हरितालिका साहित्य
साहित्य
फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, विड्याची पाने १२, सुपार्या ६, बदाम ५, खारका
५, नारळ २, फळे / केळी ५, पेढे ५ / खडीसाखर पत्री (पत्रपूजेतील
क्रमानुसार)- बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस,
आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोक .(उपलब्धीप्रमाणे)
सौभाग्यवायनसाहित्य
परडीत / पत्रावळीवर – हळदकुंकू, तांदूळ, वस्त्र, पानसुपारी, नाणे, नारळ,
गजरा/वेणी, शिधा तसेच; फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी
सौभाग्यद्रव्ये.
गृह्यसाहित्य
अत्तरफाया, हळदकुंकू, चंदनगंध, अष्टगंध, गुलाल, बुक्का, अक्षता, रांगोळी,
उदबत्ती, कापूर, आगपेटी, सुटीनाणी ६, तुपाच्या व तेलाच्या वाती, कापसाची
मालावस्त्रे – १६ मण्यांचे १ व ५ मण्यांचे १, तांदूळ ( वाटीभर ) पंचामृत (
दूध, दही, तूप, मध, साखर ) गूळखोबरे, नैवेद्य, सुंठवडा (डिंकवडा), चौरंग /
पाट, आसन, पाण्याचा कलश, शंख, घंटा, समई, नीराजने, कापूरारती, पळीपंचपात्र,
ताम्हण, देव पुसण्याचे वस्त्र, हातपुसणे, तसराळे, पेलाभर उष्णोदक.
व्रतोद्देश
कुमारीना सुयोग्य वरप्राप्ती, सुवासिनींना अखंडसौभाग्यप्राप्ती.
पूजार्ह देवता
पार्वती व हरिताली : ( मृत्तिकेच्या मूर्ती व वाळूचे शिवलिंग )
पूजाकाल :भाद्रपद शुद्ध तृतीयेस प्रथम प्रहरात ही पूजा करावी
व्रताचार : ही पूजा अविवाहित व विवाहित अशा सर्वच स्त्रिया करतात . ह्या
दिवशी उपवास करावा . रात्रौ यथाशक्ति जागरण करून देवीची आरती करावी .
हरितालिका पूजेची मांडणी –
चौरंगावर/पाटावर तांदळाच्या सपाट ढिग करून, त्यावर गौरी व हरिताली
ह्यांच्या मूर्ती ठेवून त्यासमोर वाळूचे लिंग तयार करावे किंवा आपापल्या
प्रथेप्रमाणे पूजेची मांडणी करावी. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील
सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी,
खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.
प्रथमसुवासिनीकडून/कुमारिकेकडून/स्वत: हळदकुंकूलावूनघ्यावे. त्यानंतर घरातील देवांसमोर विडे ठेवून, अक्षता व हळदकुंकू वाहून नमस्कारपूर्वक प्रार्थना करावी. तसेच घरातील वडीलधार्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजाप्रारंभ करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा