Thursday, March 31, 2011

फक्त तूच.........

तू


या सृष्टीच्या प्रत्येक कणा कणात,
वेळेच्या प्रत्येक क्षणा क्षणात,
आणि माझ्या आठवणींच्या,
प्रत्येक पानात फक्त तूच आहेस.....

निसर्गाच्या प्रत्येक रंगत,
मोगरा, चमेली आणि गुलाब,
यांच्या प्रत्येक सुगंधात,
फक्त तुझाच गंध आहे.....

थंडीने शहारून गेलेल्या,
त्या आसुसलेल्या पावसाळी ढगात,
पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबात,
निसर्गाच्या प्रत्येक ऋणानु बंधात,
फक्त तू आणि तूच आहेस.....

No comments:

Post a Comment