Thursday, September 22, 2011

sangayache hote tula kahi

सांगायचे होते तुला काही...  ( sangayache hote tula kahi )
सांगायचे होते तुला काही...
राहूनच गेले.
मनातले गुपित ओठांवर आणायचे ..
राहूनच गेले.
तुझ्या सहवासात असतांना,
तुला एकटक न्याहाळतांना,
तुझ्याच विचारांत स्वतःला विसारतांना,
तुझ्या सोबत जगायचे..
राहूनच गेले.
तू रागावशील, सोडून जाशील,
मैत्रीचा धागा तोडून जाशील.
माझे जीवापाड प्रेम व्यक्त करायचे..
राहूनच गेले.

Friday, September 16, 2011

hot ka ho ayushyat tumach kadhi asa


होतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं?
वाटतं नशीब करतंय आपलंच हसं..
नव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,
सर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉस

नुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू
क्रिकेटात तुमची ट्यूब फोडतो लेल्यांचा नातू

लवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेट
रस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला
पंक्चरायला तुमचंच चाक पडलेल्या काट्याला

निवांत येऊन टीव्हीसमोर बसता तेव्हाच वीज जाते
देवळात चप्पल नेमकी तुमचीच चोरीला जाते

'व्हाय मी' हा प्रश्न देवाला विचारून तुम्ही थकता..
रुद्राक्ष आणि ग्रहाच्या अंगठ्या वापरता न चुकता

मग 'लकी शर्ट' आणि लकी दिवस हेरून कामं करता
'आजचे भविष्य' पाच पेपरातून जमा करून वाचता..

पण गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी'
देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वॅलिटी'

आपल्या आयुष्याची स्टोरी आपण जगत जायची

Friday, September 9, 2011

mala girlfriend ka nahi

मला गर्लफ्रेंड का नाही...? मला गर्लफ्रेंड का नाही...? मला गर्लफ्रेंड का नाही...? आहो ऐकलत का...? मला म्हणे गर्लफ्रेंडच नाही ... का म्हणुन काय विचारता...??? आजकाल मुलींना आवडतातSmoke, Drink करणारापण मी आहे निर्व्यसनी फक्त चहा घेणारा...!!! आजकाल मुलींना आवडतात चार चौघात Issue अन भांडण करणारा पण मी आहे तिची तमा बाळगणारा, तिची लाज राखणारा आजकालच्या मुलींना आवडतातस्वार्थी, Possessive, Aggressive आणिEmotionally Blackmail करणारापण मी सर्वांची मदत करणारा, तिची काळजी घेणारा आजकालच्या मुलींना आवडतात खोटं बोलणारा आणि फसवणूक करणारापण मी कायम खरे बोलणारा या सर्व कारणांमुळे मला गर्लफ्रेंडच नाही...!!!