विरंगुळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरंगुळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

काचेची बरणी व २ कप चहा .....

आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी करावाशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही
अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.) 
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना कही वस्तू बरोबर
आणाल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी कही न बोलता मोठी काचेची बरणी
टेबलावर ठेवली आणि त्यात पिंगपाँगचे बॊल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी
मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड
खड्यांचा बॊक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे
जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी
भरली का म्हणुन विचारले. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका
पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली
का म्हणून विचारले. मुलांनी तबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले
२ कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी कही जागा होती ती चहाने
पुर्ण भरून निघाली. विद्यार्थांमधे एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले,"आता
ही जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा. 
पिंगपाँगचे बॊल ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि
आवडीचे छंद - ह्या आशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सरं कही गेलं आणि ह्याच
गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपुर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी
म्हणजे तुमची नोकरी, घर, कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान
गोष्टी." "आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॊल किंवा दगड
खडे ह्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा
वेळ आणि सारी शक्ती लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी
तुमच्यापाशी वेळच रहाणार नाही. तेव्हा... आपल्या सुखासाठी म्हत्वचं काय आहे
त्याकडे लक्श द्या." "आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडिकल चेकअप करुन घेण्यासठी
वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेउन बहेर जेवायला जा. घराची सफाई करायला आणि टाकऊ
वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमी वेळ मिळत जाईल." "पिंगपाँगचे बॊलची काळजी
आधी घ्या. त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा.
बाकी सगळी वाळू आहे." 
सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं,"यात चहा
म्हणजे काय?" सर हसले आणि म्हणाले,"बरं झाले तु विचारलेस. तुझ्या प्रश्नाचे
उत्तर असे की आयुष्य कीतीही परिपुर्ण वाटले तरी मित्रांबरोबर १-२ कप चहा
घेण्याइतकी जागा नेहमीच असते" 

महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार...

कृपया कुठल्याही मुलीने ह्याचा चुकीचा अर्थ लावू नये. हा फक्त एक गमतीदार लेख आहे. ह्याचा प्रत्यक्षात व अप्रत्यक्षात कुणाशीही संबंध नाही.

आज आम्ही आपल्याशी "मुली" या अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. या विषयावरचा आमचा अभ्यास हा अत्यंत गाढा आहे. उपरोक्त विषय वाचून तमाम स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असणार. पण आमच्या घरचा पत्ता आम्ही कुठेही नमूद करणार नसल्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होईल. आय पी ट्रेस केला तर परदेशातून आलेले ट्राफिक सापडेल... त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कुणी आमच्या मताशी सहमत असावे असा आमचा आग्रह नाही. आमचा लेख वाचून कुठल्या मान्यता काढून घेतलेल्या डीम्ड विद्यापीठाला आम्हाला Ph D द्यावीशी वाटली तर त्यांनी ती डिग्री विद्यापीठाच्या दारात लटकावून ठेवावी (आम्ही किंवा आमचे हितचिंतक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतील).

तर आम्ही आज इथे महाराष्ट्रातील मुलींची प्रांतानुसार विभागणी करणार आहोत. प्रत्येक प्रांतातील मुलीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. साहजिक आहे , एखादी मुलगी तिच्या प्रांतानुसार केलेल्या वर्णनाशी असहमत असू शकते. तिने मनातल्या मनात म्हणावे "मी नाही इकडची , मी तर तिकडची"....शेवटी प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.

चला विषयाकडे वळू... तर पहिला प्रकार आहे "संसारंइतिकर्तव्यं कुमारिका " .... या प्रकारच्या मुली पक्क्या गावाकडच्या. नेटाने संसार करणाऱ्या ... यांनी जीन्स घातली तर यांना पूर्ण जग आपल्याकडेच पाहते आहे असा भास होतो. तुमचं सहजच त्यांच्याकडे लक्ष जरी गेले तरी मैत्रिणीच्या कानात पुटपुटतील "बघतोय बघ कसा, लोचट मेला ...." या मुलींना जेवढा भाव द्याल तेवढा त्या भाव खातील. म्हणून यांना कायम दुर्लक्षित भासवावे. त्यामुळे तुमचा भाव वधारतो. या प्रकारच्या मुली सातारा , सांगली , कोल्हापूर या प्रांतात सापडतात. या गृहकर्तव्यदक्ष असतात. अशा मुलींशी लग्न केल्याने संसार नीटनेटका होण्याचा जास्त संभव आहे. फक्त तुमच्या स्वत:च्या घरात तुम्ही TV वर जे पाहाल ते प्रत्यक्षात होताना दिसेल.... लग्नाआधी TV चा रिमोट शेवटचा हाताळून घ्या कारण नंतर ते तुमच्यासाठी मृगजळ असेल. समोर रिमोट दिसेल पण त्याच्यापर्यंत कधीही पोहोचता येणार नाही. ;D

दुसरा प्रकार आहे "आंग्लमातृभाषासंभ्रम कुमारिका " ... इंग्रजाळलेला मराठी बोलणाऱ्या मुली प्रामुख्याने या गटात मोडतात. ह्यांची आई ममा असते आणि बाबा dad ... आम्ही अशा मुलींसाठी एक संज्ञा सुचविलेली आहे "MBCM" म्हणजे Mumbai born confused maharashtriyan ... आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि आपण मुंबई आणि उपनगरातील मुलींविषयी बोलत आहोत. ह्यांना पटवण्यासाठी तुम्ही "cool" असणे फार निकडीचे आहे. तुम्हाला सिगारेट, दारू यांची सवय लावावी लागेल नाहीतर तुमच्या पैश्याने ह्या दारूच्या आख्या बाटल्या रिचवतील. ह्यांना मुलांचे लक्ष खेचून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत ... ह्यांचे कपडे हा संशोधनाचा विषय असू शकतो. यांचा स्कर्ट ६ वर्षाच्या मुलीला फिट्ट बसतो. म्हणूनच या प्रकारच्या मुलींची लग्ने अमराठी मुलांशीच जास्त होतात. चुकून तुम्ही यांच्याशी लग्न कराल तर मंगलाष्ट्कातील सावधान अवधूत गुप्ते च्या म्युझिक सोबत आयुष्यभर मागे लागेल आणि वणवा कुठे पेटलाय ते सुद्धा समजणार नाही. :)



तिसरा प्रकार "कुत्स्वादिनाप्मानम कुमारिका" ... ह्यांना विशेष धन्यवाद !!! महाराष्ट्रातील मुलींच्या बुध्यान्काची सरासरी थोडीफार जास्त आहे ती यांच्यामुळेच !!! इतर ठिकाणी प्रेयसीकडून कोड कौतुक करून घेण्याची पद्धत असते. इथे प्रत्यक्ष या रणचंडीवर स्तुतिसुमने उधळल्याशिवाय ती प्रसन्न होणे अशक्य .... तिच्या लेखी तुम्ही जगातील ३ नंबरचे सदगृहस्थ असता ...(तिच्या पिताश्री आणि भ्राताश्री नंतर)...प्रथम बोलण्यात पुढाकार घ्याल तर तुमचा किमान शब्दात कमाल अपमान होणार यात शंका नाही. अशा वेळेस तिचा भाऊ किती महान आहे यावर कमीतकमी २० मिनिटे बोलण्याची पूर्वतयारी करून जा. ओळख होईल .... हो... नुसती ओळख ... ह्या मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या घरापासून सुरवात करावी. नियमित मुलीच्या घरी जावे. तिच्या बाबांबरोबर "अमेरिकेची आर्थिक परिस्थिती" यासारख्या गंभीर विषयावर चर्चा करावी. कदाचित एखाद्या दिवशी पोहे मिळतील ... हाच तो दिवस .... दुसऱ्या दिवशी सरळ लग्नाची मागणी घालावी. अशा मुलींशी लग्न केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते ... उत्तरोत्तर प्रगती होते कारण तुमच्या चुका यांच्या इतक्या दुसऱ्या कोणालाही दिसत नाहीत ... अगदी तुमच्या बॉस ला सुद्धा ....
सांगायची गरज आहे ह्या पुण्याच्या मुली .... वरील उपाय आमच्या एका कोकणस्थ मित्राने घाऱ्या डोळ्याची सदाशिव पेठेकरीण पटवण्यासाठी वापरलेला आहे ... १०० % रिझल्ट !!!


चौथा प्रकार "मातृपितृवाक्यप्रमानं कुमारिका " ... महाराष्ट्रातील मुलींची बौद्धिक सरासरी घसरलेली आहे ती यांच्यामुळे...!!! या मुलींना विचाराल "तुझे माझ्यावर प्रेम आहे का ??" तर उत्तर येईल "आईला विचारून सांगते... " यांच्याशी लग्न करणे सर्वात सोपे ... सरळ सरळ आपल्या पिताश्रींना तिच्या घरी न्यावे ... कमीतकमी २५ लाख हुंडा मागावा ... हुंडाही मिळेल आणि मुलगी ही .... घरात तुमचे वाक्य प्रमाण असेल ... मोलकरीण बनवा नाहीतर मालकीण ...मर्जी तुमची !!! या मुली मराठवाड्यात अधिक सापडतात.

महाराष्ट्र शासनाप्रमाणे विदर्भाला सापत्न वागणूक देण्याची आमची इच्छा नव्हती. पण विदर्भकन्यांनी "आमच्यावर स्वतंत्र लेख हवा" असा आमच्याकडे हट्ट धरला आहे. शासनाला वेगळा विदर्भ देणं जमेल न जमेल .... आम्ही वेगळा लेख लिहिण्याचा आश्वासन जरूर देतो.

स्वप्न

स्वप्न  संपल की सत्य बोचु लागतं उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो . राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र  नसत. तरी मी त्याला विचारलं "स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?" तो म्हणाला "नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत ! जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर "

"मी बुवा स्वप्नांवरच जगतो. स्वप्नांचा आणि सुंगंधाचा फ़ार जवळचा संबंध असतो"
"बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते"

फेस बुक लावणी

फेस बुक मधे मी खात काढलय, बघा ना राया
माझी मैत्रीची रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट ना राया..
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ना राया..

... तुमच्या खात्यावर पोरिंची गर्दी लई भारी
माधुरी,प्रिति,प्रियंकाची त~हा लई नारी
मला बी तुमच्या मंदी घ्या ना राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ना राया..

अल्बम मधे म्या छान छान फोट बी लावलय.
नथ घालुन, नऊवारी नेसुन छानशी सजलेय
तुमची माधुरी,प्रिति,प्रियंका जळेल राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ना राया..

रोज रोज स्टेटस मी अप डेट करीन
छान सुंदर फोटु मी अप लोड करीन
बघुन सार ,पारण फिटेल हो राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ना राया..

तुमा संग रातच्याला चॅटींग करायचय
पहाट पत्तुर लॉग आऊट नाहि व्ह्यायचय
विचारनच माझी झोप उडाली हो राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ना राया..

मिळुन दोघ आपण एक कम्युनिटी काढु
प्रेमाच्या छान छान कविता बी लिहु.
फेसबुक गुलाबी करु यात ना राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ना राया..

‎'फेसबुक अँडिक्ट' ची लक्षणं

 'फेसबुक अँडिक्ट' ची लक्षणं हीच असावीत ना.....
१)दर अर्ध्या तासाने लोगिंग करण्याची तीव्र इच्छा होणे.
२)आपण पोस्ट किंवा comment टाकली असेल तर तिचे पुढे काय झाले हे सतत बघितल्याशिवाय चैन न पडणे.
३)'like' मिळाले कि अति खुश होणे आणि नाही मिळाल्या कि खट्टू होणे.
४)घरातील लोक महत्वाचे बोलत असतील तर त्याकडे दुर्लक्ष होणे.
... ५)कोणाचा फोन आला तरी f.b. वरून लक्ष विचलित न करता बोलत रहाणे.
६)वाचन,टी.व्ही. किंवा इतर छंद असतील तर ते दुय्यम किंवा secondary स्थानावर जाणे.
७)लाईट गेले किंवा connect होऊ शकलो नाही कि प्रचंड चीडचीड होणे.
८)रात्री उशिरापर्यंत ज्यात फारसा अर्थ नाही त्या गप्पात हि रमावेसे वाटणे.
९)झोपल्यावर डोळ्यासमोरून comments च्या strips च्या srtips सरकत आहे असे वाटणे.
१०)स्वप्नात हि आपण comments टाकतोय असे येणे.
११)पहाटे ४ वा. उठल्यावरही तीव्रतेने f.b. वर बसावेसे वाटणे.
12)घरातली किंवा बाहेरची नैमित्तिक कामे रेंगाळणे किंवा दुय्यम श्रेणीत जाणे.
१३)संध्याकाळच्या वेळी मोकळ्या हवेवर फिरणे आवश्यक आहे हे कळून सुद्धा आणि शक्य असून हि कॉम्पुटरलाच चिटकून बसणे.
१४)फेसबुक वरच्या मित्र-मैत्रिणीत सतत संख्येने वाढ व्हावी असे वाटणे आणि ती संख्या एक prestige point म्हणून मिरवणे.
१५)तुमच्या निमित्तिक उपासनेत concentration अजिबातच न होणे...
अजून काही असल्यास add करणे .......