प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!!!
ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं….,
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं….!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं…..,
मग त्याच्याच समजूतीने क्शणभर विसावं….!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!
वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं……,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं…..!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं…..,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं….!.
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!
वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं…..,
क्शणभर का होइना स्वतःला विसरुन बघावं……!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं…..,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं…..!!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..

किती छान असतो न हा खेळ मनाचा

किती छान असतो न हा खेळ मनाचा,
स्वप्नांचा आधार घेऊन हवेत भरारी मारण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजा आहे म्हणत स्वप्नात हरवण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तुझ्या माझ्या अबोल प्रीतीचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
मी करत आलेल्या एकतर्फी प्रेमाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू जवळ नसलास कि तुला अनुभवायचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
सत्यात न उतरणाऱ्या स्वप्नाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजाच म्हणून मनाला समजावयाचा
खरच खूप छान असतो रे हा खेळ मनाचा,
सत्य माहित असूनही मनालाच फसवण्याचा.. मनालाच फसवण्याचा !!!!!!!

♥ मुलगी नक्की कशी असते? ♥

♥ मुलगी नक्की कशी असते? ♥
तिचा प्रियकर तिला मिळायच्या आधी मुलगी म्हणते:

माझा प्रियकर परफेक्ट असायला हवा,
त्यानी माझ्यावर माझ्या पेक्षा जास्त प्रेम करावे,
... त्यानी मला कधी कध्धीच रडवू नये,
त्याने मला नेहमी समजून घ्यावे.

पण तिचा प्रियकर तिला मिळाल्या नंतर
ती म्हणते:

तो परफेक्ट नसला म्हणून काय झाले ??
तो माझा आहे. कारण मी त्याच्यावर खूप प्रेम करते.
तो माझ्यावर जास्त प्रेम करत नसला म्हणून काय झाले??
मी तर करते ना..

तो समजून घेत नसला म्हणून काय झाले??
मी तर समजून घेत आहे ना..
आणि नेहमी समजून घेत राहील,
कारण
मी माझ्या प्रियकरावर
खुप खुप खुप प्रेम करते
I LOVE HIM VEEEEEEEEEEEEEEEEEEEEEERY MUCH

अशा असतात या वेड्या मुली.

ती मात्र ओढनी सावरत सावरत

ती मात्र ओढनी सावरत सावरत
स्वत:शीच गुनगुनत होती
नकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी
मला हाथभार लावत होती
बसमधला प्रत्येक प्रवासी
आमच्याकडेच बघत होता
मी तेथुन केव्हा उठेल
बहुतेक याचीच वाट पहात होता

 तेवढ्यात बसच्या धक्क्याने
आमच्या दोघांतील अंतर कमी केले
एका मिनीटासाठी का होईना
मला स्वप्नाच्या दुणियेत नेले

मग दुस-या धक्क्यालाच मी
स्वप्नातुन बाहेर आलो
 एक मिनिटातच तिच्यासमवेत
बरीच काही लाईफ़ जगुन गेलो
येवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला
लेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला
तेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला
स्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला


 मग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी
ती तीची PURSE सावरायला लागली
गर्दित मला खेटत खेटत
स्वत:ची वाट काढु लागली

गुलाबी थंडीत

मारव्याचे एकाकी स्वर, मावळतीला सूर्याचा अस्त
बावरलेली संध्याकाळ, गारवा लपेटण्यात व्यस्त

पुन्हा उदास रात्र, थंडीने लागते बहरू
लाजत धुके हळूच, लागते फेर धरू

आखडलेले शरीर, प्रफुल्लित मन
पुन्हा एकाकी मी, सोबत तुझी आठवण

रक्त गोठवणारी थंडी , हातात हात तुझा
घातलेली तु शपथ "तु राहशील फक्त माझा"

कुड्कुडना-या थंडीतली, उबदार तुझी मिठी
उष्ण तुझे श्वास ,फुललेले माझ्यासाठी

दाट पांघरलेले धुके, दवबिंदूची आसवे
थंडीची प्रत्येक रात्र, मी जगतो तुझ्यासवे

आज नाहीस तु, फक्त तुझेच भास
गुलाबी थंडीत तुझ्या, आठवणींचा सहवास....

मला कुणी सांगेल का

मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

दिवस रात्र २४ तास फक्त तिलाच पुजयाच असत
तिच्याच आठवणीने स्वताला विसरायच असत
कॉलेज रूम रास्ता यात फक्त तिला शोधयाच असत
अन देवाकडे फक्त तिच्या दर्शानाच साकड़ घलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

जळी तळी आभाळी अन आरश्यात तिचे प्रतिबिम्ब बघायच असत
बघता बघता तिला आपण स्वताला हरवायच असत
कधी चुकून नजर भिडली तर नजरेला खाली झुकवायाच असत
अन चोरून फक्त तिला एकटक बघत बसयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती रोज स्वप्नात येते म्हणुन रोज सजुन लवकर झोपायच असत
अन स्वप्नात सुद्धा तिला फक्त बघून दुरून हसयाच असत
रोज सकाळी हातांच्या ओंजाळीत तिला पहयाच असत
देवाच्या आधी चुकून तिचेच नाव वदयाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

ती समोर नसतांना तिच्यावर सिंहा सारख काव्य म्हणयाच असत
ती वर्गात येताच मग सश्या सारख बेंच खाली लापयाच असत
आपण स्वत मुद्दाम चुकून आपल्या चुकान्वर तिला हसवायाच असत
ती हसताना तिच्या हास्य मोतिंना हळूच हृदयावर झेलायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

तिला सांगायला घाबरत असंलो तरी एकदा आवसान एकवटायच असत
भले ती स्वीकारो व ना स्वीकारो पाहिले प्रेम तिलाच अर्पायाच असत
हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत

फक्त तू

तो delete करणारी तू...
माझा call पाहता,
तो cut करणारी तू...
मी समोर दिसता,
... मला न पहिल्या सारखं करून,
पुढे निघून जाणारी तू...
अन,
पुढे गेल्यावर,
हळूच मागे वळून,
मला पाहणारी तू...
आपल्या breakup नंतर,
आपल्याच मित्रान मध्ये,
मला विसरण्याचा प्रयेत्न करणारी तू...
अन,

कोणी माझ्या बद्दल काही विचारलं तर,
फक्त गप्पा राहणारी तू ...
माझी आठवण,
आल्यावर चोरून रडणारी तू...
आणि,
जगा समोर गोड गोड हसणारी तू..
रोज मला पाहून,
न पहिल्या सारखा करणारी तू...
अन,
माझ्या हातात सिगारेट पहिली कि,
"सिगारेट तक खाली,
आणि घरी जा... "
असं,
फोने करून बजावणारी सुधा तूच....
प्रेम असून हि,
नाही असं भासवणारी तू...
अन,

breakup नंतर सुद्धा,
माझ्या वर जीवपार,
प्रेम करणारी तू...
माझ्या वर जीवपार,
प्रेम करणारी तू.





कळत नाहीत वाटा,

कळत नाहीत वाटा,
तिकडे कशाला जायचं..?
आपले नव्हते जे,
त्यांना का आठवायचं..?

ज्यांना विश्वास कधी,

समजला नाही..
त्यांना का आपण,
खास काही सांगायचं..?

आहेत आपल्याकडे 

शब्द मांडायला,
न ऐकनार्यांसाठी,
का ओरडायचं..?

भावना आहेत मनी,

त्यांना फक्त मांडायचं,
आपला काही चुकतं,
म्हणून गप्प का राहायचं..?

नाही सापडलं उत्तर,

तर प्रश्नांना नाही टाळायचं,
जगासमोर एक,
आपलं उदाहरण ठेवायचं..!!


 विरहात जगून काय सिद्ध करू पाहताहेत ? तुमचं प्रेम किती महान होत ते ? प्रेम म्हणजे एका वाहत्या नदी प्रमाणे असतं.. प्रवाहात नेहमीच पुढे वाहत असतं.. एका ठिकाणी थांबलं तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं.. ..आणि पुढे सरकत राहिलं तरच सागराशी मिळतं..... 

जेव्हा काही चुकत असेल

जेव्हा काही चुकत असेल.....तेव्हा माझी आठवण कर......

तुला आठवेल बरोबर असलेल....

जेव्हा कधी संकटात असेल.........तेव्हा माझी आठवण कर........

तुझ्या मनात असेल तुला सावरायला.....

जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल.....तेव्हा माझी आठवण कर........

मी येईल वाऱ्‍याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला........ ..

जेव्हा तू झोपला असेल.........तेव्हा माझीआठवण कर........

मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला....... ..

जेव्हा तू एकटा असशील तेव्हा माझी आठवण कर........

मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशी गप्पा मारायला........ .

जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर.......

मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला......

कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही.....

माझ तस अस्तिव हि नाही......

पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....

तेव्हा माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....

तुझे अश्रू बनून......

तुझ्या वेदना घालवायला....... ♥♥♥

डिव्होर्स हवाय !!!

दारावरची बेल वाजते. एक तरुण पुरुष दार उघडतो... तरुण स्त्री अत्यंत वैतागून आत येते.
दार लावून घेते. तो परत जे काम करत असतो त्यात गर्क होतो. ती बसून राहते , थोडा वेळ शांतता.

...

ती : मला डिव्होर्स हवाय....

तो : काय झालं ?

ती : आताच्या आता.... ताबडतोब मला डिव्होर्स दे.

तो : पण का ?

ती : मग तरी निदान - डिव्होर्सच्या धक्क्यातून सावरायला मी कुठेतरी लांब जाऊ शकेन दुख , यातना विसरण्यासाठी ... कुठल्यातरी अभयारण्यात एकटी फिरेन. ना ही गर्दी असेल ना ट्रॅफिक जॅम. तुला माहितीये , चर्चगेट टू अंधेरी फास्ट ट्रेनने बरोबर ३५ मिनिटांत पोहोचले पण अंधेरी टू घर , दीड तास. इतका ट्रॅफिक जॅम होता की मी बसमधून उतरले नि चालू लागले. रस्ते पण इतके घाण झालेत आणि... आणि सतत कुठून तरी कोणी तरी थुंकत असतं. स्वत:ला बचावत कशीबशी पुढे आले , रिक्षा केली तर रिक्षावाल्यानेही फसवलं. सगळे फसवतात रे आपल्याला. आपण टीव्ही नाही घेतला , आपल्याकडे गिझर नाही तरी इलेक्ट्रिकचं बिल भरभसाट , मोबाइलवर पण कामापुरतं बोलूनही भयानक बिल. ते वाचलंस ना दुधात भेसळ , भाज्यांना केमिकल्स लावून हिरवं करणं - मला राग येतोय. त्यात आपली लिफ्ट बंद होती. मेण्टेनन्स कशासाठी भरायचा मग... मला डिव्होर्स दे किंवा दूर कुठेतरी घेऊन चल , कंटाळा आलाय - रोज तेच तेच...

तो : चल आताच्या आत निघू जी ट्रेन मिळेल त्यात बसू जिथे वाटेल तिथे उतरू कोणाहीकडे राहू दोन दिवस मुक्काम परत खांद्यावर शिदोरी घेऊन पुढे जाऊ रात्रभर तारे बघू , शेतात फिरू , उन्हात रापू , दिवसभर समुद्रकिनारी पहुडून राहू...चल.

ती : खरंच जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं - असंच असावं ना आयुष्य.

तो : आर यू शुअर तिथे गेल्यावर गावात फिरताना कुठल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल
आपल्या कानावर येणारच नाही ? समुद्रातही किती प्रदूषण वाढलंय दिसणारच नाही
आपल्याला - म्हणजे आपण अगदी ठरवलं तर कदाचित नाही कळणार. आपल्याला सगळे
सेन्सेज बंद करायची सवय तर लागलीच आहे म्हणा...

ती : बघू तू परत मला निराश करतोयस. मला माहितीये सगळं वास्तव भयाण आहे.
पण एखादी वा-याची झुळूक कावळा , चिमणी , कबूतराव्यतिरिक्त एखादा पक्षी दिसणं ?
जाऊ देत काहीच शक्य नाही - आणि रोजची पैसा मिळवून देणारी कामं सोडून जायची
धमकही नाहीये रे - उद्या माझं प्रपोजल सँक्शन होईल का ? आज बॉस खुश झाला - बास्स एवढंच आयुष्य...
म्हणून मला एखाद्या मोठ्या धक्क्याची गरज आहे - दे ना रे डिव्होर्स मला किंवा एखादं अफेअर कर...

तो : चहा घेतेस ? नाही मस्त लिंबू सरबत करतो तुझ्यासाठी - फ्रेश वाटेल. मग बोलू अफेअरबद्दल...

( ती हसते - हळूच त्याला मिठी मारते)

ती : चल परत पळून जाऊ या...

तो : उद्या बघू...

प्रेमात पडल की असच होणार

प्रेमात पडल की असच होणार....! दिवस
रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुद्धा आपल्या तीच व्यापुन
उरणार
येता जाता उठता बसता,
फ़क्त तीचीच आठवण येणार तुमच काय, माझ
काय,
प्रेमात पडल की असच होणार! डोळ्यात
तीच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,
तीच्या हास्यातुन आपल्यासाठी चादंणे
साण्डणार
ऐश्वर्याचा चेहरा सुद्धा मग; तीच्यापुढे
फ़ीका वाटणार तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
तीच्या फोनची आपण दिवसभर वाट
बघणार,
मित्रान समोर मात्र
बेफ़िकीरी दाखवणार
न रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,
तीचा आवाज ऐकुन सारा राग् विसरणार
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार!
मेसेजनी तीच्या inbox आपला भरुन
जाणार्,
तीचा साधा MSG सुध्दा आपण जतन
करुन ठेवणार्,
प्रत्येक sent MSG पहिला तीलाच
forward होणार,
तुमच काय, माझ काय,
प्रेमात पडल की असच होणार....

तुला सोडुन जान्याची खंत नेहमीच मला सतावत जाईल

तुला सोडुन जान्याची खंत
नेहमीच मला सतावत जाईल ।

खुप काही दिलं आणि
खुप काही घेवून जाईल ।

आठवणीँचे ओझे वाहून
नेताना सुखाचे मोती देवून जाईल ।

अश्रु नकळत टिपताना तुझे
मी ओठावर स्मितहास्य
सोडून जाईल ।

शिजविताना भविष्याचे
निखारे मी भुतकाळाला
स्मरत जाईल ।

जाता-जाता एकदा तुला
डोळेभरुन पाहून जाईल ।

एकांतात तूझेच शब्द मी
पुन्हा-पुन्हा गिरवत जाईल ।

जवळ होतो जेव्हा, तेव्हा
कदर नव्हती माझी मी
खुप-खुप दुर नीगून जाईल ।

विसरने मला, नाही होनार
शक्य तूला मी एकांतात
तूला रडवत जाईल ।

डोळे ओलावतील तूझे,
माझी कुशी तूला आठवत जाईल ।

मी जवळ नसेल तुझ्या पण
माझा आभास तूला सतावत जाईल ।

व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन

तो हातात गुलाब घेवून , चेहर्यावर
क्रिमचा लेप लावून व्हेलेंटाईन डे
च्या दिवशी तिला रस्त्यात गाठतो )
पुढे ...
तो - व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?
ती - तू इथून जा नाहीतर मीच निघून
जाईन .
तो - आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस
आणि तू
मला झिडकारतेस ,
खरं सांग मला, तू ही माझ्यावर प्रेम
करतेस ?
ती - प्रेम व्यक्त करण्यासाठी खास
दिवसाची गरज असते?
माझे तूझ्यावर प्रेम असते तर ,
तूला जायाला सांगीतले नसते
तो - मला माहित आहे तू खोटे बोलतेस ,
ह्या सुंदर डोळ्यात माझेच स्वप्न पहातेस
ती - माझ्या स्वप्नात सध्या नेहमीच भूत
दिसते,
तुला पाहिल्यावर मला त्याचीच आठवण
येते
तो - मग रोज घरी जाताना मागे
का वळ्तेस ?
सारखं मागे वळुन मला का पहातेस?
ती - मला मोकाट
सोडलेल्या कुत्र्यांची खूप
भिती वाटते
म्हणूनच मी सारखं मागे वळुन पहाते
तो - माझ्या प्रेमाचा असा अपमान
मी सहण
करणार नाही ,
आज तुझ्या मागे फ़िरून वेळ वाया घालवणार
नाही
ती - तुझा अपमान ही होऊ शकतो हे एकून
आनंद
झाला,
पण रोज माझ्या मागे फ़िरणार्याचा , आज
वेळ
कसा वाया गेला?
तो - ( खिशातील मुलींची नावे व पत्ते
असलेली लिस्ट काढून )
ही बघ माझ्याकडे केवढी मोठी लिस्ट आहे
या प्रत्येकीवर माझं मनापासून प्रेम आहे
आज प्रत्येकिला गाठून प्रेम व्यक्त करणार
एक -दोघींचा तरी होकार
मला नक्की मिळणार
ह्या दिवसाचा एक =एक क्शण
माझ्यासाठी अनमोल आहे
तूझं माझ्यावर प्रेम आहे का?
या सर्वांना विचारायचं आहे
ती - तूला आज नक्कीच योग्य मुलगी भेटेल,
जी तुझ्या कनाखाली चांगला गणपती काढेल
( दोघे ही आप -आपल्या मार्गाने जावू
लागतात . इतक्यात तिला आवाज
येतो व्हिल यू
बी माय व्हेलेंटाईन? आवाज देणारा तोच
असतो. खुप
राग आला असताना ही ती नकळत तो जवळ
येण्याची वाट पाहत थांबते. जवळ येताच
तो तिच्या हातावर
नावांची यादि असलेला कागद ठेवतो.
ती कागद पहाते आणि अचंबित होते.) पुढे ...
ती - ह्या कागदावर शेकडो वेळा फ़क्त
माझेच
नाव आहे .
मला सांगशिल का याचा अर्थ काय आहे?
तो - प्रत्येक मुलीत मला फ़क्त तूच दिसत
आहेस
मी फ़क्त तुझाच आहे , तुला एवढचं सांगायचं
आहे .
(चेहर्यावरचे दुःख लपवित तो चालू
लागतो ..
थोडा दूर जातो आणि त्याला आवाज येतो ..
व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?
तो वार्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने
वळुन
पाहतो. ती पुन्हा मोठ्याने ओरडत
त्याला विचारते ... व्हिल यू बी माय
व्हेलेंटाईन

मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन

ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.....
नक्कीच ही कविता चॉकलेट पेक्षा गोड असेल.......
मनातल्या मनात वाह म्हणून दाद देशिल......
सांग न माला..........खरंच का कधीतरी माझी होशील.....

ठाउक आहे मला काय चाललय तुझ्या मनात.......
फक्त एकदाच मन घटट करून.......सांगशील का गं माझ्या कानात.......
वाट पाहिन तुझ्या उत्तराची........खात्री आहे मला तुझा होकार असेल.......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......

आज भेटली ती मला......न मागताच चॉकलेट दिला मी तिला.....
हसत हसत म्हणाली का रे असा वागतोस........
मीच तुझ्याकडे मागते रोज.....तू का नाही माझ्याकडे चॉकलेट मागतोस......

नाही कळत मला चॉकलेटची गोडी......तुझ्यावीना कशी व्ह्ल्लवू संसाराची होडी......
जेंव्हा तुझ्या मनात माझ्या होडीत बसण्याची.......ओढ़ असेल......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......

रागाऊ नकोस माझ्यावर कधी...........तुझ्या बरोबर फिरायला.......
तू सांगशील तिथे येत जाईंन....मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

कधी देशील तुझा होकार मला......याची मी वाट पाहत राहीन.....
तुझ्या तोंडून कधी कडू शब्द येणार नाही म्हणुन मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......

काय होईल पुढे, केंव्हा कधी कसे....याचीच वाट मी पाहत राहीन.......
मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन

यदा-कदाचीत असे घडावे

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात
पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे,
आणि तीच्यासाठी मीही किँचीतसे
... झूरावे.
महिन्यातून एकदा तीने उगाचच रूसावे,
आणि मी मनवता-मनवता खुदकन हसावे.
राञभर फोनवर तीने मला सतवावे,
दिवसभर मी तीला भेटीसाठी पटवावे.
कुठेतरी एकांतात चोरून भेटावे,
आणि जान्यासाठी घाई म्हणून
मी तीच्यावर रागवावे.
दोन दिवस अबोला पाळुन
एकमेकांना आठवावे,
मग छोटेसे प्रेमपञ तीने मला पाठवावे.
यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.

त्या दिवशी मी, प्रेमात पडलो,

त्या दिवशी मी, प्रेमात पडलो, 
 बरंच लागलं, पण रक्त … 
जखम वगैरे काही नाही दिसलं…. 
 तिने हसून माझ्याकडे पाहिलं, 
 आणि मी तिच्या डोळ्यातच हरवून गेलो … 
 तिच्या काळ्या काळ्या केसांत …. 
 मी स्वतः ला गुंतून बसलो …. 
 तेव्हा पासून मला Newton's Law , 
 चुकीचा वाटायला लागला.. 
 force of Gravity चा law लिहिताना, 
 तो थोडासा चुकला …. Apple 
झाडावरून सरळ…. जमिनीवरच पडलं, 
 पण प्रेमात पडल्यापासून…. 
 मला हवेत असल्या सारखं वाटायला लागलं…. 
 रात्रीच्या स्वप्नात… तिला पाहिलंच … 
 पण दिवस भर उघड्या डोळ्यात, 
 तिचंच स्वप्नं दिसत राहिलं … 
 आज-काल मला पावसात भिजावंसं वाटतं … 
 जुहू चौपाटी च्या वाळूवार चालावंसं वाटतं, 
 Bandstand वर तिच्या सोबत बसावंसं वाटतं … 
 Hiranandani Gardens मधेय फिरावंसं वाटतं … 
 त्या दिवसापासून मला …. "कुछ कुछ होता है" वगैरे वाटयाला लागलंय …. 
 त्यात अजून काय तर …. मला "दिल तो पागल है" 
सारखं गाणं पण आवडायला लागलंय ….
 तेव्हापासून माझं मन "Rocky " मधल्या संजय दत्त सारखं … 
 तिच्या शिवाय कुठेपण लागत नाही आणि वेळ पण जात नाही … 
 मी "मोहब्बते" मधल्या जिम्मी शेरगिल सारखा … 
 चालता चालता थांबतो … 
तर बसल्या बसल्या कुठेतरी हरउन जातो … 
 tweeter वर पण आज-काल मी फक्त … 
 "Love Quotes"च tweet करतो…. 
 माझा Facebook वरचा status पण … 
 असाच काहीतरी असतो …. 
 दिवसा गुलाबी ढगांत …. 
 लाल लाल सूर्य मला भासतो …. 
 तर रात्री … रंग बिरंगी .. 
 तारे आणि चंद्रा सोबत …. 
 तिचाच चेहरा मला दिसतो … 
 प्रेमात पडल्यापासून मी …. 
 जरा विचित्रच वागायला लागलोय …. 
 गप्पं गप्पं बसायला लागलोय …. 
 पण    मनातल्या मनात … 
 वादळांना सामोरे जायला लागलोय ….

एक छोटीशी प्रेम कथा

होता एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करायचा...म्...हणतात ना शोदनार्याला देव हि मिळतो...........तसेच ह्याने तिला शोधले होते. तीन वर्षाच्या प्रयात्ना नंतर ह्याने तिला मिळवलं होत..दोगेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे...तीच जरा जास्तच होत.पण काय करणार दोघांची हि भेट होण शक्य न्हवती.कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला..फोन वर बोलन तसे दररोजचेच.पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे.........

पण एक दिवस पूर्ण नूरच पालाडतो....ह्याला अचानक रक्ताच्या उलट्या होतात..ह्याला डॉक्टर कडून समजत कि मला कर्क रोग झालाय.आणि माज्या हातात फक्त सहा महिने उरले आहेत.हा तिला समजू देत नाही....कारण सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस असतो....आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला पहायचे असते...
...
तिच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात..आणि ह्याला कळून चुकलेले असते कि आपली वेळ जवळ आलीय ..हा मनात विचार करतो कि हिच्या वाढदिवशी आपण हिला शेवटच पहायचं आणि मगच आपण आपले प्राण सोडायचे...सतत चार दिवस हा तिला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहिली भेट झाली होती...तिच्या कॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ असे त्याला सांगते...हा तिला शेवटच विचारतो कि तुला यायचं आहे कि नाही...कसलाही न विचार करता ती त्याला नाही सांगते...

वाढदिवसाचा दिवस उजाडतो....ह्याची वेळ जवळ आलेली असते ह्याच्याकडे फक्त तीन मिनिटे असतात...हा तिला फोन करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो...हि त्याला विचारते काय करतोयस.........आणि हा शेवटी एवड्च म्हणतो....

आज मी मृत्युच्या दारी उभा आहे ग........................मरता मरता तुला तुझ्या वाढदिवशी शेवटच पहायची मनापासून खूप इच्छा होती ग...पण तुही नाही म्हणालीस...........जाता जाता तुझ्या मिठी मध्ये यायचं होत पण तुला भेटायचे न्हवत...................तेव्हा तर नाही पण मला मेल्यावर तरी मिठी मध्ये घेशील ना?????हि विचारते काय झाल आणि फोन कट होतो............हि त्याच्या घरी येते पण वेळ निघून गेलेली असते......तिला त्याच्या आईकडून समजत.......हि जेव्हा त्याला आपल्या मिठी मध्ये घेऊन रडत असते तेव्हा त्याचा डावा हात खाली पडतो..त्याच्या हातावर लिहिलेलं असत कि.................

ए जाणू नको रडूस ग...
कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले .मला माफ कर..............................

ह्यांनी ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं असत त्याच ठिकाणी हि प्रेम वेडी आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते...फक्त ह्याच आशेने कि तो कुणाच्या तरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल...पण म्हणतात ना

(डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो.पण माथ्या आड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही........: --

मुली कशा पटवाव्या…

मुली कशा पटवाव्या…
मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टच असतात
प्रेमात पडण्याच्याबाबतीत.
तशीही प्रत्येकाच ीच इच्छा असते
एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास
९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे तुज पाशी, परी तु
जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ’प्रेम’
कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न
ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं
आणि मग हात चोळत बसावं लागतं.
प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात
मोठा कधीही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं
म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे अगदी सेफ
असते. पण होतं काय,
की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत मुलाला)
लहान पणी शेंबुड
पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं
असतं, मोठा झाल्यावर त्याची /
किंवा तिची ती नाक
पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही,
त्या मुळे सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट
दुर्लक्षिली जाते.. ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के
लोकांच्या बाबतीत खरी असते, अगदी एक
टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात झालेलं
रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच लोकं
खरे शहाणे असतात.
आता यात दिलेल्या कलुप्त्या या फार
जुन्या काळच्या आहेत.. तरी पण
आजही त्या पर्फेक्ट ऍप्लिकेबल आहेत.

१) बसमधे आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं
तिकिट काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं,
आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर
खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात
तुम्ही जवळचे सुटे पैसे काढून देता आणि……पुढे
तुमच्यावर अवलंबून कुठपर्यंत केस नेता ते.

२)ट्रेनमधेभरपूर मराठी वाचनीय साहित्य
घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली,
तर ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक
जरा देता का वाचायला म्हणून पुस्तक मागेल,
आणि मग ओळख …. वगैरे….

