Monday, January 30, 2012

कोंबडी कोणी पळवली…


##  नेत्यांच्या स्टाईलने…………….
महात्मा गांधीकोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करता त्याला मोकळे सोडून दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.
लोकमान्य टिळककोंबडी पळविणाऱ्या चोराचे डोके ठिकाणावर आहे काय?
बाळासाहेब ठाकरेजर कोंबडी वापस मिळाली नाही तर, त्या कोंबड्याला [चोराला] पहाटे आरवायला लावू. हे कोंबडी चोराने हे लक्षात ठेवावं.
राष्ट्रपती ताईकोंबडी चोरीला जाणे ही अतिशय वेदानादेह घटना आहे. मी ह्या घटनेचातीव्रशब्दात निषेध नोंदवते.
मनमोहन सिंगकोंबडी चोरीच्या घटनेची मी कठोर शब्दात निंदा करतो. सर्वांना मी शांततेचे आवाहन करतो.
पी. चितंबरम- यात परकीय शक्तींचा हात आहे का? याची तपासणी चालू आहे.
दिग्विजयसिंहकोंबडी पळवण्याच्या मागे संघाचा हात आहे.
अण्णा हजारेजर कोंबडी आणि कोंबडी चोर हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सापडले नाही तर, मी पुन्हाआमरण उपोषणालाबसेन.
रामदेवबाबाकोंबडी पळवणे म्हणजे देशद्रोह आहे. अरे! जर कोंबडी सापडली नाही. तर अंडी कोठून मिळणार? आणि देश स्वस्थ कसा राहणार?
अटलबिहारी वाजपेयीकोंबडी पळवणे……… ही........ चांगली गोष्ट नाही...... मी सरकारला……. अनुरोध...... करेन की……. त्यांनी लवकरात लवकर……. त्या कोंबडी चोराचा छडा....... लावावा.
अजित पवारमी कोंबडी पळवली नाही. माझ्या वाटेला जाल तर याद राखा.
लालू प्रसाद यादवअरे मुर्गी थो चोरी हुई है ! मिल जायेगी|भेस थोडी है जो नीतीस के घर जायेगी||
राज ठाकरेजर कोंबडी मराठी असेल तर, कोंबडी चोराला तंगडी धरून लंगडी घालायला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
उद्धव ठाकरेगेल्या चाळीस वर्षापासून आम्हीच कोंबडी चोरीचा मुद्दा मांडत आलो आहोत. इतरांनी नाक खुपसू नये.
आर आर पाटीलमोठ्या शहरात अशा छोट् छोट्या घटना घडत असतात. परंतु, कुणीही कायदा हातात घेऊ नये.
राहुल गांधीकोंबडी चोर कोण है? महाराष्ट्रीयन है|
बराक ओबामाओह नो! आय कांन्ट..
नारायण राणेहिम्मत असेल तर कोंबडी चोराने मालवणात येऊन दाखवावे.
मायावतीकोंबडी पळवणे हे विरोधी पक्षांचे षडयंत्र आहे.
नितीन गडकरीकोंबडी चोर हा काय सरकारचा जावई आहे?

No comments:

Post a Comment