कधी कधी का रे तू असा वागतोस ?
असे वाटते जणू काही तू तुझ्यातच नसतोस.........
कधी कधी शब्द तुझे,
इतके कोरडे का होतात ?
कधी कधी डोळे तुझे
इतके निस्तब्ध का होतात ?
नेमकं काय होतं तुला, जेव्हा तू म्हणतोस,
" मला काहीही झालेलं नाहीये "
मला सांग इतक्या दिवसांत,
काय मी तुला एवढेही ओळखलेलं नाहीये ?
किती बरं वाटतं जेव्हा तू,
एखाद्या गोष्टीचं कारण
समजावून सांगतोस...
आणि खुप अस्वस्थ होतं जेव्हा,
मला कारण कळत नाही की,
तू असा का वागतोस.....
कठोर बोलून, माफ़ी मागायला
तुझं काय जातं.....
चूका करुन, चुकलो म्हणायला
तुला बरं येतं.........
पण तुला काय ठावुक त्या थोड्या वेळात
माझं मन किती व्याकुळ होतं,
त्या थोड्या वेळात ते अक्षरश:
तुटून तुटून वेगळ पडतं....
मी तुझ्या इतकी व्यवहारी नाहीये रे,
माझं मन तुझ्या इतकं घट्ट नाहीये रे,
तुझ्याइतका सहजपणा जर देवाने
मला दिला असता,
तर कदाचित आज हा प्रश्नच
मला पडला नसता,
मी तुला प्रश्नाचं उत्तर
मागत नाहीये,
पण का वागतो तू असा
मला खरचं कळत नाहीये,
एरव्ही, तू मला नेहमीच खुप समजुन घेतोस,
पण कळत नाही कधी कधी तू,
असा का वागतोस ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा