Wednesday, May 11, 2011

प्रीतीचे धागे

प्रीतीचे धागेडोळ्यांमधील दोन आसवे,
बरेच काही सांगून गेली
घूसमटलेले भाव मनीचे,
सहजपणे समजावून गेलीकिती फिरवशी मान आणखी,
किती हुंदके उरी कोंडशी
हसुनी आणिक डोळे पुसुनी,
किती स्वताला असे फसवशीविसरायचे म्हटलेस तरीही,
विसरशील का माझी प्रीती
कशी तुटतील जरी तोडशील,
अनाम संबंधाची नातीवळणावरती मान फिरवुनी,
कशास बघशी मागे मागे
गेलीस कितीही दूर तरी,
विसरशील का हे प्रीतीचे धागे .......

No comments:

Post a Comment