Monday, February 28, 2011

करमुक्त उत्पन्नात पुरुषांना फायदा, महिलांना तोटा

स्टार माझा वेब टीम, नवी दिल्ली
करमुक्त उत्पन्नाच्या पुरुषांच्या सीमेत २० हजार रुपयांनी वाढ केली तर महिलांच्या उत्पन्नात १० हजारांनी घट करून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी चतुरपणे बदल करून महिलांना इतर फायदे देण्याची घोषणा केली आहे. नव्या कररचनेमुळे महिलांना १० हजार रुपयांचा तोटा झाला आहे. पुरुष आणि महिलांना संसदेतील प्रमाण जरी समान नसले तरी कररचनेत प्रणवदा यांनी समानता आणली आहे.
पुरुष आणि महिलांना १.८० लाख आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी २.५० लाखाचा पहिला टप्पा कायम ठेवला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ६० वरुन ६५वर त्यांच्यासाठी कर मर्यादा दोन लाख ५० हजार
त्यापुढील टप्प्यात त्यांनी महत्त्वाचे बदल केले आहेत.

पुरुष आणि महिलासाठी टॅक्स स्लॅब
० ते १ लाख ८० हजार - कर नाही
१,८०,००१ ते ५ लाख - १० टक्के
५,००,००१ ते ८ लाख - २० टक्के
८ लाखाच्या पुढे - ३० टक्के


ज्येष्ठ नागरिकांसाठी टॅक्स स्लॅब
० ते २ लाख ५० हजार - कर नाही
२,५०,००१ ते ५ लाख - १० टक्के
५,००,००१ ते ८ लाख - २० टक्के
८ लाखाच्या पुढे - ३० टक्के

No comments:

Post a Comment