Monday, December 5, 2011

are khopya madhe khopa

अरे खोप्या मध्ये खोपा

अरे खोप्या मध्ये खोपा ,
सुगारानिचा चांगला ,
देखा पिलासाठी तीन ,
झोका झाडाला टांगला ,

पिल निजली खोप्यात ,
जसा झुलता बंगला ,
तिचा पिलान्माधी जीव ,
जीव झाडाले टांगला ,

खोपा आणला आणला ,
जसा गिलक्याचा कोसा,
पाखरांची कारागिरी,
जरा देखरे माणसा,

तिची एवूलीशी चोच,
तेच दात तेच ओठ,
तुले देलेरे देवान,
दोन हात दहा बोट

No comments:

Post a Comment