मराठी विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी विनोद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पावडर

एकदा एक बाई दुकानात जाऊन मुंग्यांची पावडर मागते,
शेजारी उभी असनारी बाई तिला म्हणते'
अहो मुंग्यांचे एवढे लाड करु नका,
आज पावडर मागितली उद्या लिपस्टीक मागतील !

सासुरवाडी

 काय उपयोग एवढ्या शिक्षणाचा? 




जर शेवटपर्यंत हेच माहीत नाही की,

.
.
.
.
.
.
सासुरवाडीला इंग्रजीत काय म्हणतात…???



कोणाला माहित असेल तर सांगा बर…!

लॉकडाउन special

 लॉकडाउनमध्ये नवरा स्वयंपाक करायला शिकतो.


नवरा - काय गं, भाजीत मीठ किती टाकू?

बायको - काय हो, तीन महिने झाले तुम्ही भाजी बनवताय. अजून भाजीत मीठ किती टाकायचं याचा अंदाज येत नाही तुम्हाला.

आणि बायोडेटामध्ये का लिहिता... 
.
.
.
.
.
.
.
.
क्विक लर्नर अँड एक्स्ट्राऑर्डिनरी डिसिजन मेकिंग स्किल्स 

मॅगी व पुरणपोळीत

 नवराः तुला तयार व्हायला खूप वेळ लागतो


मी दोन मिनिटांत तयार झालो
.
.
.
.
.
.
.
.
.
बायकोः मॅगी व पुरणपोळीत फरक असतो

ऑनलाइन शिकवणी

 टीचर :- मुलांनो, ऑनलाइन शिकवणीला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय. मन लावून अभ्यास करताय. तुम्हाला आवडतंय ना? 


विद्यार्थी :- होsssss!

टीचर :- मी काय सांगतेय, ते तुम्हाला समजतंय ना?

विद्यार्थी :- होssss!

टीचर :- सांगा बघू, आज काय काय समजलं तुम्हाला?

गण्या :- तुमच्या घरची चहा पावडर संपली आहे. टॉयलेटचा फ्लश बिघडला आहे आणि आज सकाळी काकांनी केलेल्या पोळ्या करपल्या होत्या.

वर्ष 2020

 २०२० हे वर्ष काही वेगळंच आहे.


दरवर्षी सणासुदीला सुट्ट्या असायच्या.

..

पण यावर्षी...

...

सुट्ट्यांमध्येच सण येत आहेत.

पुर्ण सोसायटी क्वारंटाइन

 आज आजीने मुलांची नजर उतरवायला मिर्चीचा वापर केला


अनं ...

जश्या मिर्च्या चुलीत टाकल्या...पूर्ण सोसायटी खोकायला लागली


मग काय
.
.
.
महापालिका आरोग्य विभाग आले

अनं......

आज पुर्ण सोसायटी क्वारंटाइन आहे

5 स्टार हॉटेल

5 स्टार हॉटेल मध्ये पहिल्यांदा गेलेल्या एका माणसान चहाची ऑर्डर दिली.

वेटरन गरम पाणी, टी ब्याग, साखर, दुध आणून त्याच्या समोर ठेवले ...

कसाबसा चहा पेल्यावर

वेटरन विचारल "अजुन काही घेणार का?"

माणूस म्हणाला "भज्जी खायाची व्हती , पण राहू दे. तू कढई, तेल, बेसन, कांदे आणून ठेवशील. "😳😁😂😂😂😂😂😂😂

बायको आई

बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते.
नवरा : काय सांगतेस … तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो
नवरा : अरे देवा … आणि मी त्या माऊलीला आतापर्यंत वाईट समजत होतो
😀😝😆😜🙄😅

लग्न

बायको : माझं लग्न जर एखाद्या राक्षसाशी झालं असतं ना तरी मी आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तुझ्याबरोबर कंटाळलेय
नवरा : अगं वेडी, रक्ताच्या नात्यांमध्ये कुठे लग्नं होतात काय?
😃😄😜😜😝😝😁

इलेक्ट्रिक वायर

गुरुजी - सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात ??

गण्या - कारण भारतातील बायका त्यावर पण कपडे वाळत घालायला कमी करणार नाहीत..

लागीर झालं जी...

तिकड आज्या ची मामी आज्यान जयडी बर लगीन कराव मणुन काय काय गेमा करत्या ......
😇😇😇😇😇😇

















आणि आमची मामी नुसतं घरी गेलो तरी असं तोंड ☹☹ करत्या की तिच्या पोरीला पळवून च न्याला आलोय ....

😆😆😆😆😆😆😆
😂😂😂😂😂😂😂

सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता?