३) खूप लोकप्रिय सिनेमाची तिन तिकिटे
काढावी. सिनेमा हाऊस फुल्ल जाणार आहे
याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु
व्हायची वेळ झाली की बाहेर
कोणाची तरी वाट पहातोय असा आव आणा,
आणि सारखं घड्य़ाळाकडेबघत रहा. हाउस फुल्ल
चा बोर्ड लागला की दोन सुंदर तरुणी ,
ज्यांच्याकडे तिकिटं नाहीत अशांना हेरून
त्यांना तिकिटं आहे त्याच किमतीत ऑफर करा..
आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण
आला नाही म्हणून….
आता इथे दोन तिकिटंएक्स्ट्रॉ कशाला??? तर
याचं कारण म्हणजे मुली एकट्या कधीच
सिनेमाला जात नाही्त, एक तर बॉय फ्रेंड
तरी असतो, किंवा एखादी मैत्रीण
तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर
आलेल्या मुलीचा शोध घ्यायचाय हे ध्यानात
ठेवा.. जर एकही मुलगी भेटली नाही , तर तीच
तिकिटे.. मी ब्लॅक मधे घेतली आहेत असं म्हणून
चढ्या किमतीत कुणाही माणसाला विकून टाका.

४)टॅक्सी साठी उभे आहात, आणि बऱ्याच
वेळानंतर टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन
तिला लिफ्ट ऑफर करा..

५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत
असतांना एकदम जोरात पाउस येतो,
आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार
होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच
आडोसा नाही, तेंव्हा प्रवास
करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन चला काय
सांगावं कधी उपयोगी पडेल ते??…..

६) एखादी आपल्या घराच्या आसपास
रहाणारी सुंदरी हेरुन ठेवा.
तिची रोजची प्रवास करण्याची गाडी हेरुन
ठेवा, आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडीने
प्रवास करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात
की शेअर रिक्शा वगैरे साठी ऑफर करु शकता.
तिच्या येण्याच्यावेळाचे पण पालन करा.
म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त असेल.

७)मुलींमधले धार्मिक प्रवृत्ती फार वाढीस
लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक,
साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात
जाणं सुरु करा. चेहेऱ्यावरशक्य तेवढे बावळट
भाव ठेऊन हातात, फुलांची परडी घेउन रांगेत
अशा तर्हेने उभं रहा, की तिच्या नजरेस
तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास
बसला की तुम्ही इतरांसारखेनाही,
तेंव्हा हळूच ओळख वाढवायला हरकत नाही. अरे
वा…. तुम्ही पण
येता का सिध्दी विनायकाला?? जागृत
देवस्थान बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या
कळसालाच बघून हात जोडा आणि पुढे तुमच्याच
हातात आहे सगळं….

८)गणपती विसर्जन ,दहीहंडी अशा इव्हेंट्स
कधीच चुकवू नका.अशा प्रसंगी मुलींना बाहेर
फिरायला खूप आवडतं.

९) टिपीकल मराठमोळ्या
मुली या नाटकालाच भेटतातच, इथे पण तशीच
दोन तिकिटं एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु
शकते.

१०)दुचाकी वर लिफ्ट द्या. शक्य होईल
तेंव्हा मी तिकडेच जातोय, चला तुम्हाला सोडून
देतो, असं म्हणून लिफ्ट द्यावी.
हल्ली चेहेरा ओढणीने झाकून प्रवास
करण्याची पद्धत आहे, म्हणजे कोणी ओळखेल
याची भिती नसते.

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,

आम्हा दोघांची मने जुळावी,

हातात हात घालून फ़िरणारी

मलाही girl friend मिळावी...



हास्याच्या पहिल्या किरणाने,

प्रितीची खळी उमलावी,

डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,

रूपाची ती राणी असावी...

अशीच माझी स्वप्नसुंदरी,

ह्र्दयाच्या नगरात रुळावी,

हातात हात घालून फ़िरणारी,

मलाही girl friend मिळावी...



चौपाटीवर पाणीपूरीतून

प्रणयाचेच घास भरवू,

रिक्षात मीटरला साक्षी मानून,

प्रेमाच्याच शपथा घेऊ,

आयुष्यातील सारी दु:खं

जिच्या सहवासात टळावी,

हातात हात घालून फ़िरणारी

मलाही girl friend मिळावी...



द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,

आधी girl की आधी friend...

आयुष्यभराचं नातं हवं,

देव करो तीच्याकडूनचं

प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी,

हातात हात घालून फ़िरणारी,

मलाही girl friend मिळावी...