Friday, February 4, 2011

खरच तुला माझा कंटाळा आला आहे का ?.... कि नवीन मित्रांच्या शोधात तू रमलीस ??

मला माहित आहे तुला ONLINE
यायला वेळ मिळत नाही, मी मात्र
तू आली का येवून गेलीस ?ह्या विचारात
मला तुझे हाल हवालही कळत नाही

मी जेव्हा ONLINE येतो तेव्हा
तुला कदाचित येण्यास जमत नाही
किंवा तू आधीच येवून गेलेली असतेस
मला एकही कॉमेंट न देता OFFLINE झालेली असतेस

तुला ONLINEपाहता माझे मन
कशी आहेस ? विचारण्यास धडपडते
पण तू मात्र बिझी राहून, मला टाळून
इतरांशी गप्पा मारत राहते

माझे साधे स्क्रेप्स तुला कधीच
का आवडत नाही
आणि माझ्याकडे पैसे कमी आहेत म्हणून
महागडे गिफ्ट देणे मला परवडत नाही
 कदाचित तुला हाय PROFILE
मित्रांशी गप्पा मारायच्या असतील
पण कदाचित त्यांच्या अश्लील शब्दांत
एक दिवस तू संकटात सापडशील !

मी चाट विनंती पाठवली की
तू कधीच स्वीकार करीत नाही
माझ्या भावना धुडकावून
दुखी मनाचा विचारच करत नाही

सखी भरपूर मित्र मिळव तू
पण त्यातले विश्वासू कोण ते तूच ठरव
चांगले मित्र फार भाग्याने मिळतात
आपल्या सुख दुखाचे खरे वाटेकरी ठरतात

तू सदा हसत राहावी
प्रत्येक्त क्षण तू आनंदात जगावी
ह्याचा विचार मी सदैव करतो
सखी देवाजवळ हीच प्रार्थना करतो

मी तुला नेट मैत्रीण म्हणून
कधीच पाहत नाही,
शेवटच्या श्वासापर्यंत माझी मैत्री असेन
हे घे वचन माझे जरी मी ह्या जगात असेन वा नसेन

खरच तुला माझा कंटाळा आला आहे का ?
कि नवीन मित्रांच्या शोधात तू रमलीस ?
हे सखी तसे मला सांग मी वाट पाहत आहे
का? अशी मला तुझ्या पासून दूर लोटत आहे

कदाचित भावनेच्या भरात , तुझ्या प्रेमात
चुकलो तर माफ कर ..........


1 comment: