Friday, May 18, 2012

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!!!
ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं….,
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं….!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं…..,
मग त्याच्याच समजूतीने क्शणभर विसावं….!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!
वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं……,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं…..!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं…..,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं….!.
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..!!
वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं…..,
क्शणभर का होइना स्वतःला विसरुन बघावं……!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं…..,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं…..!!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं…..

Thursday, May 17, 2012

किती छान असतो न हा खेळ मनाचा

किती छान असतो न हा खेळ मनाचा,
स्वप्नांचा आधार घेऊन हवेत भरारी मारण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजा आहे म्हणत स्वप्नात हरवण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तुझ्या माझ्या अबोल प्रीतीचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
मी करत आलेल्या एकतर्फी प्रेमाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू जवळ नसलास कि तुला अनुभवायचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
सत्यात न उतरणाऱ्या स्वप्नाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजाच म्हणून मनाला समजावयाचा
खरच खूप छान असतो रे हा खेळ मनाचा,
सत्य माहित असूनही मनालाच फसवण्याचा.. मनालाच फसवण्याचा !!!!!!!

Friday, May 11, 2012

मराठा शेर

जिंदगी तो " शेर " जिया, करते है !
दिग्गजो को पछाड कर राज किया करते है !
अरे कोन रखता है किसके सर पे ताज !
" मराठा " अपना राजतिलक स्वयंम हि किया करते ||
गर्व नाही पण घराचे संस्कार आहेत
धमकी नाही पण धमक आहे
पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे
म्हणून तर गर्वाने म्हणतो मी मराठी आहे.

''वाघाला घाबरून सिंह चाल
बदलत नाही,
सिंहगर्जना ही धडकी बसविणारीच
असते, ओरडून
जञा गोळा करायची त्याला गरज
नसते, आम्ही मराठे आलो आहोत
हे पाहून जर घाम फुटत
असेल, तर पुढचं भविष्य
सांगायला ज्योतिषाची गरज
नसेल...''

मराठा" या शब्दातच "राठ" पणा आहे.
हा राठपणा म्हणजे रांगडेपणा मराठ्यांत भिनलाय. ते या मुळमुळीत लोकांना काय कळणार?
छक्केपंजे मराठ्याला जमत नाहीत.
मराठ्याला फक्त एकच समजतं "जो नडला त्याला पाडला".
समजलं काय...!!!

सुर्य कोणाला झाकत नाही ,
डोंगर कोणाला वाकवत नाही,
"मराठी" असल्याचा अभिमान बाळगा,
कारण "मराठी" कोणाच्या बापाला घाबरत
नाही. "जय भवानी ,जय शिवाजी"
नदी आहे,
नदीतून पाणीच वाहणार.....
ओरडून सांग उभ्या जगाला,
मी मराठा आहे मराठा,
शिवछत्रपतींची महतीच गाणार...!!

श्वासांत रोखूनी वादळ;
डोळ्यांत रोखली आग;
देव आमुचा छञपती;
एकटा मराठी वाघ;
हातात धरली तलवार;
छातीत भरले पोलाद;
धन्य-धन्य हा महाराष्टू;
धन्य जिजाऊंची औलाद...!!!
श्वासांत रोखूनी वादळ्, डोळ्यांत रोखली आग;
देव आमुचा छञपती, एकटा हिंदु वाघ;
हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद;
धन्य-धन्य हा महाराष्टू, धन्य हे आपले महाराज ||
आम्ही तलवारी सोडल्यापण हात तलवारी चालवायला विसरलो नाहीत ....,
आम्ही नांगर सोडलेपण जमीन फाडायला विसरलो नाहीत...,
तोच रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे...!
डोळ्यातला निखारा लालबुंद आहे....!
पोलादी मुठीत हत्तीचे बळ आहे...!
आडवे येऊ नका मनातला शिवाजी आजही जिवंत आहे