लेखाचे हे हेडिंग वाचल्यावर तुमच्या पैकी जवळपास ९० टक्के लोकांच्या
मनात हे काही उत्तर आले असेल ते उत्तर मला अभिप्रेत नाही. लोकं लग्न का
करात ? तसं म्हंटलं तर याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळे असणे
अपेक्षित आहे. पण बहुतेक लोकांचं उत्तर एकच असावं असं वाटतं- पण खरंच तसं
असतं का?
जेंव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी आपलं शिक्षण पुर्ण करतो आणि नोकरीला
लागतो, तेंव्हा साधारण २३-२४ वय असतं. हातात मस्त पैकी पैसा खुळखुळत
असतो. कॉलेज मधे शिकत असतांना बाबांच्या कडून मिळणारा लिमिटेड पॉकेट मनी
आता एकदम मल्टीफोल्ड मधे वाढलेला असतो.
नवीन मित्र मैत्रिणी झालेल्या असतात. मस्त पैकी सिनेमे, नाटकं, ट्रेकिंग
वगैरे सुरु असतं. आठवडाभर काम करायचं आणि विकएंडला मस्ती करायची… असा
प्रोग्राम सुरु असतो. सुरुवातीला काही दिवस तरी घरचे लोकं काही म्हणत
नाहीत, पण लवकरच, म्हणजे एक दोन वर्ष झाली की मग जर मुलगी असेल तर आई
वडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटायला लागते. किती दिवस उंडारू द्यायचं
हिला असं? आता लवकर उजवून टाकायला हवं!घरच्या लोकांची सारखी भूणभूण
सुरु होते. मुलींना मात्र अजून काही दिवस तरी एकटं रहायची इच्छा असते.
स्वातंत्र्य इतक्या लवकर संपावं अशी इच्छा नसते. पण……… आई वडिलांच्या
इच्छे पुढे काही फारसं चालत नाही आणि चहा पोहे सुरु होण्याची लक्षणं दिसू
लागतात.
मुलाच्या बाबतीत थोडं वेगळं सुरु होतं. आता २५ चा झाला, म्हणजे अजून दोन
तीन वर्ष तरी लग्नाला वेळ आहेच. पण घरचे लोकं मानसिक तयारी व्हावी म्हणून
येता जाता टोकत असतात. एखादी चांगली दिसणारी मैत्रीण वगैरे असेल तर ,”
काय रे तसं काही आहे का तुझं? असेल तर सांग, आम्ही भेटतो तिच्या आई
बाबांना” असं आई बाबा म्हणाले की मग मात्र ” अरे हो यार.. खरंच आपलं
लग्नाचं वय होत आलं की आता” ही चाहूल लागते.
इथपर्यंत सगळ्यांचे सारखंच असतं. त्याला पण आपण लग्न का करायचं हे काही
लक्षात येत नाही. फक्त इतर मित्रांची- मैत्रिणींची लग्न झाली म्हणून
आपणही करायचं का? सोशल अॅक्सेप्टन्स सा्ठी-की कोणी तरी हवी मागच्या
सिट वर बसायला म्हणून अजिबात काही समजत नसतं. घरचे लोकं मागे लागले, की
आता लग्न करा,म्हणून करायचं? त्याला थोडी भिती वाटत असते, लग्न करायचं
म्हणजे आपल्या बरोबर ती पण रहाणार, म्हणजे तिची पण जबाबदारी आलीच.काय
करायचं?
तिच्याही मनात साधारण असेच विचार येतच असतात, की कसं एखाद्या अनोळखी
मुलासोबत रहायला जायचं? अख्ख्या आयुष्यात आई बाबांना सोडून कुणाकडे
रहायला गेले नाही, आता हे कसं जमेल आपल्याला? लग्न करायलाच हवं का??
दोघांनाही आपला प्रेम विवाह व्हावा असे वाटत असते. पण हिम्मत दोघांचीही
होत नसते.. तिला पण तो बरा वाटत असतो, त्याला पण ती छान दिसायला लागते.
