marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री!
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

होळीच्या खूप खूप शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!


होळीच करायची तर

🌳 अहंकाराची- होळी करा

🌳 असत्याची- होळी करा

🌳 अन्यायाची- होळी करा

🌳 जातीयतेची- होळी करा

🌳 धर्मवादाची- होळी करा

🌳 हुंडा प्रथेची- होळी करा

🌳 भ्रष्ट्राचाराची- होळी करा

🌳 निंदेची- होळी करा

🌳 जादूटोनेची- होळी करा

🌳 गुंडशाहीची- होळी करा

🌳 भाषावादाची- होळी करा

🌳 आळसाची- होळी करा

🌳 माजवृ-तीची- होळी करा

🌳 गर्वाची- होळी करा

🌳 दु:खाची- होळी करा

🌳 चंगळवादाची- होळी करा….

होळीच्या खूप खूप शुभेच्छा..💐💐💐

किती छान असतो न हा खेळ मनाचा

किती छान असतो न हा खेळ मनाचा,
स्वप्नांचा आधार घेऊन हवेत भरारी मारण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजा आहे म्हणत स्वप्नात हरवण्याचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तुझ्या माझ्या अबोल प्रीतीचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
मी करत आलेल्या एकतर्फी प्रेमाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू जवळ नसलास कि तुला अनुभवायचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
सत्यात न उतरणाऱ्या स्वप्नाचा
किती छान असतो न हा खेळ मनाचा,
तू मजाच म्हणून मनाला समजावयाचा
खरच खूप छान असतो रे हा खेळ मनाचा,
सत्य माहित असूनही मनालाच फसवण्याचा.. मनालाच फसवण्याचा !!!!!!!