पण धाडस होत नाहि ...

पण धाडस होत नाहि ...
ती समोरून आली तरीही शब्धान्ना बांध फुटत नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...

वर्षे लोटली तरी फ़क्त तिच्यावरच मरतोय ,
शप्पथ सांगतो फ़क्त तिचाच विचार करतोय ...
वही मागण्याशिवाय कधी बोललो नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...

माहित नाहि , ती मरते का नाहि मज्ह्यावर ?
का तीच ह्रदय आहे ,फ़क्त एक "सजीव कलेवर" ?
चांदण्यात फिरण्याचा आनंद आम्हालाही मिळणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...

Valentine Day ला बूके घ्यायला जातोय ,
खिशाचा विचार करून फुलावरच भगवतोय ,
या "गरिबाच प्रेम" ती स्वीकारणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...

तिच्यासाठी घेतलेल फुल वहितच कोमेजतय ,
माझ काळीज मात्र तिचीच आस धरतय ...
कितीही ठरवून गेलो तरी , ह्रदय मात्र बोलत नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...

वाटतय , तिच्याही वहित असेल एखाद फुल मज्ह्यासाठी ,
का आहे ही भोली समज या वेड्या मनासाठी ?
आयुष्यातल पहिल - वहिल प्रेम मिळणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा