन
सळाळणारा वारा

ओसरून जाता सर तुझी
दूर निघून जाशील
ओल्याचिंब तुझ्या आठवणी
मागे ठेऊन जाशील

जेंव्हा जेंव्हा आठवेल तुझी
दुरावलेली सर
आठवणींचा पाऊस येईल
भिजवून जाईल घर....

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!!!
ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं….,
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं….!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं…..,
मग त्याच्याच समजूतीने क्शणभर विसावं….!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!
वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं……,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं…..!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं…..,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं….!.
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!
वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं…..,
क्शणभर का होइना स्वतःला विसरुन बघावं……!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं…..,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं…..!!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..

किती छान असतो न हा खेळ मनाचा

किती छान असतो न हा खेळ मनाचा,
स्वप्नांचा आधार घेऊन हवेत भरारी मारण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजा आहे म्हणत स्वप्नात हरवण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तुझ्या माझ्या अबोल प्रीतीचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
मी करत आलेल्या एकतर्फी प्रेमाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू जवळ नसलास कि तुला अनुभवायचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
सत्यात न उतरणाऱ्या स्वप्नाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजाच म्हणून मनाला समजावयाचा
खरच खूप छान असतो रे हा खेळ मनाचा,
सत्य माहित असूनही मनालाच फसवण्याचा.. मनालाच फसवण्याचा !!!!!!!

आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब...

आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल् याला काही ना काही देऊन जातो, शिकवून जातो ...

जेंव्हा तो तहानलेल्या धरती वर पडतो... तेंव्हा तो मातीला एक वेगळाच गंध देऊन जातो... ओल्या मातीचा गंध...
'देण्यात' किती सामर्थ्य असतं हेच तो नकळत आपल्याला सांगून जातो...

जेंव्हा तो झाडांच्या पानांवर पडतो... जास्त वेळ थांबत नसेलही तो तिथे... पण तरीही तो त्या पानांना अगदी टवटवीत करून जातो...
'ओझरता स्पर्श'... ओझरत्या स्पर्शाची ताकद दाखवून जातो तो आपल्याला ...
कारण त्यात 'लालसा' नसते... त्यात असते एक अनामिक 'ओढ'... अन तीच आपल्याला टवटवीत ठेवते...

अन जेंव्हा तो तिच्या चेहऱ्यावर पडतो... तेंव्हा ....
तेंव्हा राहतंच काय हो ;)...

तिच्या गालावरून खाली येतांना तर तो खुद्द बेभान होऊन जातो...
बेधुंद 'जगणं' काय असतं हेच तो आपल्याला सांगून जातो...


मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

दिवस रात्र २४ तास फक्त तिलाच पुजयाच असत
तिच्याच आठवणीने स्वताला विसरायच असत
कॉलेज रूम रास्ता यात फक्त तिला शोधयाच असत
अन देवाकडे फक्त तिच्या दर्शानाच साकड़ घलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

जळी तळी आभाळी अन आरश्यात तिचे प्रतिबिम्ब बघायच असत
बघता बघता तिला आपण स्वताला हरवायच असत
कधी चुकून नजर भिडली तर नजरेला खाली झुकवायाच असत
अन चोरून फक्त तिला एकटक बघत बसयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती रोज स्वप्नात येते म्हणुन रोज सजुन लवकर झोपायच असत
अन स्वप्नात सुद्धा तिला फक्त बघून दुरून हसयाच असत
रोज सकाळी हातांच्या ओंजाळीत तिला पहयाच असत
देवाच्या आधी चुकून तिचेच नाव वदयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती समोर नसतांना तिच्यावर सिंहा सारख काव्य म्हणयाच असत
ती वर्गात येताच मग सश्या सारख बेंच खाली लापयाच असत
आपण स्वत मुद्दाम चुकून आपल्या चुकान्वर तिला हसवायाच असत
ती हसताना तिच्या हास्य मोतिंना हळूच हृदयावर झेलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

तिला सांगायला घाबरत असंलो तरी एकदा आवसान एकवटायच असत
भले ती स्वीकारो व ना स्वीकारो पाहिले प्रेम तिलाच अर्पायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती मात्र ओढनी सावरत सावरत

ती मात्र ओढनी सावरत सावरत
स्वत:शीच गुनगुनत होती
नकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी
मला हाथभार लावत होती
बसमधला प्रत्येक प्रवासी
आमच्याकडेच बघत होता
मी तेथुन केव्हा उठेल
बहुतेक याचीच वाट पहात होता

 तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर कमी केले
एका मिनीटासाठी का होईना
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले

मग दुस-या धक्क्यालाच मी
स्वप्नातुन बाहेर आलो
 एक मिनिटातच तिच्यासमवेत
बरीच काही लाईफ़ जगुन गेलो
येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला
लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला


 मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी
ती तीची PURSE सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली

गुलाबी थंडीत

मारव्याचे एकाकी स्वर, मावळतीला सूर्याचा अस्त
बावरलेली संध्याकाळ, गारवा लपेटण्यात व्यस्त

पुन्हा उदास रात्र, थंडीने लागते बहरू
लाजत धुके हळूच, लागते फेर धरू

आखडलेले शरीर, प्रफुल्लित मन
पुन्हा एकाकी मी, सोबत तुझी आठवण

रक्त गोठवणारी थंडी , हातात हात तुझा
घातलेली तु शपथ "तु राहशील फक्त माझा"

कुड्कुडना-या थंडीतली, उबदार तुझी मिठी
उष्ण तुझे श्वास ,फुललेले माझ्यासाठी

दाट पांघरलेले धुके, दवबिंदूची आसवे
थंडीची प्रत्येक रात्र, मी जगतो तुझ्यासवे

आज नाहीस तु, फक्त तुझेच भास
गुलाबी थंडीत तुझ्या, आठवणींचा सहवास....

मला कुणी सांगेल का

मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

दिवस रात्र २४ तास फक्त तिलाच पुजयाच असत
तिच्याच आठवणीने स्वताला विसरायच असत
कॉलेज रूम रास्ता यात फक्त तिला शोधयाच असत
अन देवाकडे फक्त तिच्या दर्शानाच साकड़ घलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

जळी तळी आभाळी अन आरश्यात तिचे प्रतिबिम्ब बघायच असत
बघता बघता तिला आपण स्वताला हरवायच असत
कधी चुकून नजर भिडली तर नजरेला खाली झुकवायाच असत
अन चोरून फक्त तिला एकटक बघत बसयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती रोज स्वप्नात येते म्हणुन रोज सजुन लवकर झोपायच असत
अन स्वप्नात सुद्धा तिला फक्त बघून दुरून हसयाच असत
रोज सकाळी हातांच्या ओंजाळीत तिला पहयाच असत
देवाच्या आधी चुकून तिचेच नाव वदयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती समोर नसतांना तिच्यावर सिंहा सारख काव्य म्हणयाच असत
ती वर्गात येताच मग सश्या सारख बेंच खाली लापयाच असत
आपण स्वत मुद्दाम चुकून आपल्या चुकान्वर तिला हसवायाच असत
ती हसताना तिच्या हास्य मोतिंना हळूच हृदयावर झेलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

तिला सांगायला घाबरत असंलो तरी एकदा आवसान एकवटायच असत
भले ती स्वीकारो व ना स्वीकारो पाहिले प्रेम तिलाच अर्पायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

फक्त तू

तो delete करणारी तू...
माझा call पाहता,
तो cut करणारी तू...
मी समोर दिसता,
... मला न पहिल्या सारखं करून,
पुढे निघून जाणारी तू...
अन,
पुढे गेल्यावर,
हळूच मागे वळून,
मला पाहणारी तू...
आपल्या breakup नंतर,
आपल्याच मित्रान मध्ये,
मला विसरण्याचा प्रयेत्न करणारी तू...
अन,

कोणी माझ्या बद्दल काही विचारलं तर,
फक्त गप्पा राहणारी तू ...
माझी आठवण,
आल्यावर चोरून रडणारी तू...
आणि,
जगा समोर गोड गोड हसणारी तू..
रोज मला पाहून,
न पहिल्या सारखा करणारी तू...
अन,
माझ्या हातात सिगारेट पहिली कि,
"सिगारेट तक खाली,
आणि घरी जा... "
असं,
फोने करून बजावणारी सुधा तूच....
प्रेम असून हि,
नाही असं भासवणारी तू...
अन,

breakup नंतर सुद्धा,
माझ्या वर जीवपार,
प्रेम करणारी तू...
माझ्या वर जीवपार,
प्रेम करणारी तू.





कळत नाहीत वाटा,

कळत नाहीत वाटा,
तिकडे कशाला जायचं..?
आपले नव्हते जे,
त्यांना का आठवायचं..?

ज्यांना विश्वास कधी,

समजला नाही..
त्यांना का आपण,
खास काही सांगायचं..?

आहेत आपल्याकडे 

शब्द मांडायला,
न ऐकनार्यांसाठी,
का ओरडायचं..?

भावना आहेत मनी,

त्यांना फक्त मांडायचं,
आपला काही चुकतं,
म्हणून गप्प का राहायचं..?