मैत्रिणींकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. अगदी निर्भेळ मैत्री असते
ती थोडी पझेसिव्ह व्हायला लागते. ट्रेक ला जातांना बस मधे तिच्याच शेजारी
बसायला मिळावं म्हणून धडपड सुरु असते, तिला पण हे सगळं समजत असतं, पण ती
मात्र अजिबात काही लक्षात न आल्याप्रमाणे वागत असते. वाट पहात असते, ’हा
येडा’ कधी काही बोलतो का ह्याची!
पण ” हा येडा” मात्र कुठलाही धोका पत्करायला तयार नसतो. समजा विचारलं,
आणि मग ती नाही म्हणाली तर? असे प्रश्न भुंग्या सारखे डोक्यात पोखरत
असतात. काय करावं बरं?? विचारावं की नको? बरोबरच्या मित्रांच्या पण
लक्षात आलेले असते हे सगळे, पण कोणी तसं बोलून दाखवत नाही. हे दोन्ही
प्राणी आपलं मुकत जीवन एंजॉय करत असतात. बरेचदा तिला पण वाटत असतं, की
ह्या मुखदुर्बळ माणसाने कधी तरी विचारावे, पण हा मात्र ढीम्म पणे
बसलेला असतो- आणि कधीच काही विचारत नाही.
असेच काही दिवस जातात. तिचे चहा पोह्यांचे कार्यक्रम सुरु होतात, त्याचं
अजून मुली पहाणं सुरु झालेले नसते. मधल्या काळात , एक तर तिचे लग्न
ठरते किंवा तिला कोणी पसंत पडलेला नसतो .
हे वर जे काही लिहिलंय ते बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं. लग्न का करायचं?
हा कन्सेप्टच क्लिअर नसतो.वर ज्या घटना लिहिल्या आहेत, त्या सर्वसाधारण
पणे मुलांच्या जीवनात घडणाऱ्या घटना असतात. या सगळ्या काळात एकदाही
लग्नाचा विचार मनात आलेला नसतो, पण नकळत सामाजिक जाणीव लग्नाच्या दिशेने
मन तयार करत असतं.
****
लग्नाचं पहिलं कारण म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला अगदी मनापासून आवडत
असते. एक मैत्रीण म्हणून किंवा मित्र म्हणून. ती ्दुसरया कोणाशी तरी
लग्न करून ,आपल्या पासून दूर जाणार ही कल्पनाच सहन होत नाही, आणि मग
नेहेमी साठी तिच्या बरोबर रहायला हवं ना? म्हणून मग लग्न केले जाते.. !
दुसरा कन्सेप्ट म्हणजे , दोघंही सगळीकडे आपल्या स्वप्नातला राजकुमार
किंवा राजकन्या पाहून दमलेले असतात. मग दोघंही एकमेकाला कॉम्प्लिमेंट
करायला म्हणून एकदम साक्षात्कार झाल्या प्रमाणे ” अरे आपल्याला तर हीच
आवडत होती?” असे लक्षात आल्याने लग्न करतात.
काही लोकं असेही म्हणतात की मुली फायनान्शिअल सिक्युरीटी साठी लग्न
करतात. पण तसे नाही. कारण आज मुली पण मुलांच्या इतक्याच शिकलेल्या असतात,
आणि मुलांच्या बरोबरीने पैसे कमवायची धमक बाळगून असतात, तेंव्हा हे
फायनान्शिअल सिक्युरिटी चे कारण मला तरी पटत नाही. अहो जर हेच कारण असते,
तर ऐश्वर्या रायला लग्न करायची काही गरज होती का?? तिच्याकडे करोडो रुपये
आहेत, कशाचीच कमतरता नाही .. पण तिलाही लग्न करावंसं वाटलंच ना?
पण याच गोष्टीवरून एक लक्षात येतं की फायनान्शिअल सिक्युरीटी जरी असली,
तरीही समाजातलं अॅक्सेप्टन्स मिळायला हवं म्हणून तिने लग्न केले असेल
का? ति्चे एकटी असतांना लग्नापूर्वीचे स्टेटस आणि आजचे स्टेटस या मधे
पडलेला फरक पहाता हा मुद्दा पटतो.
काही मुली कार्पोरेट वर्ल्ड मधे चांगले पैसे कमावत असतात, बरोबरचे सगळे
लग्नाळू मुलं मागे लागलेले असतात, पण नंतर काही दिवस यांच्याकडे दुर्लक्ष
केल्यावर , आणि बहूतेक दुसरी एखादी मुलगी आल्यावर पली एक हॉट गर्ल ची
इमेज जेंव्हा थोडीविस्कळीत व्हायला लागते, तेंव्हा आपल्यापे क्षा जास्त
पैसे मिळवणारा मुलगा बघून लग्न ठरवले जाते.
बरेचदा नोकरी निमित्य एकटे रहावे लागते, मग त्या एकटेपणातुन बाहेर
पडण्यासाठी , निःस्वार्थी प्रेम , की जे आजपर्यंत केवळ आई , वडील, भावंडं
यांच्या कडूनच मिळालेलं असतं, ते शोधण्याचा प्रयत्न सुरु केला जातो,आणि
मग ते न मिळाल्यास, वैफल्य आणि सरळ मुलगा बघून लग्न करण्याचे ठरवले जाते.
अगदी हीच गोष्ट मुलांच्या बाबतीतही घडते.
अजून एक कारण म्हणजे आई वडलांच्या बंधनात रहाण्याचा कंटाळा आलेला असतो,
आणि मग त्या बंधनातून सुटण्याचा मार्ग म्हणून लग्न करणारे पण काही लोकं
असतात.
दोघांचेही एकच करिअर असतं (डॉक्टर, इंजिनिअर, नाटक वगैरे), आवड पण जुळते,
जसे नाटक, सिनेमा, संगीत, वगैरे आणि मग असं वाटायला लागतं की आपण बरोबर
रहायला हरकत नाही, म्हणून मग लग्न!!!
धार्मिक बंधनं, म्हणून – म्हणजे धर्मात सांगितले आहे की लग्न
रिप्रोडक्शन साठी करा म्हणूनही लग्न करणारे लोकं आहेत.
या सगळ्या गोष्टी शिवाय एक गोष्ट म्हणजे जीमी पहिल्या पॅरीग्राफ मधे
तुमच्या मनात पहिले आली होती ती – म्हणजे शारिरिक गरजा ! हवं तर
बायोलॉजिकल निड्स म्हणता येईल त्याला. सेक्स हा पण उद्देश आहेच. पण
केवळ सेक्स साठी म्हणून लग्न केले जात नाही, तर सेक्स हा एक लग्न
केल्यावर होणारा अनुषंगाने येणारा भाग आहे. सेक्स साठी म्हणून कोणी
लग्न करत नाही.
जसे सिनेमाचे हिरो हिरोईन्स, काही देशांचे प्रेसिडेंट्स, ब्रिटनचा
राजकुमार, विजय मल्या, वगैरे की ज्यांनी मनात आणले आणि त्यांनी फक्त
हो जरी म्हंटले, तरीही त्यांची सोबत करण्यास बऱ्याच स्त्रिया तयार होतील.
त्यांना तर आयुष्यात लग्न करायची गरज पडायला नको. पण केवळ सेक्स हा एकच
मुद्दा लग्ना करण्यामागे कधीच नसतो. एक कमिटेड रिलेशनशिप, होणाऱ्या
बाळाला वडिलांचे नांव, हे मुद्दे पण आपल्या कडे फारसे महत्त्वाचे वाटत
नाहीत. कारण विवाहपूर्व संबंध अजून तरी सर्वमान्य झालेले नाहीत.
जेंव्हा कोणाचं लग्न होतं, तेंव्हा तो कोणाचा तरी कोणी तरी होतो. म्हणजे
बघा, ऐश्वर्या राय बच्चन ही अभिषेकची बायको , अमिताभची सून, त्या बाळाची
आई.. इतके काही झाली लग्नानंतर. हा जो सामाजिक रिस्पेक्ट मिळतो तो
मिळवण्याची प्रत्येकाचीच धडपड असते -आणि म्हणून लग्न केले जाते.
सगळ्यात शेवटी एकच सांगतो, लग्न का करतात लोकं?? यावर एकच उत्तर आहे,
ते म्हणजे बस्स्स!! करायचं म्हणून करतात .
जर तुमचे लग्न झालेले असेल तर आपण लग्न का केलं? हे आठवुन बघा,
आणि जर लग्न झालेले नसेल तर आपण लग्न का करणार आहोत याचा विचार करून
पहा…. जर काही वेगळं सुचलं तर इथे कॉमेंट लिहा… :)