१) कोणत्याही व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त प्रामाणिक राहू नये.
कारण सरळ असलेली झाडेच खूप कापली जातात, त्याचप्रमाणे जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट सोसावे लागतात.
२) चाणक्य मानायचे की जर आपल्याला काही आर्थिक नुकसान झाले, तर तसं चुकूनही कोणाला सांगू नये.
कारण कोणीही तुमचे आर्थिक नुकसान ऐकल्यावर तुमची मदत करणार नाही, उलट तुम्हाला मदत करावी लागेल म्हणून तिथून पळ काढतील.
३) आपल्याला भूतकाळात घडलेल्या घटनेविषयी पश्चाताप नसावा आणि भविष्याविषयी चिंता देखील नसावी. बुद्धिवादी मनुष्य नेहमी वर्तमानात जगतात.
४) पुरुषाचे ज्ञान आणि महिलांचे सौंदर्य ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे.
५) प्रत्येक मैत्री मागे काही ना काही स्वार्थ असतोच. जगात अशी कोणतीच मैत्री नाही जिच्या मागे लोकांचे स्वता:चे हित नसेल, हे एक कटू सत्य आहे.
६) मुलांवर त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत प्रेम करावे, नंतर दहा वर्षापर्यंत शिक्षा करावी, आणि जेव्हा ते सोळा वर्षांचे होतील तेव्हा त्यांचे चांगले मित्र बनावे.
७) गरिबी, आजारपण वगैरे गोष्टी माणसाच्या खऱ्या शत्रू नसतात.
भीती हीच कोणत्याही मनुष्याची सगळ्यात मोठी शत्रू आहे.
८) पैसा खूप कष्टाने मिळवला पाहिजे. आपल्या प्रमाणिकपणाचा त्याग करून अथवा शत्रूच्या पाया पडून पैसा मिळत असेल, तर असे धन कधीही स्वीकारु नये.
कारण पुढे ते खूप मोठे नुकसान घडवून आणते.
९) ज्ञान आपला सर्वात चांगला मित्र आहे. एका शिकलेल्या व्यक्तीला सगळीकडेच सन्मान मिळतो. शिक्षण हे नेहमीच सौंदर्य आणि तरुणाईचा पराभव करते.
१०) फुलांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने जातो, पण एका चांगल्या माणसाचा चांगुलपणा सर्वत्र पसरतो.
११) असंभव शब्दाचा प्रयोग तर भित्रे करतात, बुद्धिमान आणि धीट माणसे स्वत:चा रस्ता स्वतः तयार करतात.