Friday, November 19, 2010

काय सांगू मी तुम्हाला मला online प्रेम झाल

काय सांगू मी तुम्हाला


काय सांगू मी तुम्हाला मला online प्रेम झाल,
हृदयातील मन माझं facebook वरती आल.


तोंडाने भावना व्यक्त करायचो ते आता विसरले,
सारे शब्द जणू key board वरती घसरले,

मी म्हटले मनाला चल थोडा वेळ जाऊ,
मन म्हणाले मला, ती येते का ते पाहू.

तू गेलास कि माझे शब्द तिथे कोण पोहोचवेल,
अन मी नसलो इथे, तर तुला कोण सुचवेल.

आपण एक काम करू एकत्रच राहू,
ती येण्याची वाट दोघ आतुरतेने पाहू.

५ होते वाजले ती येण्याची झाली वेळ,
मन म्हणाले मला बंद कर तो पत्त्यांचा खेळ.

ती आली, मला म्हणाली आहेस का रे विशाल,
मन म्हणाले मी तुझी वाट पाहतोय खुशाल.


ती म्हणाली हाई, कसा आहेस, आता तू बोल,
मी म्हणालो मनाला आता तूच टाक झोल.

खूप वेळ झाला अन भरपूर मारल्या गप्पा,
मन तिथेच होते पुढे जायीनाच टप्पा.

मन म्हणाले मला तीला भेटायला सांग जरा,
मी म्हणालो आत्ता नको वेळ येऊन देत बरा.

ती म्हणाली मला बाय, वाजले आहेत आठ,
मन म्हणाले मला तू का करतोस असा थाट


असंच रोज आमचं ( माझं आणि माझ्या मनाचं) भांडण होत राहिलं,
खर सांगा मित्रांनो तुम्ही कधी online प्रेम पाहिलं ?

No comments:

Post a Comment