Thursday, January 20, 2011

एकदा प्रेम करून बघायचंय.......

Marathi Kavita  मराठी कविता

एकदा प्रेम करून बघायचंय.......
प्रेमाच्या सोनेरी हसऱ्या क्षणांना, मला एकदा अनुभवायचं
हसत प्रेम करता करता तिच्याशी थोड भांडायचंय .................
फुल तिला हवे म्हणून, झाडावर मला चढायचंय
पडशील अरे हळूच , अस ओठातुन त्या ऐकायचं ..................
परीराणीला माझ्या , गाडीवरून फिरवायचंय
जोरात गाडी चालवून , थोडास घाबरवायचं...........................
थेटर मध्ये मला, सोबत तिच्या बसायचंय
फिल्म ठेऊन बाजूला , तिलाच मनसोक्त पहायचंय.................
दिवस रात्र बोलून ,ब्यालंसला तिच्या संपवायचंय
गुपचूप रीचारज करून, माहितच नाही मला अस दाखवायचंय....
तिच्या प्रेमळ कुशीत ,मन मोकळं करायचंय
दुखाना तिच्या सर्व , आपलंसं करायचंय ...........................
कोवळ्या तिच्या पावलान खाली, फुलांना मखमली पसरवायचंय
सर्व सुखांना विश्वातील , तिला आणून द्यायचंय ............
आघाव पण केला तर , प्रेमळ पणे रागवायचंय
चढलाच राग नाकावर तर गोड गोड बोलून समजवायचंय.....
तिच्या नाजूक भावनांना मला सर्वस्वी जपायचंय
येत नसताना जोक सांगून थोडासा तिला हसवायचंय ......

No comments:

Post a Comment