विरह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पुन्हा एक देवदास...

पुन्हा एक देवदास...
तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..                    
         
रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले..                                
तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..                                
आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                
                                 
नसेल जाण, तर गेली उडत.. मी खैर करणार नाही..                                
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                
                                 
                                 
पहिल्यांदा CANTEEN  मध्ये पाहिलं तिला, च्यायला काय दिसत होती...                                
अरे KATRINA सुद्धा झक मारेल मित्रा,  अप्सरा  जणू भासत होती..                                
मी 'आ' वासून बघत राहिलो...   तसं अख्खं कॉलेजच 'चाट' पडलं होतं..                                
माझ्या त्या BORING LIFE मध्ये, काहीतरी INTERESTING घडलं होतं..                                
                                 
पण.. आता हा सलमान, आठवणीत तिच्या, रात्रंदिवस झुरणार नाही..                                  
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                
                                 
SCIENCE क्लासमध्ये ओळख झाली, अन् चक्क ती माझ्या नजदीक आली,                                
DARING करून 'मारला' PROPOSE...  ती लाजून 'इश्श' म्हणाली..                     ( ती तिकडे 'इश्श'..   आम्ही इकडे 'खुश्श'..  ;-D )                                
अहो काय SIXER मारली होती आपण?..'युवी'ने सुद्धा सलाम ठोकला असता..                                
पण चुकून नाही म्हणाली असती.. सांगतो.. माझा YORKER हुकला असता..                                
अहो.. पण प्रेम म्हणजे काय .. 'T20' MATCH वाटली का तिला??.. की झटपट उरकून गेली..                                
जन्मभराची 'कसोटी'... पण स्वतः 'RETIRED' आणि मला 'HURT' करून गेली..                                
                                 
पण माझी HIT-WICKET पुन्हा कोणी, आता जन्मात घेऊ शकणार नाही..                                
कारण.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                
                                 
                                 
सारस-कात्रज बाग तर सोडाच... आम्ही Z-BRIDGE सुद्धा  सोडला नाही..                                
खर तर वडा-पाव चे वांदे.. पण मी.. चकार शब्द सुद्धा काढला नाही..                                
अख्ख्या CLASS ला PARTY दिली ..आता  ती, त्यांची होणारी (?) वहिनी होती...                                
सकाळी E-SQUARE- संध्याकाळी Mc-D, साला.. तिची मात्र चैनी होती..                                
                                 
पै-पै'चा हिशोब मागावासा वाटतोय.. पण  तसलं काही करणार नाही..                                
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                
                                 
काय झालं असेल हो? का सोडलं असेल मला?                                
खऱ्या प्रेमाची किंमत कळली नसेल का तिला?                                
खरतर अजूनही मी तिच्यावरच जीवापाड प्रेम करतोय..                                
प्रेत्येक श्वास घेताना तिचीच आठवण काढतोय..                                
एकदा भातुकली मोडलीय.. आता परत खेळ मांडणार नाही..                                
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..                                
                                 
म्हणतात आयुष्यात हरून जगायचं नसतं..                                
काहीही झालं तरी निराश व्हायचं नसतं..                                
मी सुद्धा आता तिच्याच STYLE न जगायला शिकीन..                                
पण प्रेम या शब्दापासून चार हात अंतर राखीन                                
                                 
या पोरींच काही सांगता नाही येत.. कधीही CHOICE बदलू शकते                                
आणि माझ्या सारख्या देवादासांची दररोज भर पडू शकते        

भिजलेल्या डोळ्यातून आज

भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....

... तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....

खुप काही म्हणायच होता, शब्द माझे आतुरलेले
मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव
तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....

तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली
एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....

कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून
बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....

इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत
अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....

नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची
रेशम गाठी तुटल्या आमच्या, तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....!!!!!!..

असं का होत?

असं का होत? 
कुणीतरी खुप आवडायला लागत
अन ते आवडण एकाकी मनाला वेड लाऊ लागत 

असं का होत? 
कुणाचीतरी खुप आठवण यायला लागते 
अनं ती आठवणच आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागते 

असं का होत? 
कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येत ... 
अनं ते जवळ येण,आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जात 

असं का होत? 
कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो 
अन तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो...

सांगायचे होते तुला काही

सांगायचे होते तुला काही...
राहूनच गेले.

मनातले गुपित ओठांवर आणायचे ..
राहूनच गेले.

तुझ्या सहवासात असतांना,
तुला एकटक न्याहाळतांना,
तुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांना,
तुझ्या सोबत जगायचे..
राहूनच गेले.

तू रागावशील, सोडून जाशील,
मैत्रीचा धागा तोडून जाशील.
माझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे..
राहूनच गेले.

मला गर्लफ्रेंड का नाही?

मला गर्लफ्रेंड का नाही...?  मला गर्लफ्रेंड का नाही...? 
मला गर्लफ्रेंड का नाही...?  आहो ऐकलत का...? 
मला म्हणे गर्लफ्रेंडच नाही ...  का म्हणुन काय विचारता...??? 

आजकाल मुलींना आवडतात Smoke, Drink करणारा
पण मी आहे निर्व्यसनी फक्त चहा घेणारा...!!! 

आजकाल मुलींना आवडतात चार चौघात Issue अन भांडण करणारा 
पण मी आहे तिची तमा बाळगणारा, तिची लाज राखणारा 

आजकालच्या मुलींना आवडतातस्वार्थी, Possessive, Aggressive आणिEmotionally Blackmail करणारा
पण मी सर्वांची मदत करणारा, तिची काळजी घेणारा 

आजकालच्या मुलींना आवडतात खोटं बोलणारा आणि फसवणूक करणारा
पण मी कायम खरे बोलणारा या सर्व कारणांमुळे मला गर्लफ्रेंडच नाही...!!!

स्वतच्या दुखात चूर असणं तर नेहमीचचं

स्वतच्या दुखात चूर असणं तर नेहमीचचं..

कधीतरी इतरांची अनाम दुख अनुभवून बघ..

स्वताला कधी आजमावून बघ..

स्वताच्याच दुखात थोडं हसून बघ..



दुखात हरवून जाऊन..

जगणं विसरण्याइतकं आयुष्य स्वस्त नाही..

अनमोल जीवनाला एक स्पर्श तर करुन बघ..



साद घालतील तुला गीत तुझेच..

शब्द ज्यांचे कधी तू विसरली होतीस..

जमेल सुरांची मैफल पुन्हा..

स्वतामधला आवाज ऐकून तर बघ..



पुन्हा रंग उजळून येतील..

तूच अपुर्‍या सोड्लेल्या चित्राचे..

कुंचले घेऊन ,थोडे रंग भरुन बघ..



खुणाऊ लागेल मोकळे आकाश तुला..

पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी..

पायातल्या सगळ्या बेड्या तोडून टाक..

बंधनं सगळी झुगारुन दे..

तुझ्या पंखांना थोडं आत्मविश्वासाचं बळ देऊन बघ..



नव्या वाटांवरचे निशिगंध फुलू लागतील..

आठवणींच्या वाटेवर थोडं थांबून बघ..

हिरवळीकडॅ एकदा पाहून..

नवीन श्वास अंतरात भरुन तर बघ..



शक्य आहे सगळं..

जगता येण्यासारखं खुप आहे आणखी..

थोडं चाकोरीबाहेर जाऊन तर बघ..

स्वताला नवीन जन्म घेण्याची..

एक संधी देऊन बघ....

कधीतरी कुणावर प्रेम करावं

कधीतरी कुणावर प्रेम करावं
एक आठवण म्हणून नव्हे,....एक साठवण म्हणून,
प्रेम करावं फुलांच्या पाकल्यासारखं...
घट्ट मिठीत साठलेले
कुशीमध्ये दडलेले पण स्पर्शाने फुललेलं,
कधीतरी कुणावर प्रेम करावं
आकाशाच्या अथांगतेसारखे.....
दूरपर्यंत पसरलेलं पण नजरेला भिडलेलं,
कधीतरी कुणावर प्रेम करावं
दिवा-वातीच्या संगतीसारखं.....
दिव्याच्या आधारानी तरणारे नि ज्योतीसारखं जळणारे,
कधीतरी...कुणावर प्रेम करावं
त्या दर्यावाराच्या खडकासारखे
लाटांना अलगद झेलणारे
पण त्यांच्यातच झिजणारे,
कधीतरी कुणावर प्रेम करावं
स्वप्नासारखे भंगणारे...
खोल दरीत लोटणारे
गगनालाही लाजवणारे
पण कधीतरी......
कधीतरी कुणावर प्रेम करावं.

प्रेम करायचं राहुन गेलं

प्रेम करायचं राहुन गेलं
पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
...आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
... आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं

मन हे चंचल, मन हे निर्मल



मन हे चंचल, मन हे निर्मल 


मन हे चंचल, मन हे निर्मल 
याला लगाम न लागेल 
हे जाई क्षितिजाच्याही पद्याल 

मन हे चंचल, मन हे निर्मल 
कधी तिमिराला घाबरेल 
तर कधी प्रलायालाही मात देईल 

मन हे चंचल, मन हे निर्मल
करते याला उदास विचारांची घालमेल 
हे नसते कधीही दुर्बल 
विचारच करतात यास घायाल

तू रोज रोज नाही बोललास तरी काही हरकत नाही

तू रोज रोज नाही बोललास तरी काही हरकत नाही..
पण तुझे माझी नजर टाळून जाणे,
मी कधीच सहन करू शकत नाही...

मला का समजत नाही तुझे मन...,
मी का ओळखत नाही आपले ॠणानुबन्धन..

पण खरच गरज आहे का,
त्या नात्याच्या चौकटीची...
अन कुठल्याही कबुलीची...??

आणि खरच का गरज आहे,
जगाला ओरडून सान्गण्याची..?
आणि सारे काही फ़क्त फ़क्त माझ्यापासून लपविण्याची..??

ह्या दोघान्चीही गरज नाही आहे रे सख्या...
गरज आहे ती फ़क्त निखळ सत्य स्वीकारण्याची...

तुझ्या आणि माझ्या मनातलया त्या प्रेमाच्या ग्वाहीची...
अपेक्षा आहे ती फक्त प्रेमासाठी प्रेम करण्याची !!

तू मलाच चुकीचं ठरवल

मला काय वाटलं;
तर तुला काय वाटलं.
चुकीचं मी तुला ठरवलं तर ;
तू मलाच चुकीचं ठरवल.

खोटे आळ येडू आतातरी;
माझ्यावर लावू नकोस;
वेदना होतात या मला;
तू असं दुखवू नकोस.

माझ्या डोळ्यांच्या आरशात;
जर शोभत नाहीत अश्रू;
तर छेडु नकोस मला;
असं रडवूही नकोस.

असशील तू कोणा दुसर्याची;
कदाचीत माझी नसशीलही;
जरी हे खरं असेल तरी;
तू मला ते सांगू नकोस.

आता तरी किंमत लाव;
माझ्या तुज्यासाठीच्या स्वप्नांची;
नाहीतर कोणत स्वप्न;
मला दाखवूतरी नकोस.

आता तर आलीस अन् भेटलिस 
अन् ऐवढ्यातच निघालिस 
फक्त एक करार पाळण्यासाठी;
नाईलाजाने मला भेटू नकोस.

फक्त तुला भेटण्यासाठी!!!!!!

मी सुदधा खिडकिच्या गजातुन पाउस बघत असते..
"कसा आहे तो सांग ना रे"अस सारख त्याला विचारत असते.

तुझ्या सोबत धुन्द भिजलेल्या छळतात त्या सार्‍या आठवणी.
तु नाहिस आता सोबत हि जाणीव व्यापुन उरते मनी..

पहिल्याच भेटीचा दिवस डोळ्यासमोर उभा राहतो.
चेहरा तुझ मग तासन तास विचारत तरळ्तो.

वास्तवाच कडेलोटाच भान आल कि खुप त्रास होतो..
पण तरीही हे सगळ मी निमुटपणे सहन करते..

कारण त्याच्या सोबत तु ही बरसत आहेस अस समजुन..
मी नेहमीच मनोमनी ह्या पावसात भिजत असते..

फक्त तुला भेटण्यासाठी!!!!!!

तुझ्याविना आता जगणेच नाही

मन माझे कधी जुळले,
तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा,
कोणी मला खुणावलेच नाही...


स्वप्नंसदृश्य आयुष्य
माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन
कधी फुलले कळलेच नाही...

दुखाच्या क्षणात डुबत
चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास
माझा कळलेच नाही...

आशाच सोडली होती मी
परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद
तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...

कधीच अलग होऊ नकोस
प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून तर
तुझ्याविना आता जगणेच नाही...

कसं विसरू मी तुला

श्वास आहेस तू माझा,
तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन ,
पण हृदयात असतो ना सहवास तुझा.
सांग ना कसं विसरू मी तुला.

माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे मी किती भावूक आहे,
विसरायचा प्रयन्त केल्यावर पापण्या ओल्या करतात,
काहीतरी सांगतात ते मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

झोपेतही तुझीच आठवण येते,
सारख तुझंच नाव घेते,
तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला.
सांग ना कसं विसरू मी तुला.

एक वेळ कविता करायचे सोडेन,
माझ्या कवितेच झाड तुझ्यासाठी मोडेन.
पण नाही विसरू शकत मी तुला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

तुझ्या तो कोमल हाताचा स्पर्श,
मनात रुजून आहे कित्येक वर्ष.
कसा जाणार सहवास तुझा सांग मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

मी तिच्यात नव्हतो ...पण ती माझ्यात होती

तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केल

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

तो तिला बागेमधे एकांतात भेटला,
नको इतक्या जवळ जाउन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचं फ़ुल होवुन पेटला,
भेटला तर भेटुदे की,पेटला तर पेटुदे की,
तुमच्या घरचं बोचकं त्यांनी उचलुन थोडचं नेलं?

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
 
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली,
पाउस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हा कोणी नव्हतं म्हणुन त्यांचं फ़ावलं,
आणि त्यानी तिला घरात घेउन चक्क दार लावलं,
लावलं तर लाउदे की,व्हायचं ते हो उदे की,
खिडकीतुन फ़ुकट सगळं बघता तर आलं,

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

घरात जागा नसते,त्यांचं चालणारच टॅक्सित प्रकरणं,
ते थोडेच बसणार आहेत,पाणिनीचं घोकीत व्याकरणं,
गुलाबी थंडीचे परीणाम हे होणारचं,
कुणितरी कोणालातरी घट्ट मिठितं घेणारचं
घेतलं तर घेउ दे की,व्हायचं ते हो उदे की,
तुमच्या आमच्या पूर्वजांनी आणखी वेगळं ते काय केलं,

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
 
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढीच माणसं दूर जातात......?


माणसावर जेवढं प्रेम करावं 
तेवढीच माणसं दूर जातात..?
फुलांना जास्त कवटाळल्यावर 
पाकळ्याही गळून पडतात
ज्याला मनापासुन आपलं मानल 
तिच आपल्याला विसरून जातात
फुले गळु लागली की 
फुलपाखरेदेखील सोडून जातात
आपन जे मागितले 
तेच मिळत नाही 
बहूतेक आशेवर जगणं 
यालाच खरं जगणं म्हणतात..

निराशेचे कटूपण

जीवनात आहे निराशेचे कटूपण
येई त्यामुळे निर्धार अपन्गापेक्षाही स्थिती हीन
होतो आत्मविश्वास त्याने डगमगाया मनाचा
तरीही देतो माणूस आत्मविश्वासाला आपुलेपण
शेवटी येतो असा सुसाट पावसाची चाहूल देणारा वर
आणि उखडून पडतो सारा आत्मविश्वासाचा डोलारा
तेव्हा वाटे किती वाईट आहे हा संसार सारा
होते मरणाला जवळ करावया
वाटे पृथ्वीला द्यावे लाथाडून सूर्याला द्यावे फेकून
अन चंद्र हि चुर्डावा मुठीन
                         -- सत्यजित प.

नैराश आले तर

नैराश आले तर वाटते,
आहे हि महायुद्धाची सुरुवात

                       पडतात तेव्हा संकटे,
                       पराजय  असे दारूगोळ्याचे घात

काही मने होतात उध्वस्त ,
जातात आत्म्ह्तेच्या ओघात

                      काही येतात फुलून बहरून ,
                      करून नैराश्यावर मात

ज्याच्या जवळ असतो ,
आत्मविश्वासाचा कोठा अमाप

                             -- सत्यजित प.
 

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेन ..!

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेन ..!

कधी जर पाहशील पौर्णिमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेन ..!

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुक मीच असेन .