शिक्षक :- सांगा, सर्वात उंच उडणारा पक्षी
              कोणता?
पप्या    :- हत्ती
शिक्षक :- नालायक हत्ती हा पक्षी आहे का?
              घरी अभ्यास कोण घेतं तुझा?
पप्या    :- आई
शिक्षक :- मगं वडील काय करतात?
पप्या    :-  ते सांगली पोलिस मध्ये आहेत
शिक्षक :- मुलांनो, लिहा हत्ती हा सर्वात उंच
              उडणारा पक्षी आहे.

    
😂😂😂😝😝😝👌👌👌😳😄🔫🔫🔫🔫🔫🔫🔫

मराठी उखाणे भाग १

देवयानी :
कधी सरळ चाले कधी उलटा वळॆ एकदम
काय म्हणू सांगा याला विक्रम की चक्रम

प्रिय दर्शिनी :
स्वतःला म्हणवून राजे, चालतात उंटासारखे तिरके
फ़ुटक्या माझ्या नशिबी आले रणवीर राजेशिर्के 

रागिणी :
तळ्यामधल्या चिखलात जणू उगवलय कमळ
राजेशिर्के असून देखील नील माझा निर्मळ

साक्षी :
काय सांगू तळोबा वाटे मला लाज
असा कसा अतिरेकी झाला माझा राज


chandichya tatat jilebiche tukade
ghas bharavate melya thobad kar ikade

anyways bakichehi chan aahet

आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......

आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..



आजघर माजघर माजघराला नाही दार
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार


सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!


bashit bashi kachechi bashi...............
bashit bashi kachechi bashi...
Mazi bayko sodun sarv Mhashi..................






हास्यकट्टा

नवरा : अग, हे बघ ह्या मासिकात दिलंय ? शहामृग मोठा गंमतीचा प्राणी आहे. त्याला कमी दिसते आणि त्यांची पचनशक्ती इतकी प्रचंड आहे की त्याच्यापुढे वाटेल ते टाकले तरी तो ते खातो आणि तो ते पचवतोसुध्दा बायको : आदर्श नवऱ्याचे सगळे गुण आहेत की त्यात.


नलिनी हिरवे यांनी नवीन बंगला बांधला आणि दारावर लावण्यासाठी एका पाटीची ऑर्डर पेंटरला दिली. नावाचा फलक कसा पाहिजे त्याचा तपशील कागदावर लिहून त्यांनी पेंटरला दिला आणि त्याप्रमाणे फलक तयार करून त्या पेंटरने बाईंच्या नोकराकडे फलक पाठवला. मात्र फलक पाहिल्यावर बाई बेशुध्द पडल्या...कारण? .. ...कारण त्या फलकावरचा तपशील होता, " नलिनी हिरवे , रंग काळा , आकार दीड फुट बाय अडीच फुट, वळण चांगले हवे, बिल मिळाल्यावर पैसे मिळतील."


सान्ता की मा : 20 साल ताक मेरी कोई औलाद नही हुई. प्रेस रिपोर्टर : फिर अपने क्या किया? . . ... . . . . . . . मा : फिर मै 21 साल की हुई तो पापा ने मेरी शादी कराई फिर जा के सान्ता हुआ... :p


१ आरोपीला कोर्टात २ खुनांच्या आरोपात हजर केलेले... जज: तूम्ही तूमच्या बायकोला हातोड्याने मारल्याचा आरोप तुमच्यावर आहे.. (मागून आवाज येतो, "हरामखोर...") जज: (दुर्लक्ष करून) तसेच तूमच्या सासूला सुद्धा तूम्ही हातोड्याने मारून निर्घृण हत्या केली आहे... (पुन्हा मागून आवाज येतो, "अरे दगाबाज....") जज: (त्याच्याकडे पाहून) हे पहा तुमचा राग मी समजू शकतो... पण तूम्ही असे कोर्टात ओरडू शकत नाही.. अथवा मला तुमच्यावर पण खटला भरावा लागेल... मी ह्या आरोप्याला योग्य ती शिक्षा देणार आहे. तूम्ही कृपया शांत रहा... तो माणूस: अहो तस नाही ओ, मी ह्याचा शेजारी आहे आणि आत्तापर्यंत ३-४ वेळा ह्याच्याकडे हातोडा मागितला... आणि हा हरामखोर माझ्याकडे नाहीये अस बोलला.. :-D :-D


एकदा एक हाताचे नख दुसऱ्या नखा बरोबर लग्न करते, आणि सोमवारी त्यांना मुलगा होतो तर त्याचे नाव कायम ठेवतील ते? . . . . . . . . अंदाज सांगा पाहू. . . . . . . . NAILson MONDAYla...


एका एअरलाईन कंपनीने सर्व उद्योजक लोकांसाठी एका ट्रीपची ऑफर दिली. तुमच्या तिकिटावर तुमच्या बायकोचे तिकिट फ्री... नंतर एक महिन्याने त्या कंपनीने त्या उद्योजकाच्या बायकांना प्रतिक्रीया विचारण्यासाठी फोन केला तर सर्व बायकांचे एकच उत्तर आले, "कसली ट्रीप...??