नाही सापडलं उत्तर,

तर प्रश्नांना नाही टाळायचं,
जगासमोर एक,
आपलं उदाहरण ठेवायचं..!!


 विरहात जगून काय सिद्ध करू पाहताहेत ? तुमचं प्रेम किती महान होत ते ? प्रेम म्हणजे एका वाहत्या नदी प्रमाणे असतं.. प्रवाहात नेहमीच पुढे वाहत असतं.. एका ठिकाणी थांबलं तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं.. ..आणि पुढे सरकत राहिलं तरच सागराशी मिळतं..... 

जेव्हा काही चुकत असेल

जेव्हा काही चुकत असेल.....तेव्हा माझी आठवण कर......

तुला आठवेल बरोबर असलेल....

जेव्हा कधी संकटात असेल.........तेव्हा माझी आठवण कर........

तुझ्या मनात असेल तुला सावरायला.....

जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल.....तेव्हा माझी आठवण कर........

मी येईल वाऱ्‍याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला........ ..

जेव्हा तू झोपला असेल.........तेव्हा माझीआठवण कर........

मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला....... ..

जेव्हा तू एकटा असशील तेव्हा माझी आठवण कर........

मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशी गप्पा मारायला........ .

जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर.......

मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला......

कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही.....

माझ तस अस्तिव हि नाही......

पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....

तेव्हा माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....

तुझे अश्रू बनून......

तुझ्या वेदना घालवायला....... ♥♥♥

प्रेमात पडल की असच होणार

प्रेमात पडल की असच होणार....! दिवस
रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तीच व्यापुन
उरणार
येता जाता उठता बसता,
फ़क्त तीचीच आठवण येणार तुमच काय, माझ
काय,
प्रेमात पडल की असच होणार! डोळ्यात
तीच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तीच्या हास्यातुन आपल्यासाठी चादंणे
साण्डणार
ऐश्वर्याचा चेहरा सुद्धा मग; तीच्यापुढे
फ़ीका वाटणार तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
तीच्या फोनची आपण दिवसभर वाट
बघणार,
मित्रान समोर मात्र
बेफ़िकीरी दाखवणार
न रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तीचा आवाज ऐकुन सारा राग् विसरणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
मेसेजनी तीच्या inbox आपला भरुन
जाणार्,
तीचा साधा MSG सुध्दा आपण जतन
करुन ठेवणार्,
प्रत्येक sent MSG पहिला तीलाच
forward होणार,
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार....

आज मी तिला सगळ सांगणार होतो

आज मी तिला सगळ सांगणार होतो,
मनातील घुसमट अलगद मांडणार होतो..
प्रेमात वेडेपणाची मर्यादा मी आज तोडणार होतो,
वाटले होते प्रेम व्यक्त करावं..
तिच्या सहवासात मनसोक्त जागावं,
तिला माझ्यात सामावून घ्यावं..
आणि स्वतः तिच्या हवाली व्हावं,
पण रात्रभर मी विचार केला..
जर ती नाही म्हणाली तर..?????
प्रेमाचा स्वप्नमहाल बनण्या आधीचं,
कोसळला तर..?????
असे वाटते तिच्या मनात काय आहे,
याची चाहूल घ्यावी
तिलाही प्रेम व्यक्त करण्याची,
एक संधी द्यावी..
मला ती आवडते हा माझा स्वार्थ आहे,
तिला मी आवडत नसेल कदाचित..
तिचा विचारही सार्थ आहे,
म्हणून मग मी ठरवले
काहीच बोलायचे नाही..
प्रेम गमवावे लागले तरी चालेल,
पण..?????
मैत्री गमवायची नाही..

तुला सोडुन जान्याची खंत नेहमीच मला सतावत जाईल

तुला सोडुन जान्याची खंत
नेहमीच मला सतावत जाईल ।

खुप काही दिलं आणि
खुप काही घेवून जाईल ।

आठवणीँचे ओझे वाहून
नेताना सुखाचे मोती देवून जाईल ।

अश्रु नकळत टिपताना तुझे
मी ओठावर स्मितहास्य
सोडून जाईल ।

शिजविताना भविष्याचे
निखारे मी भुतकाळाला
स्मरत जाईल ।

जाता-जाता एकदा तुला
डोळेभरुन पाहून जाईल ।

एकांतात तूझेच शब्द मी
पुन्हा-पुन्हा गिरवत जाईल ।

जवळ होतो जेव्हा, तेव्हा
कदर नव्हती माझी मी
खुप-खुप दुर नीगून जाईल ।

विसरने मला, नाही होनार
शक्य तूला मी एकांतात
तूला रडवत जाईल ।

डोळे ओलावतील तूझे,
माझी कुशी तूला आठवत जाईल ।

मी जवळ नसेल तुझ्या पण
माझा आभास तूला सतावत जाईल ।

व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन

तो हातात गुलाब घेवून , चेहर्यावर
क्रिमचा लेप लावून व्हेलेंटाईन डे
च्या दिवशी तिला रस्त्यात गाठतो )
पुढे ...
तो - व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?
ती - तू इथून जा नाहीतर मीच निघून
जाईन .
तो - आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस
आणि तू
मला झिडकारतेस ,
खरं सांग मला, तू ही माझ्यावर प्रेम
करतेस ?
ती - प्रेम व्यक्त करण्यासाठी खास
दिवसाची गरज असते?
माझे तूझ्यावर प्रेम असते तर ,
तूला जायाला सांगीतले नसते
तो - मला माहित आहे तू खोटे बोलतेस ,
ह्या सुंदर डोळ्यात माझेच स्वप्न पहातेस
ती - माझ्या स्वप्नात सध्या नेहमीच भूत
दिसते,
तुला पाहिल्यावर मला त्याचीच आठवण
येते
तो - मग रोज घरी जाताना मागे
का वळ्तेस ?
सारखं मागे वळुन मला का पहातेस?
ती - मला मोकाट
सोडलेल्या कुत्र्यांची खूप
भिती वाटते
म्हणूनच मी सारखं मागे वळुन पहाते
तो - माझ्या प्रेमाचा असा अपमान
मी सहण
करणार नाही ,
आज तुझ्या मागे फ़िरून वेळ वाया घालवणार
नाही
ती - तुझा अपमान ही होऊ शकतो हे एकून
आनंद
झाला,
पण रोज माझ्या मागे फ़िरणार्याचा , आज
वेळ
कसा वाया गेला?
तो - ( खिशातील मुलींची नावे व पत्ते
असलेली लिस्ट काढून )
ही बघ माझ्याकडे केवढी मोठी लिस्ट आहे
या प्रत्येकीवर माझं मनापासून प्रेम आहे
आज प्रत्येकिला गाठून प्रेम व्यक्त करणार
एक -दोघींचा तरी होकार
मला नक्की मिळणार
ह्या दिवसाचा एक =एक क्शण
माझ्यासाठी अनमोल आहे
तूझं माझ्यावर प्रेम आहे का?
या सर्वांना विचारायचं आहे
ती - तूला आज नक्कीच योग्य मुलगी भेटेल,
जी तुझ्या कनाखाली चांगला गणपती काढेल
( दोघे ही आप -आपल्या मार्गाने जावू
लागतात . इतक्यात तिला आवाज
येतो व्हिल यू
बी माय व्हेलेंटाईन? आवाज देणारा तोच
असतो. खुप
राग आला असताना ही ती नकळत तो जवळ
येण्याची वाट पाहत थांबते. जवळ येताच
तो तिच्या हातावर
नावांची यादि असलेला कागद ठेवतो.
ती कागद पहाते आणि अचंबित होते.) पुढे ...
ती - ह्या कागदावर शेकडो वेळा फ़क्त
माझेच
नाव आहे .
मला सांगशिल का याचा अर्थ काय आहे?
तो - प्रत्येक मुलीत मला फ़क्त तूच दिसत
आहेस
मी फ़क्त तुझाच आहे , तुला एवढचं सांगायचं
आहे .
(चेहर्यावरचे दुःख लपवित तो चालू
लागतो ..
थोडा दूर जातो आणि त्याला आवाज येतो ..
व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?
तो वार्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने
वळुन
पाहतो. ती पुन्हा मोठ्याने ओरडत
त्याला विचारते ... व्हिल यू बी माय
व्हेलेंटाईन

मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन

ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.....
नक्कीच ही कविता चॉकलेट पेक्षा गोड असेल.......
मनातल्या मनात वाह म्हणून दाद देशिल......
सांग न माला..........खरंच का कधीतरी माझी होशील.....

ठाउक आहे मला काय चाललय तुझ्या मनात.......
फक्त एकदाच मन घटट करून.......सांगशील का गं माझ्या कानात.......
वाट पाहिन तुझ्या उत्तराची........खात्री आहे मला तुझा होकार असेल.......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......

आज भेटली ती मला......न मागताच चॉकलेट दिला मी तिला.....
हसत हसत म्हणाली का रे असा वागतोस........
मीच तुझ्याकडे मागते रोज.....तू का नाही माझ्याकडे चॉकलेट मागतोस......

नाही कळत मला चॉकलेटची गोडी......तुझ्यावीना कशी व्ह्ल्लवू संसाराची होडी......
जेंव्हा तुझ्या मनात माझ्या होडीत बसण्याची.......ओढ़ असेल......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......

रागाऊ नकोस माझ्यावर कधी...........तुझ्या बरोबर फिरायला.......
तू सांगशील तिथे येत जाईंन....मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

कधी देशील तुझा होकार मला......याची मी वाट पाहत राहीन.....
तुझ्या तोंडून कधी कडू शब्द येणार नाही म्हणुन मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

काय होईल पुढे, केंव्हा कधी कसे....याचीच वाट मी पाहत राहीन.......
मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन

यदा-कदाचीत असे घडावे

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात
पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे,
आणि तीच्यासाठी मीही किँचीतसे
... झूरावे.
महिन्यातून एकदा तीने उगाचच रूसावे,
आणि मी मनवता-मनवता खुदकन हसावे.
राञभर फोनवर तीने मला सतवावे,
दिवसभर मी तीला भेटीसाठी पटवावे.
कुठेतरी एकांतात चोरून भेटावे,
आणि जान्यासाठी घाई म्हणून
मी तीच्यावर रागवावे.
दोन दिवस अबोला पाळुन
एकमेकांना आठवावे,
मग छोटेसे प्रेमपञ तीने मला पाठवावे.
यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.

त्या दिवशी मी, प्रेमात पडलो,

त्या दिवशी मी, प्रेमात पडलो, 
 बरंच लागलं, पण रक्त … 
जखम वगैरे काही नाही दिसलं…. 
 तिने हसून माझ्याकडे पाहिलं, 
 आणि मी तिच्या डोळ्यातच हरवून गेलो … 
 तिच्या काळ्या काळ्या केसांत …. 
 मी स्वतः ला गुंतून बसलो …. 
 तेव्हा पासून मला Newton's Law , 
 चुकीचा वाटायला लागला.. 
 force of Gravity चा law लिहिताना, 
 तो थोडासा चुकला …. Apple 
झाडावरून सरळ…. जमिनीवरच पडलं, 
 पण प्रेमात पडल्यापासून…. 
 मला हवेत असल्या सारखं वाटायला लागलं…. 
 रात्रीच्या स्वप्नात… तिला पाहिलंच … 
 पण दिवस भर उघड्या डोळ्यात, 
 तिचंच स्वप्नं दिसत राहिलं … 
 आज-काल मला पावसात भिजावंसं वाटतं … 
 जुहू चौपाटी च्या वाळूवार चालावंसं वाटतं, 
 Bandstand वर तिच्या सोबत बसावंसं वाटतं … 
 Hiranandani Gardens मधेय फिरावंसं वाटतं … 
 त्या दिवसापासून मला …. "कुछ कुछ होता है" वगैरे वाटयाला लागलंय …. 
 त्यात अजून काय तर …. मला "दिल तो पागल है" 
सारखं गाणं पण आवडायला लागलंय ….
 तेव्हापासून माझं मन "Rocky " मधल्या संजय दत्त सारखं … 
 तिच्या शिवाय कुठेपण लागत नाही आणि वेळ पण जात नाही … 
 मी "मोहब्बते" मधल्या जिम्मी शेरगिल सारखा … 
 चालता चालता थांबतो … 
तर बसल्या बसल्या कुठेतरी हरउन जातो … 
 tweeter वर पण आज-काल मी फक्त … 
 "Love Quotes"च tweet करतो…. 
 माझा Facebook वरचा status पण … 
 असाच काहीतरी असतो …. 
 दिवसा गुलाबी ढगांत …. 
 लाल लाल सूर्य मला भासतो …. 
 तर रात्री … रंग बिरंगी .. 
 तारे आणि चंद्रा सोबत …. 
 तिचाच चेहरा मला दिसतो … 
 प्रेमात पडल्यापासून मी …. 
 जरा विचित्रच वागायला लागलोय …. 
 गप्पं गप्पं बसायला लागलोय …. 
 पण    मनातल्या मनात … 
 वादळांना सामोरे जायला लागलोय ….

असं का होत?

असं का होत? 
कुणीतरी खुप आवडायला लागत
अन ते आवडण एकाकी मनाला वेड लाऊ लागत 

असं का होत? 
कुणाचीतरी खुप आठवण यायला लागते 
अनं ती आठवणच आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागते 

असं का होत? 
कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येत ... 
अनं ते जवळ येण,आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जात 

असं का होत? 
कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो 
अन तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो...