लोक लग्न का करतात

लेखाचे हे  हेडिंग वाचल्यावर तुमच्या  पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या
मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं  लग्न का
करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे
अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं उत्तर एकच असावं असं वाटतं- पण खरंच तसं
असतं  का?

जेंव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपलं शिक्षण पुर्ण करतो आणि नोकरीला
लागतो, तेंव्हा साधारण २३-२४ वय असतं. हातात मस्त पैकी पैसा खुळखुळत
असतो. कॉलेज मधे शिकत असतांना बाबांच्या कडून मिळणारा लिमिटेड  पॉकेट मनी
आता एकदम मल्टीफोल्ड मधे वाढलेला असतो.

नवीन मित्र मैत्रिणी झालेल्या असतात. मस्त पैकी सिनेमे, नाटकं, ट्रेकिंग
वगैरे सुरु असतं. आठवडाभर काम करायचं आणि विकएंडला मस्ती करायची… असा
प्रोग्राम सुरु असतो. सुरुवातीला काही दिवस तरी घरचे लोकं काही म्हणत
नाहीत, पण लवकरच, म्हणजे एक दोन वर्ष झाली की मग  जर मुलगी असेल तर आई
वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागते. किती दिवस उंडारू द्यायचं
हिला असं? आता लवकर  उजवून  टाकायला हवं!घरच्या लोकांची सारखी भूणभूण
सुरु होते. मुलींना मात्र अजून काही दिवस तरी एकटं रहायची इच्छा असते.
स्वातंत्र्य इतक्या लवकर संपावं अशी इच्छा नसते. पण……… आई वडिलांच्या
इच्छे पुढे काही फारसं चालत नाही आणि चहा पोहे सुरु होण्याची लक्षणं दिसू
लागतात.

मुलाच्या बाबतीत थोडं वेगळं सुरु होतं. आता २५ चा झाला, म्हणजे अजून दोन
तीन वर्ष तरी लग्नाला वेळ आहेच. पण घरचे लोकं मानसिक तयारी व्हावी म्हणून
येता जाता टोकत असतात. एखादी चांगली दिसणारी मैत्रीण वगैरे असेल तर ,”
काय रे तसं काही आहे का तुझं? असेल तर सांग, आम्ही भेटतो तिच्या आई
बाबांना” असं आई बाबा म्हणाले की मग मात्र ” अरे हो यार.. खरंच आपलं
लग्नाचं वय होत आलं की आता” ही चाहूल लागते.

इथपर्यंत सगळ्यांचे सारखंच असतं. त्याला पण आपण लग्न का करायचं हे काही
लक्षात येत नाही. फक्त इतर मित्रांची- मैत्रिणींची लग्न झाली म्हणून
आपणही  करायचं का?  सोशल अ‍ॅक्सेप्टन्स सा्ठी-की कोणी तरी हवी मागच्या
सिट वर बसायला म्हणून अजिबात काही समजत नसतं. घरचे लोकं मागे लागले, की
आता लग्न करा,म्हणून करायचं? त्याला थोडी भिती वाटत असते, लग्न करायचं
म्हणजे  आपल्या बरोबर ती पण रहाणार, म्हणजे तिची पण जबाबदारी आलीच.काय
करायचं?

तिच्याही मनात साधारण असेच  विचार येतच असतात, की कसं एखाद्या अनोळखी
मुलासोबत रहायला जायचं? अख्ख्या आयुष्यात आई बाबांना सोडून कुणाकडे
रहायला गेले नाही, आता हे कसं जमेल आपल्याला? लग्न करायलाच हवं का??

दोघांनाही आपला प्रेम विवाह व्हावा असे वाटत असते. पण  हिम्मत दोघांचीही
होत नसते.. तिला पण तो बरा वाटत असतो, त्याला पण ती छान दिसायला लागते.
मैत्रिणींकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. अगदी निर्भेळ मैत्री असते
ती थोडी पझेसिव्ह व्हायला लागते. ट्रेक ला जातांना बस मधे तिच्याच शेजारी
बसायला मिळावं म्हणून धडपड सुरु असते, तिला पण हे सगळं समजत असतं, पण ती
मात्र अजिबात काही लक्षात न आल्याप्रमाणे वागत असते. वाट पहात असते, ’हा
येडा’ कधी काही बोलतो का ह्याची!

पण ” हा येडा” मात्र कुठलाही धोका पत्करायला तयार नसतो. समजा विचारलं,
आणि मग ती नाही म्हणाली तर? असे प्रश्न भुंग्या सारखे डोक्यात पोखरत
असतात. काय करावं बरं?? विचारावं की नको?  बरोबरच्या मित्रांच्या पण
लक्षात आलेले असते हे सगळे, पण कोणी तसं बोलून दाखवत नाही. हे दोन्ही
प्राणी आपलं मुकत जीवन एंजॉय करत असतात. बरेचदा तिला पण वाटत असतं, की
ह्या मुखदुर्बळ माणसाने कधी तरी विचारावे, पण हा मात्र   ढीम्म पणे
बसलेला असतो- आणि कधीच काही विचारत नाही.

असेच काही दिवस जातात. तिचे चहा पोह्यांचे कार्यक्रम सुरु होतात, त्याचं
अजून मुली पहाणं सुरु झालेले नसते.  मधल्या काळात ,  एक तर  तिचे लग्न
ठरते किंवा  तिला कोणी  पसंत पडलेला  नसतो  .

हे वर जे काही लिहिलंय ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं. लग्न का करायचं?
हा कन्सेप्टच क्लिअर नसतो.वर ज्या घटना लिहिल्या आहेत, त्या सर्वसाधारण
पणे मुलांच्या  जीवनात घडणाऱ्या घटना असतात. या सगळ्या काळात एकदाही
लग्नाचा विचार मनात आलेला नसतो, पण नकळत सामाजिक जाणीव लग्नाच्या दिशेने
मन तयार करत असतं.

****

लग्नाचं पहिलं कारण म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत
असते. एक मैत्रीण म्हणून किंवा मित्र म्हणून. ती   ्दुसरया कोणाशी तरी
लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग
नेहेमी साठी तिच्या  बरोबर रहायला  हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. !

दुसरा कन्सेप्ट म्हणजे , दोघंही सगळीकडे आपल्या स्वप्नातला राजकुमार
किंवा राजकन्या पाहून दमलेले असतात. मग दोघंही एकमेकाला कॉम्प्लिमेंट
करायला म्हणून एकदम साक्षात्कार झाल्या प्रमाणे ” अरे आपल्याला तर हीच
आवडत होती?” असे लक्षात आल्याने लग्न करतात.

काही लोकं असेही म्हणतात की मुली फायनान्शिअल सिक्युरीटी साठी लग्न
करतात. पण तसे नाही. कारण आज मुली पण मुलांच्या इतक्याच शिकलेल्या असतात,
आणि मुलांच्या बरोबरीने पैसे कमवायची धमक बाळगून असतात, तेंव्हा हे
फायनान्शिअल सिक्युरिटी चे कारण मला तरी पटत नाही. अहो जर हेच कारण असते,
तर ऐश्वर्या रायला लग्न करायची काही गरज होती का?? तिच्याकडे करोडो रुपये
आहेत, कशाचीच कमतरता नाही .. पण तिलाही लग्न करावंसं वाटलंच ना?

पण याच गोष्टीवरून एक  लक्षात येतं की फायनान्शिअल सिक्युरीटी जरी असली,
तरीही समाजातलं अ‍ॅक्सेप्टन्स मिळायला हवं म्हणून तिने लग्न केले असेल
का? ति्चे एकटी असतांना लग्नापूर्वीचे स्टेटस आणि आजचे स्टेटस या मधे
पडलेला फरक पहाता हा मुद्दा पटतो.

काही मुली कार्पोरेट वर्ल्ड मधे चांगले पैसे कमावत असतात, बरोबरचे  सगळे
लग्नाळू मुलं मागे लागलेले असतात, पण नंतर काही दिवस यांच्याकडे दुर्लक्ष
केल्यावर ,  आणि बहूतेक दुसरी एखादी मुलगी आल्यावर पली एक हॉट गर्ल ची
इमेज जेंव्हा थोडीविस्कळीत व्हायला लागते, तेंव्हा आपल्यापे क्षा जास्त
पैसे मिळवणारा मुलगा बघून लग्न ठरवले जाते.

बरेचदा नोकरी निमित्य एकटे रहावे लागते, मग त्या  एकटेपणातुन बाहेर
पडण्यासाठी , निःस्वार्थी प्रेम , की जे आजपर्यंत केवळ आई , वडील, भावंडं
यांच्या कडूनच मिळालेलं असतं, ते   शोधण्याचा प्रयत्न सुरु केला जातो,आणि
मग ते न मिळाल्यास, वैफल्य आणि सरळ मुलगा बघून लग्न करण्याचे ठरवले जाते.
अगदी हीच गोष्ट मुलांच्या बाबतीतही घडते.

अजून एक कारण म्हणजे आई वडलांच्या बंधनात रहाण्याचा कंटाळा आलेला असतो,
आणि मग त्या बंधनातून सुटण्याचा मार्ग म्हणून लग्न करणारे पण काही लोकं
असतात.

दोघांचेही एकच करिअर असतं (डॉक्टर, इंजिनिअर, नाटक वगैरे), आवड पण जुळते,
जसे नाटक, सिनेमा, संगीत, वगैरे आणि मग असं वाटायला लागतं की आपण बरोबर
रहायला हरकत नाही, म्हणून मग लग्न!!!

धार्मिक बंधनं, म्हणून – म्हणजे धर्मात सांगितले आहे की लग्न
रिप्रोडक्शन साठी करा म्हणूनही लग्न करणारे लोकं आहेत.

या सगळ्या गोष्टी शिवाय एक गोष्ट म्हणजे जीमी पहिल्या पॅरीग्राफ मधे
तुमच्या मनात पहिले आली होती ती – म्हणजे शारिरिक गरजा ! हवं तर
बायोलॉजिकल निड्स म्हणता येईल त्याला.  सेक्स हा पण  उद्देश आहेच. पण
केवळ सेक्स साठी म्हणून लग्न केले जात नाही, तर सेक्स हा एक लग्न
केल्यावर होणारा अनुषंगाने येणारा भाग आहे.   सेक्स साठी म्हणून कोणी
लग्न करत नाही.

जसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा
राजकुमार, विजय मल्या,   वगैरे की ज्यांनी मनात आणले  आणि त्यांनी फक्त
हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील.
 त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच
मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो. एक कमिटेड रिलेशनशिप, होणाऱ्या
बाळाला वडिलांचे नांव, हे मुद्दे पण आपल्या कडे फारसे महत्त्वाचे वाटत
नाहीत. कारण विवाहपूर्व संबंध अजून तरी सर्वमान्य झालेले नाहीत.

जेंव्हा कोणाचं लग्न होतं, तेंव्हा तो कोणाचा तरी कोणी तरी होतो. म्हणजे
बघा, ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेकची  बायको , अमिताभची सून, त्या बाळाची
आई.. इतके काही झाली लग्नानंतर.  हा जो सामाजिक रिस्पेक्ट मिळतो तो
मिळवण्याची प्रत्येकाचीच धडपड असते -आणि म्हणून लग्न केले जाते.

   सगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे,
ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात .

   जर तुमचे लग्न झालेले असेल तर आपण लग्न का केलं?  हे   आठवुन बघा,
आणि जर लग्न झालेले नसेल तर आपण लग्न का करणार आहोत याचा विचार करून
पहा….  जर काही वेगळं सुचलं तर इथे कॉमेंट लिहा… :)

तुला सोडुन जान्याची खंत नेहमीच मला सतावत जाईल

तुला सोडुन जान्याची खंत
नेहमीच मला सतावत जाईल ।

खुप काही दिलं आणि
खुप काही घेवून जाईल ।

आठवणीँचे ओझे वाहून
नेताना सुखाचे मोती देवून जाईल ।

अश्रु नकळत टिपताना तुझे
मी ओठावर स्मितहास्य
सोडून जाईल ।

शिजविताना भविष्याचे
निखारे मी भुतकाळाला
स्मरत जाईल ।

जाता-जाता एकदा तुला
डोळेभरुन पाहून जाईल ।

एकांतात तूझेच शब्द मी
पुन्हा-पुन्हा गिरवत जाईल ।

जवळ होतो जेव्हा, तेव्हा
कदर नव्हती माझी मी
खुप-खुप दुर नीगून जाईल ।

विसरने मला, नाही होनार
शक्य तूला मी एकांतात
तूला रडवत जाईल ।

डोळे ओलावतील तूझे,
माझी कुशी तूला आठवत जाईल ।

मी जवळ नसेल तुझ्या पण
माझा आभास तूला सतावत जाईल ।

व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन

तो हातात गुलाब घेवून , चेहर्यावर
क्रिमचा लेप लावून व्हेलेंटाईन डे
च्या दिवशी तिला रस्त्यात गाठतो )
पुढे ...
तो - व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?
ती - तू इथून जा नाहीतर मीच निघून
जाईन .
तो - आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस
आणि तू
मला झिडकारतेस ,
खरं सांग मला, तू ही माझ्यावर प्रेम
करतेस ?
ती - प्रेम व्यक्त करण्यासाठी खास
दिवसाची गरज असते?
माझे तूझ्यावर प्रेम असते तर ,
तूला जायाला सांगीतले नसते
तो - मला माहित आहे तू खोटे बोलतेस ,
ह्या सुंदर डोळ्यात माझेच स्वप्न पहातेस
ती - माझ्या स्वप्नात सध्या नेहमीच भूत
दिसते,
तुला पाहिल्यावर मला त्याचीच आठवण
येते
तो - मग रोज घरी जाताना मागे
का वळ्तेस ?
सारखं मागे वळुन मला का पहातेस?
ती - मला मोकाट
सोडलेल्या कुत्र्यांची खूप
भिती वाटते
म्हणूनच मी सारखं मागे वळुन पहाते
तो - माझ्या प्रेमाचा असा अपमान
मी सहण
करणार नाही ,
आज तुझ्या मागे फ़िरून वेळ वाया घालवणार
नाही
ती - तुझा अपमान ही होऊ शकतो हे एकून
आनंद
झाला,
पण रोज माझ्या मागे फ़िरणार्याचा , आज
वेळ
कसा वाया गेला?
तो - ( खिशातील मुलींची नावे व पत्ते
असलेली लिस्ट काढून )
ही बघ माझ्याकडे केवढी मोठी लिस्ट आहे
या प्रत्येकीवर माझं मनापासून प्रेम आहे
आज प्रत्येकिला गाठून प्रेम व्यक्त करणार
एक -दोघींचा तरी होकार
मला नक्की मिळणार
ह्या दिवसाचा एक =एक क्शण
माझ्यासाठी अनमोल आहे
तूझं माझ्यावर प्रेम आहे का?
या सर्वांना विचारायचं आहे
ती - तूला आज नक्कीच योग्य मुलगी भेटेल,
जी तुझ्या कनाखाली चांगला गणपती काढेल
( दोघे ही आप -आपल्या मार्गाने जावू
लागतात . इतक्यात तिला आवाज
येतो व्हिल यू
बी माय व्हेलेंटाईन? आवाज देणारा तोच
असतो. खुप
राग आला असताना ही ती नकळत तो जवळ
येण्याची वाट पाहत थांबते. जवळ येताच
तो तिच्या हातावर
नावांची यादि असलेला कागद ठेवतो.
ती कागद पहाते आणि अचंबित होते.) पुढे ...
ती - ह्या कागदावर शेकडो वेळा फ़क्त
माझेच
नाव आहे .
मला सांगशिल का याचा अर्थ काय आहे?
तो - प्रत्येक मुलीत मला फ़क्त तूच दिसत
आहेस
मी फ़क्त तुझाच आहे , तुला एवढचं सांगायचं
आहे .
(चेहर्यावरचे दुःख लपवित तो चालू
लागतो ..
थोडा दूर जातो आणि त्याला आवाज येतो ..
व्हिल यू बी माय व्हेलेंटाईन ?
तो वार्याच्या वेगाने आवाजाच्या दिशेने
वळुन
पाहतो. ती पुन्हा मोठ्याने ओरडत
त्याला विचारते ... व्हिल यू बी माय
व्हेलेंटाईन