poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
poem लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दिवस संपतात

तुझी वाट पाहताना दिवस संपतात,

पण वाट पाहणं संपत नाही.

आयुष्यावरी ल तुझी छाप पुसून... टाकणं

मला अजूनही जमत नाही.

का तुझा सहवास दरवळत राहतो आजही ?

का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता

पुन्हा वाहायला लागतात ?

का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत

राहते ?

का तुझी आठवण नको असताना येतच

राहते ??

don divas marathi kavita

दोन दिवस मराठी कविता
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली

हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले

दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।


- नारायण सुर्वे

राजमाता जिजाऊ

|जय जिजाऊ||
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे…!

छञपती शिवाजी महाराज

छञपती शिवाजी महाराज


छञपती शिवाजी महाराज म्हणजे काय ?
लाकडाचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सुताराला
सोन्याचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सोनाराला
मातीचा शिवाजी बनवल्यावर मान जातो कुंभाराला.
अरे पण शिवाजी या नावाची तीन अक्षरे उलटी केल्यावर
असे समजते कि
जो जिवाशी खेळतो तो शिवाजी...
जय भवानी..जय शिवाजी
जय महाराष्ट्र.

don fulapakhare premat padali hoti

don fulapakhare premat padali hoti

दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......


मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....

मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!


दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....


थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????

.

.

.

.

ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती ........ कारण, रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते ..........




मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा

अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा

भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा

ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,

वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा

पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा

तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी….. ॥२॥

एक मैत्रीण

बोल ना रे काही तरी…
शी बाबा……आज काहीच का बोलत नाहीस…
हळूच मी त्या डोळ्यांकड़े पहिल…
चेहरयावर हास्य मग राहिले… 


तिला कुठे माहित…
बोलक्या ओठांचा
आज अबोलाच होता…
आवाजासाठी चक्क आतुर होता… 



तीच हसन…ते लाजन…
तीच रुसन..तर कधी भांडन…
तिचे प्रश्न…तीचे उत्तर…
कधी सवांद… तर कधी वाद…
कोण होती ती….??? 



नव्हती रक्ताची… ना नात्याची….
परी होती ती या मनाची…
स्नेहच्या बंधाची…. अंतरीच्या गाभ्याची…
आठवणींनच्या काही गोड क्षणंची… 



होती ती श्रावण सर…
वाळवंटातही ओले चिम्ब करणारी…
की होती ती काजवा…
अंधार्र्या आयुष्याची… 

रेशीम गाठिंचा बंध होता…
ह्या दोन खुळ्या मनांचा…
मैत्रीचा की प्रेमाचा…
हा प्रश्न नव्हता मनांचा… 


तीच्या सोबतचा वेळ
क्षणात संपून जाई…
परत भेटीची ओढ़
आता अंतरी राहून जाई… 


मी स्वर्ग नाही पहिला…
पण तीच्या सोबतचा
प्रत्येक क्षण ......
मला स्वर्गाप्रमाणे भासला!!


'ती ' नसताना असण्याचा आभास

'ती ' नसताना असण्याचा आभास

चिंब पावसात भीजतांनाच ते आकाश,
'ती ' नसताना असण्याचा आभास,
मोहरून सोडतो तो स्वप्नांचा सहवास,
अरुंद वाटांवरून एकत्र केलेला तो प्रवास,

तिच्या मिठीतील तो हवा असणारा स्पर्श,
थोडा वेळ का असेंना विसरवून टाकतो
जीवनाशी केलेला प्रत्येक संघर्ष,

तीचं ते लाजनं आणि लाजून गालात हसनं,
गालांमधील खळी आणि ओठांवरील हास्य,
नेहमीच कायम ठेवतं तिच्या मनातील रहस्य,

'ती" आत्ता येईल ही नेहमीचीच आस,
'ती' आली की मिठीत
घेऊन घेतलेला दीर्घ श्वास,

'ती' जवळ नसतानचा तिच्या आठवणींचा
प्रत्येक क्षण असतो खास
त्यामुळेच माझे जगणे झाले आहे
फक्त तिच्या साठी खास.....‍

प्रेम

प्रेम  Prem(Love)


एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.

त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी
मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला
हवी, असा तिचा कटाक्ष असे.

त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची
राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती
तिच्या मनात नेहमीच असते.

दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा
असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत
असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा
ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर
पडण्याचा मार्ग सांगतो.

तिचा पहिला मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात
त्याचा मोठा सहभाग असतो. तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर
खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.

एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप
कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, ""माझ्याकडे
भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू
होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.

ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक
प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप
काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ
करशील ना?''

""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.

त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.

त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले.
आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही' म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू
गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''

त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.

आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""मी नेहमीच तुझ्याकडे मदतीच्या
अपेक्षेने येते. तूही मला मदत करतोस. माझ्या सुख-दुःखात सहभागी होतोस. यावेळीही
तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''

""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''

त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

.. तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी
येईन.''

ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी,
दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून
गेली आहे.''


वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.

आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले
पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते. आपला तिसरा मित्र म्हणजे, आपली
मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप
दुसऱ्याचे होते. दुसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या
कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.


आणि पहिला मित्र म्हणजे कोण? ........

... पहिला मित्र म्हणजे आपला 'अंतरात्मा' (परमेश्वेर) ज्याच्याकडे आपण जास्त
लक्ष देत नहीं अणि तोच आपला शेवटपर्यंत सोबती असतो.... :)

shalet asatan me akada padalo hoto premat

shalet asatan me akada padalo hoto premat


shalet asatan me akada padalo hoto premat

फक्त तुला भेटण्यासाठी!!!!!!

मी सुदधा खिडकिच्या गजातुन पाउस बघत असते..
"कसा आहे तो सांग ना रे"अस सारख त्याला विचारत असते.

तुझ्या सोबत धुन्द भिजलेल्या छळतात त्या सार्‍या आठवणी.
तु नाहिस आता सोबत हि जाणीव व्यापुन उरते मनी..

पहिल्याच भेटीचा दिवस डोळ्यासमोर उभा राहतो.
चेहरा तुझ मग तासन तास विचारत तरळ्तो.

वास्तवाच कडेलोटाच भान आल कि खुप त्रास होतो..
पण तरीही हे सगळ मी निमुटपणे सहन करते..

कारण त्याच्या सोबत तु ही बरसत आहेस अस समजुन..
मी नेहमीच मनोमनी ह्या पावसात भिजत असते..

फक्त तुला भेटण्यासाठी!!!!!!

आता पुन्हा पाऊस येणार - संदीप खरे


आता पुन्हा पाऊस येणार - संदीप खरे



आता पुन्हा पाऊस येणार,

मग आकाश  काळं नीळं होणार,
मग मातीला गंध फुटणार,
मग मधेच वीज पडणार,
मग तूझी आठवण येणार,
काय रे देवा...

मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग मी ती लपवणार,
मग लपवुनही ती कुणाला तरी कळावसं वाटणार,
मग ते कोणीतरी ओळखणार,
मग मित्र असतील तर रडणार,
नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतंच कळलं तर बरं, असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार...
काय रे देवा...

मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार,
मग त्यात एखादं जुनं गाणं लागलेलं असणार,
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार,
मग साहीलनी ते लिहिलेलं असणार,
मग ते लतानी गायलेल असणार...
मग तूही नेमकं आत्ता हेच गाणं ऐकत असशील का? असा प्रश्न पडणार,
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार,
मग ना घेण ना देण पण फुकाचे कंदील लागणार...
काय रे देवा...

मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार...
मग त्याला आकाशाची आसवं लगडणार,
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार...
मग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार,
मग ऊरी फुटुन जावसं वाटणार,
छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावसं वाटणार...
मग सारं कसं मूर्खासारखं उत्कट उत्कट होत जाणार,
पण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार,
काय रे देवा...

पाउस पडणार...
मग हवा हिरवी होणार...
मग पाना पानात हिरवा दाटणार,
मग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शिरू पहाणार,
पण त्याला ते नाही जमणार्,
मग त्याला एकदम खरं काय ते कळणार, मग ते ओशाळणार,
मग पून्हा शरीराशी परत येणार,
सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार,
चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधणार,
एस. डी. चं गाणंही तोपर्यंत संपलेलं असणार,
रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,
मग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार,
कपातल वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार...
काय रे देवा...

पाउस गेल्यावर्षी पडला,
पाउस यंदाही पडतो...
पाउस पूढच्या वर्षीही पडणार...
काय रे देवा...


तुझ्याविना आता जगणेच नाही

मन माझे कधी जुळले,
तुझ्याशी कळलेच नाही,
प्रितीत विसावतो क्षण माझा,
कोणी मला खुणावलेच नाही...


स्वप्नंसदृश्य आयुष्य
माझे जाहले होते,
तुझ्या येण्याने नंदनवन
कधी फुलले कळलेच नाही...

दुखाच्या क्षणात डुबत
चालली होती नाव माझी,
हात तू कधी धरलास
माझा कळलेच नाही...

आशाच सोडली होती मी
परत आयुष्य सजवायची,
कशी जगण्याची उमेद
तुझ्यासवे मिळाली कळलेच नाही...

कधीच अलग होऊ नकोस
प्रिये आता माझ्यापासून,
गेलीस सोडून तर
तुझ्याविना आता जगणेच नाही...

प्रीतीचे धागे

प्रीतीचे धागे



डोळ्यांमधील दोन आसवे,
बरेच काही सांगून गेली
घूसमटलेले भाव मनीचे,
सहजपणे समजावून गेली



किती फिरवशी मान आणखी,
किती हुंदके उरी कोंडशी
हसुनी आणिक डोळे पुसुनी,
किती स्वताला असे फसवशी



विसरायचे म्हटलेस तरीही,
विसरशील का माझी प्रीती
कशी तुटतील जरी तोडशील,
अनाम संबंधाची नाती



वळणावरती मान फिरवुनी,
कशास बघशी मागे मागे
गेलीस कितीही दूर तरी,
विसरशील का हे प्रीतीचे धागे .......

कसं विसरू मी तुला

श्वास आहेस तू माझा,
तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन ,
पण हृदयात असतो ना सहवास तुझा.
सांग ना कसं विसरू मी तुला.

माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे मी किती भावूक आहे,
विसरायचा प्रयन्त केल्यावर पापण्या ओल्या करतात,
काहीतरी सांगतात ते मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

झोपेतही तुझीच आठवण येते,
सारख तुझंच नाव घेते,
तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला.
सांग ना कसं विसरू मी तुला.

एक वेळ कविता करायचे सोडेन,
माझ्या कवितेच झाड तुझ्यासाठी मोडेन.
पण नाही विसरू शकत मी तुला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

तुझ्या तो कोमल हाताचा स्पर्श,
मनात रुजून आहे कित्येक वर्ष.
कसा जाणार सहवास तुझा सांग मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

मी तिच्यात नव्हतो ...पण ती माझ्यात होती

तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केल

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

तो तिला बागेमधे एकांतात भेटला,
नको इतक्या जवळ जाउन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचं फ़ुल होवुन पेटला,
भेटला तर भेटुदे की,पेटला तर पेटुदे की,
तुमच्या घरचं बोचकं त्यांनी उचलुन थोडचं नेलं?

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
 
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली,
पाउस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हा कोणी नव्हतं म्हणुन त्यांचं फ़ावलं,
आणि त्यानी तिला घरात घेउन चक्क दार लावलं,
लावलं तर लाउदे की,व्हायचं ते हो उदे की,
खिडकीतुन फ़ुकट सगळं बघता तर आलं,

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

घरात जागा नसते,त्यांचं चालणारच टॅक्सित प्रकरणं,
ते थोडेच बसणार आहेत,पाणिनीचं घोकीत व्याकरणं,
गुलाबी थंडीचे परीणाम हे होणारचं,
कुणितरी कोणालातरी घट्ट मिठितं घेणारचं
घेतलं तर घेउ दे की,व्हायचं ते हो उदे की,
तुमच्या आमच्या पूर्वजांनी आणखी वेगळं ते काय केलं,

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
 
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढीच माणसं दूर जातात......?


माणसावर जेवढं प्रेम करावं 
तेवढीच माणसं दूर जातात..?
फुलांना जास्त कवटाळल्यावर 
पाकळ्याही गळून पडतात
ज्याला मनापासुन आपलं मानल 
तिच आपल्याला विसरून जातात
फुले गळु लागली की 
फुलपाखरेदेखील सोडून जातात
आपन जे मागितले 
तेच मिळत नाही 
बहूतेक आशेवर जगणं 
यालाच खरं जगणं म्हणतात..

माझ्या स्वप्नातली ती

माझ्या स्वप्नातली "ती "

माझ्या स्वप्नातली "ती "
खूप भनाट आहे
                         जिच्या विना माझ्या जीवनात
                         नुसता शुकशुकाट आहे
स्वप्नात सुधा पाहतो
मी तिची वाट आहे   
                         कल्पना माझ्या तिच्या
                         बाबतीत शंभर-साठ आहे
जणू "ती" विहीर
आणि मी राहत आहे 
                         मनात तिच्या बदल
                         प्रेम अफाट आहे
आता देवालाच माहित
कधी तिची माझी गाठ आहे
                        --- सत्यजित प.
                 


माझ्या स्वप्नातली "ती "

माझ्या स्वप्नातली "ती "
खूप भनाट आहे
                         जिच्या विना माझ्या जीवनात
                         नुसता शुकशुकाट आहे
स्वप्नात सुधा पाहतो
मी तिची वाट आहे   
                         कल्पना माझ्या तिच्या
                         बाबतीत शंभर-साठ आहे
जणू "ती" विहीर
आणि मी राहत आहे 
                         मनात तिच्या बदल
                         प्रेम अफाट आहे
आता देवालाच माहित
कधी तिची माझी गाठ आहे
                        --- सत्यजित प.