आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब...

आभाळातून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपल् याला काही ना काही देऊन जातो, शिकवून जातो ...

जेंव्हा तो तहानलेल्या धरती वर पडतो... तेंव्हा तो मातीला एक वेगळाच गंध देऊन जातो... ओल्या मातीचा गंध...
'देण्यात' किती सामर्थ्य असतं हेच तो नकळत आपल्याला सांगून जातो...

जेंव्हा तो झाडांच्या पानांवर पडतो... जास्त वेळ थांबत नसेलही तो तिथे... पण तरीही तो त्या पानांना अगदी टवटवीत करून जातो...
'ओझरता स्पर्श'... ओझरत्या स्पर्शाची ताकद दाखवून जातो तो आपल्याला ...
कारण त्यात 'लालसा' नसते... त्यात असते एक अनामिक 'ओढ'... अन तीच आपल्याला टवटवीत ठेवते...

अन जेंव्हा तो तिच्या चेहऱ्यावर पडतो... तेंव्हा ....
तेंव्हा राहतंच काय हो ;)...

तिच्या गालावरून खाली येतांना तर तो खुद्द बेभान होऊन जातो...
बेधुंद 'जगणं' काय असतं हेच तो आपल्याला सांगून जातो...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा