Thursday, March 24, 2011

असा कोणी माझ्यापण आयुष्यात यावा ......

असा कोणी माझ्यापण आयुष्यात यावा ......
तो येणार तेव्हा
मन खूप बेचैन व्हावं ..
भेटायची ओढ खूप
पण मनात खूप चलबिचल व्हावं...


घाबरून का होईना पण
स्वतःला सजवण्याचा प्रयत्न मी करावा ..
वेळ विचार करण्यातच गेला तरी
मी प्रेमाच्या शृंगाराने न्हाव ..


समोर त्याच्या जाव
तेव्हा आणखीच घाबराव ..
त्याने बघून मग
मला हळूच मिठीत घ्यावं ..


नसले मी सुंदर जरी
त्याने मला वर्णाव ..
हातात माझा हात धरून
मग ते मला ऐकवाव ..असा कोणी माझ्यापण
आयुष्यात यावा ..
ओठावरच्या या शब्दांना
त्याने पण कधी ऐकाव ..

No comments:

Post a Comment