गंपूने व्हॅलेंटाइन डेनिमित्त पिंकीला कमळाचं फूल दिलं. पिंकीने त्याला थप्पड मारली, गंपू : अगं, पण मी भाजपचा प्रचार करत होतो. पिंकी : अरे, मी पण काँग्रेसचा प्रचार करत होते!!


पहिलाः गजनीमध्ये अमिर खानने इतकी मस्त बॉडी कशी बनवली असेल रे? दुसराः मी सांगतो. तो जिमला जाऊन यायचा आणि १५ मि. नंतर विसरून जायचा आणि पुन्हा जिमला निघून जायचा...

सर्वात खतरनाक प्रपोज . मुलाने मुलिला मारलेला . . . . . . . . . . तु आमच्या घरी भांडी घासायला राहशिल का ?

एक स्कूटरचालक रस्त्याने चालला होता. त्याला एक भली मोठी, अवाढव्य अशी बाई आडवी आली. पुढचा रस्ताच दिसेना. तो घाबरला न मग काय दिली एक जोरदार टक्कर. बाई : काय रे मुडदया, तुला समोरून चाललेली माणसं दिसत नाहीत काय? स्कूटरचालक : माफ करा बाई. पण काय आहे की पेट्रोल फारच महाग झालंय ना त्यामुळे तुम्हाला एवढा मोठा गोल वळसा घालून जाणं मला परवडलं नसतं

काही मजेशीर व्याख्या

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

... मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)

ग्यालरी- वरच्या मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन

परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'

परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन

थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव

नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू

ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग

विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी

विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड

श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी

IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन

लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा

कोंबडी कोणी पळवली…


##  नेत्यांच्या स्टाईलने…………….
महात्मा गांधीकोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करता त्याला मोकळे सोडून दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.
लोकमान्य टिळककोंबडी पळविणाऱ्या चोराचे डोके ठिकाणावर आहे काय?
बाळासाहेब ठाकरेजर कोंबडी वापस मिळाली नाही तर, त्या कोंबड्याला [चोराला] पहाटे आरवायला लावू. हे कोंबडी चोराने हे लक्षात ठेवावं.
राष्ट्रपती ताईकोंबडी चोरीला जाणे ही अतिशय वेदानादेह घटना आहे. मी ह्या घटनेचातीव्रशब्दात निषेध नोंदवते.
मनमोहन सिंगकोंबडी चोरीच्या घटनेची मी कठोर शब्दात निंदा करतो. सर्वांना मी शांततेचे आवाहन करतो.
पी. चितंबरम- यात परकीय शक्तींचा हात आहे का? याची तपासणी चालू आहे.
दिग्विजयसिंहकोंबडी पळवण्याच्या मागे संघाचा हात आहे.
अण्णा हजारेजर कोंबडी आणि कोंबडी चोर हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सापडले नाही तर, मी पुन्हाआमरण उपोषणालाबसेन.
रामदेवबाबाकोंबडी पळवणे म्हणजे देशद्रोह आहे. अरे! जर कोंबडी सापडली नाही. तर अंडी कोठून मिळणार? आणि देश स्वस्थ कसा राहणार?
अटलबिहारी वाजपेयीकोंबडी पळवणे……… ही........ चांगली गोष्ट नाही...... मी सरकारला……. अनुरोध...... करेन की……. त्यांनी लवकरात लवकर……. त्या कोंबडी चोराचा छडा....... लावावा.
अजित पवारमी कोंबडी पळवली नाही. माझ्या वाटेला जाल तर याद राखा.
लालू प्रसाद यादवअरे मुर्गी थो चोरी हुई है ! मिल जायेगी|भेस थोडी है जो नीतीस के घर जायेगी||
राज ठाकरेजर कोंबडी मराठी असेल तर, कोंबडी चोराला तंगडी धरून लंगडी घालायला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
उद्धव ठाकरेगेल्या चाळीस वर्षापासून आम्हीच कोंबडी चोरीचा मुद्दा मांडत आलो आहोत. इतरांनी नाक खुपसू नये.
आर आर पाटीलमोठ्या शहरात अशा छोट् छोट्या घटना घडत असतात. परंतु, कुणीही कायदा हातात घेऊ नये.
राहुल गांधीकोंबडी चोर कोण है? महाराष्ट्रीयन है|
बराक ओबामाओह नो! आय कांन्ट..
नारायण राणेहिम्मत असेल तर कोंबडी चोराने मालवणात येऊन दाखवावे.
मायावतीकोंबडी पळवणे हे विरोधी पक्षांचे षडयंत्र आहे.
नितीन गडकरीकोंबडी चोर हा काय सरकारचा जावई आहे?

डिव्होर्स हवाय !!!

दारावरची बेल वाजते. एक तरुण पुरुष दार उघडतो... तरुण स्त्री अत्यंत वैतागून आत येते.
दार लावून घेते. तो परत जे काम करत असतो त्यात गर्क होतो. ती बसून राहते , थोडा वेळ शांतता.

...

ती : मला डिव्होर्स हवाय....

तो : काय झालं ?

ती : आताच्या आता.... ताबडतोब मला डिव्होर्स दे.

तो : पण का ?

ती : मग तरी निदान - डिव्होर्सच्या धक्क्यातून सावरायला मी कुठेतरी लांब जाऊ शकेन दुख , यातना विसरण्यासाठी ... कुठल्यातरी अभयारण्यात एकटी फिरेन. ना ही गर्दी असेल ना ट्रॅफिक जॅम. तुला माहितीये , चर्चगेट टू अंधेरी फास्ट ट्रेनने बरोबर ३५ मिनिटांत पोहोचले पण अंधेरी टू घर , दीड तास. इतका ट्रॅफिक जॅम होता की मी बसमधून उतरले नि चालू लागले. रस्ते पण इतके घाण झालेत आणि... आणि सतत कुठून तरी कोणी तरी थुंकत असतं. स्वत:ला बचावत कशीबशी पुढे आले , रिक्षा केली तर रिक्षावाल्यानेही फसवलं. सगळे फसवतात रे आपल्याला. आपण टीव्ही नाही घेतला , आपल्याकडे गिझर नाही तरी इलेक्ट्रिकचं बिल भरभसाट , मोबाइलवर पण कामापुरतं बोलूनही भयानक बिल. ते वाचलंस ना दुधात भेसळ , भाज्यांना केमिकल्स लावून हिरवं करणं - मला राग येतोय. त्यात आपली लिफ्ट बंद होती. मेण्टेनन्स कशासाठी भरायचा मग... मला डिव्होर्स दे किंवा दूर कुठेतरी घेऊन चल , कंटाळा आलाय - रोज तेच तेच...

तो : चल आताच्या आत निघू जी ट्रेन मिळेल त्यात बसू जिथे वाटेल तिथे उतरू कोणाहीकडे राहू दोन दिवस मुक्काम परत खांद्यावर शिदोरी घेऊन पुढे जाऊ रात्रभर तारे बघू , शेतात फिरू , उन्हात रापू , दिवसभर समुद्रकिनारी पहुडून राहू...चल.

ती : खरंच जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं - असंच असावं ना आयुष्य.

तो : आर यू शुअर तिथे गेल्यावर गावात फिरताना कुठल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल
आपल्या कानावर येणारच नाही ? समुद्रातही किती प्रदूषण वाढलंय दिसणारच नाही
आपल्याला - म्हणजे आपण अगदी ठरवलं तर कदाचित नाही कळणार. आपल्याला सगळे
सेन्सेज बंद करायची सवय तर लागलीच आहे म्हणा...

ती : बघू तू परत मला निराश करतोयस. मला माहितीये सगळं वास्तव भयाण आहे.
पण एखादी वा-याची झुळूक कावळा , चिमणी , कबूतराव्यतिरिक्त एखादा पक्षी दिसणं ?
जाऊ देत काहीच शक्य नाही - आणि रोजची पैसा मिळवून देणारी कामं सोडून जायची
धमकही नाहीये रे - उद्या माझं प्रपोजल सँक्शन होईल का ? आज बॉस खुश झाला - बास्स एवढंच आयुष्य...
म्हणून मला एखाद्या मोठ्या धक्क्याची गरज आहे - दे ना रे डिव्होर्स मला किंवा एखादं अफेअर कर...

तो : चहा घेतेस ? नाही मस्त लिंबू सरबत करतो तुझ्यासाठी - फ्रेश वाटेल. मग बोलू अफेअरबद्दल...

( ती हसते - हळूच त्याला मिठी मारते)

ती : चल परत पळून जाऊ या...

तो : उद्या बघू...

शेंगदाणे

पांडू हवालदाराने चार
शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले
पाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबुद्धच
झाले.
त्यांनी विचारले, ''काय रे पांडू, हा काय प्रकार?''
'' अहो,
या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार
केला.''
...
इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्न्
पडून इ.
प्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला.
पहिल्या पोराला विचारलं, ''तुझं नाव
काय
आणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास
राणीच्या
बागेत?''
पोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला, ''माझं नाव नन्या.
मी
सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न
करत होतो.''
आता
दुसरा मुलगा. ''माझं नाव मन्या.
मीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे
टाकायचा प्रयत्न
करत होतो.''
तिसरा मुलगा. ''माझं नाव विन्या. मी
पण
सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत
होतो.''

चौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला आणि म्हणाला, ''माझं
नाव
शेंगदाणे!!!!''